Home /News /lifestyle /

हवेनंतर आता पाण्यातून कोरोना पसरण्याचा धोका? गंगा, यमुना नदीतील मृतदेहांमुळे वाढली भीती

हवेनंतर आता पाण्यातून कोरोना पसरण्याचा धोका? गंगा, यमुना नदीतील मृतदेहांमुळे वाढली भीती

गंगा, यमुनामध्ये मोठ्या संख्येने मृतदेह (deadbodies in ganga yamuna river) दिसले. हे मृतदेह कोरोना रुग्णांचे असल्याची शक्यताही वर्तवली जाते आहे. त्यामुळे मोठी चिंता निर्माण झाली आहे.

    मुंबई, 12 मे : पृष्ठभागानंतर आता हवेतूनही कोरोना (Coronavirus) पसरतो हे सिद्ध झालं आहे. दरम्यान आता पाण्यातूनही कोरोना पसरू शकतो (Transmission of Coronavirus Through Water) का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे आणि याचं कारण म्हणजे गंगा आणि यमुना नदीत आढळलेले मृतदेह (Deadbodies in ganga yamuna river). गंगा, यमुनामध्ये मोठ्या संख्येने मृतदेह दिसले. हे मृतदेह कोरोना रुग्णांचे असल्याची शक्यताही वर्तवली जाते आहे. त्यामुळे पाण्यातून कोरोना पसरण्याची भीती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली. हवेप्रमाणे पाण्यातूनही कोरोना पसरण्याचा धोका आहे का? याबाबत तज्ज्ञांनीही आपली मतं मांडली आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक  आणि जलशक्ती मंत्रालयाच्या स्वच्छ गंगा मोहिमेशीही जोडलेले असलेले  सतीश तरे यांनी पाण्यातून कोरोना पसरण्याची शक्यता किती आहे, हे सांगितलं आहे. हे वाचा - Black fungus वर प्रभावी ठरतोय 100 वर्षे जुना फॉर्म्युला; भारतीय डॉक्टरचा दावा सतीश तरे म्हणाले, "या नद्यांमध्ये मृतदेह टाकणं तसं नवं नाही. पण गेल्या 10-15 वर्षांपासून हे प्रमाण कमी झालं आहे. गंगा आणि यमुना नद्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे.  देशात कोरोनाचं संकट असताना गंगा किंवा तिच्या उपनद्यांमध्ये असे मृतदेह टाकणं हे खूप चिंताजनक आहे. मृतदेह पाण्यात टाकल्याने नदीचं पाणी प्रदूषित होतं. जरी संशयित कोरोना रुग्णांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले असले तरी थोड्या फार प्रमाणात प्रदूषण झालंच असेल. पण यामुळे कोरोनाचा संसर्गाचा धोका नाही" "जर हे पाण्याचा पुरवठा केला जात असेल तर ते पाणीपुरवठा प्रणालीमार्फत जाईल. पाण्यावर सामान्य प्रक्रिया केली जाते. जे लोक थेट नदीतून पाणी घेत असतील त्यांनी मात्र खबरदारी घेण्याची गरज आहे", असा सल्लाही तरे यांनी दिला आहे. हे वाचा - Covid मुळे पुण्याच्या मध्यवस्तीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांची संख्या वाढली तर मुख्य वैद्यकीय सल्लागार के. विजय राघवन यांनी सांगितलं, "पाण्याच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाही. एखादी व्यक्ती बोलली, दोन व्यक्तींचा एकमेकांशी अगदी जवळून संपर्क आला तर प्रामुख्याने संसर्ग होतं. जर कोरोनाग्रस्त व्यक्तीचे ड्रॉपलेट्स  पृष्ठभागावर पडले आणि त्याच्याशी संपर्क आला तर कोरोना संसर्ग पसरतो. पण बहुधा हा हवेच्या माध्यमातूनच पसरतो. एअरफ्लोवरसुद्धा हे अवलंबून आहे. त्यामुळे काळजी करू नका, पाण्यातून कोरोना संसर्गाचा धोका नाही"
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bihar, Corona, Coronavirus, Dead body, Ganga river

    पुढील बातम्या