फक्त उपवासालाच नाही,रोज खा शिंगाडे; होतील आरोग्याला अनेक फायदे

फक्त उपवासालाच नाही,रोज खा शिंगाडे; होतील आरोग्याला अनेक फायदे

काही देशांमधील चायनीज आणि थाई रेसिपीजमध्ये (Chines & Thai Respires) देखील शिंगाडे वापरले जातात.

  • Share this:

मुंबई, 28 जून: शिंगाडे म्हणजेच चेस्टनट  (Chestnuts) म्हणून जगभरात ओळखला जाणारा हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. ऑस्ट्रेलिया,आफ्रिका,अमेरिका युरोप या देशांमध्ये शिंगाडे सर्रास दिसतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूट्रिशन (Nutrition) असतात. शेतात, तलावात, नदीच्या किनाऱ्यावर किंवा दलदलीमध्ये शिंगाडे मिळतात. याशिवाय काही भागात यांची लागवड केली जाते. ज्या प्रकारे ड्रायफ्रूटमध्ये बदाम, काजू,आक्रोड यांना महत्त्व आहे. तितकेच पोषक घटक (Health Benefits) शिंगाड्यात असतात.

त्यामुळे शिंगाड्याला देखील महत्व आहे. यापासून लोणचं बनवता येतं, उपवासाला देखील शिंगाड्याचं पीठ वापरतात. कारण हे एक प्रकारचं कंदमूळ मानलं जातं. आपल्या देशामध्ये शिंगाड्याला खूप जास्त महत्त्व दिल जात नाही. लोक फक्त शिंगाड्याच्या पिठाचा वापर करतात. मात्र, काही देशांमधील चायनीज आणि थाई रेसिपीजमध्ये देखील शिंगाडे वापरलं जातात.

शिंगाडे खाण्याचे फायदे

दम्याच्या रुग्णांसाठी शिंगाडे खाणं उत्तम मानलं जातं. यामुळे दम्यात आराम मिळतो.

मूळव्याधीचा त्रास असेल तर, शिंगाडे खावेत. शिंगाडे थंड असतात. त्यामुळे मूळव्याधीत फायदा होतो.

शिंगाडे खाल्ल्यामुळे पायाच्या तळव्यांच्या भेगा भरून येतात.

(जेवल्यानंतर फळं खायच्या सवयीने होतात घातक परिणाम; मग योग्य वेळ कोणती?)

शरीरावर एखाद्या भागावर सूज आली असेल तर, त्याचा लेप लावल्यास फायदा होतो.

शिंगाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यामुळे हाडं आणि दात मजबूत होतात.

गर्भवती महिलांनी देखील शिंगडा खावा. यामुळे बाळ आणि महिलेचे आरोग्य चांगलं राहतं. गर्भपाताचा धोका टळतो.

शरीरात रक्ताची कमतरता असेल तर, शिंगाडे खावेत शिंगाडे खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

उपवासाला देखील शिंगाडे किंवा शिंगाड्याचं पीठ खाल्लं जातं.

(तुम्हाला माहिती आहे का? सतत हवासा वाटणारा स्मार्टफोन तुमचं लैंगिक सुख हिरावतोय)

शिंगाड्यामध्ये फायबर असतं, त्यामुळे हार्ट अटॅक आणि डायबिटीसचा धोका कमी होतो. यशिवाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं.

कावीळ झाली असेल तर, कच्चे शिंगाडे खावेत. त्यामुळे कावीळ लवकर बरी होण्यास मदत होते.

शिंगाडयामधील पोषक घटक

शिंगाड्यामध्ये ऍन्टीऑक्सिडंट, पोटॅशियम, व्हिटॅमीन बी 6, मॅग्नीज, कॉपर यासारखे घटक असतात.

शिंगाडे खाल्ल्यामुळे शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स आणि ब्लड प्रेशर कमी होण्यात फायदा मिळतो.

(Sankashti Chaturthi : रवीवती संकष्टी चतुर्थीचा योग; काय आहे याचं महत्त्व?)

केसांची वाढ होत नसेल तर शिंगाडे खावेत.

युरिन इन्फेक्शनच्या उपचारांमध्ये देखील शिंगाड्याचा प्रभावी उपयोग होतो.

शिंगाड्याचं पीठ लिंबू सरबतमध्ये मिसळून नियमितपणे प्यायल्यास एक्झिमा सारख्या त्रासांमध्ये फायदा होतो.

शिंगाड्यामध्ये भरपूर पोषक घटक असल्यामुळे शिंगाडे वापरावेत.

शिंगाड्याच्या चुर्णाचा उपयोग खोकला बरा करण्यासाठी होतो.

शिंगाड्यामुळे अपचनाची समस्या ही दूर होते.

(भय इथलं संपत नाही! कोरोनासारखे आणखी 30 भयंकर व्हायरस; भविष्यातही महासाथीचं सावट)

लोक शिंगाडे उकडून किंवा भजी देखील खातात. शिंगाडे एखाद्या चॅटमध्ये टाकू शकता. शिंगाड्याचं सूपही बनवता येऊ शकतं. चायनीज आणि थाई रेसिपीमध्ये देखील शिंगाडे वापरले जातात. भारतामध्ये शिंगाड्याची भाजी बनवली जाते. मखाणे आणि शिंगाडे एकत्र करून काही पदार्थ बनवले जातात.

शिंगाडे खाताना घ्या काळजी

शिंगाडे जास्त प्रमाणात खाऊ नयेत आणि शिंगाडे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. शिंगाडे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे कफदोष वाढण्याची शक्यता असते.

Published by: News18 Desk
First published: June 28, 2021, 12:02 PM IST

ताज्या बातम्या