आपलं लैंगिक आयुष्य सुखाचं होण्यासाठी आणि आई होण्यासाठी सेक्स हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. पण, त्याविषयी अनेक शंका मनात असतात. समज-गैरसमजदेखील पसरलेले असतात. ते वेळीच दूर झाले की, चांगल्या आरोग्याचा आणि आई होण्याचा उद्देश यशस्वी होतो. एखादं दाम्पत्य मुलाचा विचार करतात, त्याचं प्लॅनिंगही करतात. पण, मूल होण्यासाठी नेमकं कधी लैंगिक संबंध ठेवावेत, याची माहिती नसते. त्याचसंदर्भात जाणून घेऊ या. काही महिलांच्या बाबतीत एकदा लैंगिक संबंध ठेवले की, गर्भधारणा होते . तर काही महिलांच्या बाबतीत अनेकदा लैंगिक संबंध ठेवले तरी, गर्भधारणा होत नाही. त्यामुळे अशा महिलांना टेन्शन येतं. तर आरोग्यतज्ज्ञ असं सांगतात की, एका ठराविक वेळी दाम्पत्याने लैंगिक संबंध ठेवले की, गर्भधारणेची शक्यता अधिक वाढते. गर्भधारणेच्या प्रक्रियेत ओव्ह्युलेशन हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. कारण, ओव्ह्युलेशननंतरच (Ovulation Time) गर्भधारणा होते. आता ओव्ह्युलेशन म्हणजे काय तर स्त्रियांच्या अंडाशयातून बीजनिर्मिती होते, तसेच त्याचे प्रसरण होते, त्यालाच ओव्ह्युलेशन म्हणतात. तर स्त्रियांच्या शरीरातील बीज आणि पुरुषांच्या विर्यातील शुक्राणू यांचा संयोग झाला, तर गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा स्त्रियांच्या शरीरातील बीज प्रसारित होत असते, तेव्हा त्यांच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये शुक्राणू आले की, बीज आणि शुक्राणुंचा संयोग होतो. त्यातून गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. पण, यामध्ये होतं काय? तर बऱ्याच स्त्रियांना ओव्ह्युलेशनचा कालावधीच माहीत नसतो. संयोगासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा हा कालावधी अत्यंत कमी असतो. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, गर्भधारणा व्हावी अशी इच्छा असेल तर ओव्ह्युलेशनचा कालावधी जवळ आला की, लगेच आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवण्यास सुरुवात करावी. ओव्ह्युेलेशननंतर बीज आणि शुक्राणुचा संयोग घडून येण्यासाठी 12 तास लागतात. ओव्ह्युलेशन एका बीजाचं आयुष्य हे फक्त 24 तासांचं असतं. एकंदरीत काय तर, ओव्ह्युलेशननंतर 12 तासांच्या आत स्त्री बीज आणि शुक्राणू यांचा संयोग झाला नाही, तर गर्भधारणा होण्याची शक्यताच कमी होते. आता शुक्राणू गर्भाशयात 72 तास जिवंत राहतात. त्यामुळे ओव्ह्युलेशनचा कालावधी सुरू होण्यापूर्वी 3 दिवस आधीच दाम्पत्याने लैंगिक संबंध ठेवावेत, त्यातून गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त वाढते. कारण, ओव्ह्युलेशनपूर्वी लैंगिक संबंध ठेवले की, गर्भाशयात आलेले शुक्राणू स्त्री बीज रिलीज झाले की, लगेचच संयोग घडून येतो.
ओवह्युलेशनचा कालावधी सुरू झाला आहे, कसं ओळखायचं? मासिक पाळीच्या आसपासच ओव्ह्युलेशनचा कालावधी असतो. ओव्ह्युलेशन दरम्यान शरीराचं तापमान सर्वसामान्यपणे 1 अंशाने वाढत असतं. ल्युटेनाइजिंग हॉर्मोन्सची पातळीदेखील वाढलेली असते. ही पातळी किती वाढली आहे हे होम ओव्ह्युलेशन किटद्वारे तपासता येतं. व्हजायननल डिस्चार्ज, स्तन ओढल्यासारखं वाटणं आणि पोटात एकाच बाजूला दुखणं, ही ओव्ह्युलेशनची लक्षणं आहेत. ओव्ह्युलेशनचा नेमका कालावधी माहीत करून घेण्यासाठी ओव्ह्युलेशन स्ट्रिप्सचा वापर करावा. यामुळे त्यांना ओव्ह्युलेशनचा निश्चित काळ कोणता आहे हे समजू शकतं. यामुळे प्रेगन्सीचं प्लॅनिंग करणं सोपं जातं.