• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • कसं शक्य आहे? प्रत्यक्ष Intercourse न करता फक्त Oral sex करून 'ती' झाली प्रेग्नंट

कसं शक्य आहे? प्रत्यक्ष Intercourse न करता फक्त Oral sex करून 'ती' झाली प्रेग्नंट

प्रेग्नन्सीचं हे प्रकरण पाहून डॉक्टरही हैराण झाले.

 • Share this:
  मुंबई, 12 मे : एखादी महिला आयव्हीएफचा (IVF) मार्ग न निवडता, शारीरिक संबंध न ठेवता प्रेग्नंट होऊ शकते का (Girl pregnant without intercourse) ? एखाद्या महिलेला व्हजायनाच नाही, तिला मासिक पाळीही येत नाही, तिला गर्भधारणा होऊ शकते का? आणि महत्त्वाचं म्हणजे एखाद्या महिलेने फक्त ओरल सेक्स केलं (Girl pregnant after only oral sex) असेल आणि तिच्या पोटात चाकूही भोसकला असेल, अशी महिला प्रेग्नंट होऊ शकते का? या प्रत्येक प्रश्नाचं तुमचं उत्तर नाही असंच असेल. पण एका मुलीच्या बाबतीत मात्र हे सर्व शक्य झालंआहे. या प्रकरणामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत. 15 वर्षांची एक मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत, पोटावर चाकूचे घाव घेऊन रुग्णालयात गेली. तिच्या पोटावर गंभीर जखम होती. हातालाही जखम झाली होती. तिची गंभीर स्थिती पाहून डॉक्टरांनी तिची तात्काळ सर्जरी केली. सर्जरीवेळी तिच्या पोटावरील घाव अगदी जठरापर्यंत खोलवर गेल्याचं दिसलं. तिच्या जठरात कोणताही पदार्थ किंवा गॅस नव्हता. रुग्णालयात 10 दिवस तिच्यावर उपचार करण्यात आले. बरी झाल्यानंतर तिला डिस्जार्ज देण्यात आला. हे वाचा - Virgin राहणार म्हणाली आणि 10 वर्षांतच झाली 10 मुलांची आई; आणखी बाळांचं प्लॅनिंग नऊ महिन्यांनंतर ती मुलगी पोटात वेदना होत असल्याची तक्रार घेऊन पुन्हा रुग्णालयात आली. डॉक्टरांनी तिचे जुने रिपोर्ट पाहिले आणि त्यानुसार तपासणी केली तर त्यांना धक्काच बसला. ती मुलगी प्रेग्नंट होती. तिच्या शरीरात ब्लाइंड व्हजायना होती. जी फक्त दोन सेंटिमीटर इतकीच होती. यामुळे ती इंटरकोर्स करू शकत नव्हती किंवा गरोदरही होऊ शकत नव्हती. डॉक्टरांनी तिचं सिझेरियन केलं. तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला. यानंतर डॉक्टरांनी तिची चौकशी केली. तेव्हा तिनं सांगितलं की, तिला व्हजायना नाही हे माहिती होतं. त्यामुळे ती ओरल सेक्स करायची. जेव्हा तिच्यावर चाकू हल्ला झाला, त्याच्या काही वेळ आधीच तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत ओरल सेक्स केलं होतं. त्यानंतर एक्स-बॉयफ्रेंड आला आणि त्या तिघांची भांडणं झाली आणि त्यातून चाकू हल्ला झाला. हे वाचा - बापरे! 16 पत्नी, 150 मुलं; म्हणे, व्हायचंय 100 बायकांचा नवरा, 1000 पोरांचा बाप तिला कधीच मासिक पाळी आली नाही. पण तिचे पोट नऊ महिने वाढत होतं. ती प्रेग्नंट आहे, याची साधी कल्पनाही तिला नव्हती. तेव्हा डॉक्टरांनी तिला ती ओरल सेक्समुळे प्रेग्नंट झाल्याचं सांगितलं. आता हे कसं शक्य आहे? असाच प्रश्न त्या मुलीलाही पडला. काही स्पर्म पोटातील जखमेच्या मार्गाने प्रजनन अवयवापर्यंत पोहोचले असावेत. यामद्ये उच्च पीएच असलेल्या लाळेची मदत झालेली असावी. कारण जेव्हा चाकूने जखमी झालेल्या या मुलीची सर्जरी करण्यात आली तेव्हा तिचं पोट रिकामं होतं. म्हणजे शरीरात अॅसिडची निर्मिती होत नव्हती. जेव्हा अॅसिड निर्मिती होते तेव्हा स्पर्म प्रजजन अवयवापर्यंत जाऊ शकत नाही, असं डॉक्टर म्हणाले. हे वाचा - पुरुषांनाही असतो या कामात Interest; समाजाने स्वीकारला बदल आज तकने दिलेल्या रिपोर्टनुसार हे प्रकरण ब्रिटिश जर्नल ऑफ ऑब्सटेट्रिक्स अँड गायनेकोलॉजीमध्ये ओरल कॉन्सेपशन : इम्प्रिगनेशन व्हाया प्रॉक्सिमल गॅस्ट्रोइन्टेस्टाइनल ट्रॅक्ट इन पेशंट विद  एन एप्लास्टिक डिस्टल व्हजाइना' या नावाने प्रकाशित झालं होतं. हा रिपोर्ट द लँसेट जर्नलमध्येही प्रसिद्ध करण्यात आला होता.
  Published by:Priya Lad
  First published: