Home /News /lifestyle /

भय इथलं संपत नाही! कोरोनासारखे आणखी 30 महाभंयकर व्हायरस; भविष्यातही महासाथीचं सावट

भय इथलं संपत नाही! कोरोनासारखे आणखी 30 महाभंयकर व्हायरस; भविष्यातही महासाथीचं सावट

झूनॉटिक अर्थात जनावरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूच्या संसर्गाचा धोका असल्याने शास्त्रज्ञांचा त्यावर आधीपासूनच अभ्यास सुरू होता.

वॉशिंग्टन, 27 जून : गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कोविड-19 (Covid 19) या विकाराने जगभर धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा (Coronavirus) प्रसार चीनमधल्या लॅबमधून झाल्याची एक थिअरी असली, तरी सध्या जे पुरावे उपलब्ध आहेत. त्यानुसार कोरोना या वटवाघळांमधल्या विषाणूचा (List of virus) संसर्ग मानवात होऊन त्याने गंभीर रूप धारण केल्याचं अनेक शास्त्रज्ञ मानतात. यापूर्वीही स्वाइन फ्लूचा प्रसार डुकरांमधून माणसात झाला होता. अशा प्रकारच्या झूनॉटिक अर्थात जनावरांमध्ये (Animal virus) आढळणाऱ्या विषाणूच्या संसर्गाचा धोका असल्याने शास्त्रज्ञांचा त्यावर आधीपासूनच अभ्यास सुरू होता. आता जगात सध्या अस्तित्वात असलेल्या 887 झूनॉटिक व्हायरसची (Zoonotic Viruses) यादी एका वेब बेस्ड प्लॅटफॉर्मने तयार केली आहे. त्यातल्या 30 विषाणूंपासून (30 dangerous virus) भविष्यात मानवाला धोका होऊ शकतो आणि त्यांच्यापासून मोठी साथ पसरू शकते, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधल्या (University of California) संसर्गजन्य रोग (Contagious diseases) तज्ज्ञ जोना मॅजेट यांनी 10 वर्षांहून अधिक काळ परिश्रम करून हे संशोधन केलं आहे. या संशोधनातूनच माणसासाठी घातक ठरू शकतील, अशा 30 विषाणूंची यादी तयार करण्यात आली आहे. यापैकी काही विषाणूंमध्ये जागतिक महासाथ पसरवण्याची ताकद असल्याचं जोना मॅजेट यांचं म्हणणं आहे. हे वाचा - Delta plus, Third wave च्या संकटात लसीकरणाचा वेग घटला; तज्ज्ञांना आलं टेन्शन संसर्ग पसरवण्याच्या क्षमतेच्या आधारे या विषाणूंचे तीन प्रकार करण्यात आले आहेत. राष्ट्रीय किंवा क्षेत्रीय, अर्धवैश्विक अर्थात सेमी-ग्लोबल आणि वैश्विक अर्थात ग्लोबल हे ते तीन प्रकार आहेत. प्रकाराच्या नावाप्रमाणेच तेवढ्या व्यापक क्षेत्रावर फैलावण्याची या विषाणूंची क्षमता आहे. राष्ट्रीय किंवा क्षेत्रीय पातळीवर फैलावण्याची क्षमता असलेले विषाणू लास्सा व्हायरस किंवा एरेनाव्हायरस (Lassa Virus or Arenavirus), एबोला व्हायरस किंवा फिलोव्हायरस (Ebola Virus or Filovirus), मार्बर्ग व्हायरस किंवा फिलोव्हायरस (Marburg or Filovirus), सार्स कोरोनाव्हायरस (SARS Coronavirus), कोरोनाव्हायरस 229ई (Coronavirus 229E), सार्सशी संबंधित बीटा कोरोनाव्हायरस Rp3 (SARS Related Beta Coronavirus Rp3),युरोपियन बॅट लिसा व्हायरस 1 किंवा रॅब्डोव्हायरस (European Bat Lyssa Virus or Rabdovirus), अँडीज व्हायरस किंवा बुनियाव्हायरस (Andes Virus or Bunyavirus), पुमाला व्हायरस (Puumala Virus), शेरेफॉन बॅट कोरोना व्हायरस/केनिया/KY22/2006 (Chaerephon Bat Coronavirus), युरोपियन बॅट लिसाव्हायरस 2 (European Lyssavirus 2), लागुना नेग्रा व्हायरस (Laguna Negra Virus), इडोलोन बॅट कोरोना व्हायरस (Eidolon Bat Coronavirus), काउपॉक्स व्हायरस (Cowpox Virus). अर्धवैश्विक किंवा सेमी-ग्लोबल पातळीवर फैलाव होण्याची क्षमता असलेले विषाणू सार्स-सीओवी-2 (SARS-CoV-2), निपाह व्हायरस (Nipah Virus), सिमियन इम्युनोडेफिशिएन्सी व्हायरस किंवा रेट्रोव्हायरस (Simian Immunodeficiency Virus or Retrovirus), कोरोनाव्हायरस प्रेडिक्ट सीओवी-35 (Coronavirus PREDICT CoV-35), बोर्ना डिसीज व्हायरस किंवा बोर्नाव्हायरस (Borna Disease Virus or Bornavirus), लॉन्गक्वान आ माउस कोरोना व्हायरस (Longquan Aa Mouse Coronavirus), मंकीपॉक्स व्हायरस (Monkeypox Virus), कोरोनाव्हायरस प्रेडिक्ट सीओवी-24 (Coronavirus PREDICT CoV-24) वैश्विक अर्थात जागतिक पातळीवर फैलाव होण्याची क्षमता असलेले विषाणू या यादीतल्या 30 विषाणूंपैकी अनेक विषाणू वैश्विक साथीचं रूप धारण करू शकतात. कारण त्यांच्यामध्ये म्युटेशनची ताकद आहे. त्यामुळे अनेक नवे व्हॅरिएंट्स तयार होऊ शकतात. त्यात पुढील विषाणूंचा समावेश आहे. सियोल व्हायरस (Seoul Virus), हिपॅटाइटिस ई व्हायरस किंवा हेपेव्हायरस (Hepatitis E Virus or Hepevirus), रेबीज व्हायरस (Rabies Virus), लिम्फोसायटिक कोरियोमॅनिनजायटिस व्हायरस (Lymphocytic choriomeningitis virus), सिमियन फोमी व्हायरस (Simian Foamy Virus), रोउसेट्स बॅट कोरोना व्हायरस एचकेयू9 (Rousettus Bat Coronavirus HKU9), मुरीन कोरोनाव्हायरस (Murine Coronavirus), मकाउ फोमी व्हायरस (Macaque Foamy Virus). हे वाचा - Delta plus, Third wave च्या संकटात लसीकरणाचा वेग घटला; तज्ज्ञांना आलं टेन्शन माणूस जनावरांच्या संपर्कात असतो. त्यामुळे जनावरांच्या माध्यमातून विषाणूंचा संसर्ग होण्याची भीती कायम असते. सार्स-सीओवी-2 (SARS-CoV-2) कोरोनाव्हायरस हा या यादीतला सर्वांत घातक विषाणू आहे. सिमियन इम्यूनोडेफिशिएन्सी व्हायरस (Simian Immunodeficiency Virus - SIV) हा विषाणू माकडांमधून माणसात आला. मकाउ फोमी व्हायरसदेखील (Macaque Foamy Virus) माकडांमधून माणसात येतो. कोरोना व्हायरस 229E (Coronavirus 229E) ही कोरोनाची वेगळी स्ट्रेन असून, त्यामुळे माणसाला सर्दी होते. मुरीन कोरोनाव्हायरसच्या काही स्ट्रेन्समुळे (Murine Coronavirus) उंदरांमध्ये मल्टिपल स्क्लेरॉसिस झाल्याचं आढळलं आहे. या 30 विषाणूंचा धोका सर्वांत जास्त असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं. त्यासाठी त्याचे वेगवेगळे पैलू अभ्यासण्यात आले. प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये हा अभ्यास अलिकडेच प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात 13 देशांतल्या 65 तज्ज्ञांचा सहभाग होता. एकूण 887 विषाणूंपैकी माणसाला घातक ठरू शकतील अशा 38 विषाणूंवर अभ्यास झाला आहे. उर्वरित 849 विषाणूंवर संशोधन झालेलं नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
First published:

Tags: Coronavirus, Pandemic, Virus

पुढील बातम्या