दिल्ली, 22 मे : कोरोना (Coron) मुळे सगळेच जण घरात अडकले. शाळा (School), कॉलेज (College) बंद झाले. सुरुवातीच्या काळात नेहमीच्या शेड्यूलमधून वेळ मिळाल्याने विद्यार्थी (Student) देखील खुश झाले. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा (First Wave of Corona) प्रभाव कमी होत असताना शाळा, कॉलेज थोड्याफार प्रमाणात सुरू करण्यात आले. मात्र, दुसऱ्या लाटेत (Second Wave) परीक्षा (Exam) पुढे ढकलण्यात आल्या किंवा रद्द करण्यात आल्या. अशा परिस्थिती बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी, पुढच्या शिक्षणासाठी विदेशात जाण्याच्या तयारीत असलेली मुलं, महत्वाचं शैक्षणिक वर्ष (Important Academic Year) असेलेली मुलं यांच्या मनावर ताण आलेला आहे. त्यातच अद्याप कोणत्या परीक्षा रद्द झाल्यात, पुन्हा होणार? किंवा निकाल कसा लागणार ? याचीही स्पष्टता नाही आहे.
त्यामुळे मुलांच्या मनात अनेक शंका, विचार सुरू आहेत. ओन्ली माय हेल्थच्या हवाल्याने या तणावपूर्ण परिस्थितीत काय करायचं? यावर मानसोपचापतज्ज्ञांचं काय मत आहे? जाणून घेऊ यात.
करियर कॉउन्सिलरच्या मते कोरोना काळात सगळ्याच गोष्टींबद्दल अनिश्चितता आहे. पण प्रत्येक प्रश्न आणि अडचणींवर उत्तर असतं. कोरोनामुळे परीक्षा आणि करियर यांच्याबाबतीत अनश्चितता निर्माण झाली असली तरी, त्यावर लवकरच सोल्युशन मिळेल. जी परिस्थिती भारतात आहे, ती परिस्थिती संपूर्ण जगात आहे. त्यामुळे निराश होऊ नका. सरकार देखील या प्रश्नाचं उत्तर शोधत आहे. त्यामुळे या काळात पॉझिटीव्ह विचार आपल्याला तारू शकतात.
(SSC Exams: कोर्टानं फटकारल्यानंतरही परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम)
सरकारने नमोदर्पण नावाचा एक करियर प्रोग्राम सुरू केला आहे. त्याचा फायदा घेऊ शकता. या परिस्थितीतही आपल्याकडे करियरचे पर्याय खुले आहेत. त्यांचा विचार करा. याशिवाय तणाव कमी करण्यासाठी काही टिप्सही वापरु शकता.
आशावादी विचार
करियर ही अनेक वर्षांच्या मेहनतीने घडणारी गोष्ट आहे. एक किंवा दोन वर्षांमुळे त्यावर परिणाम होऊ देऊ नका. उलट मिळालेला वेळ काहीतरी नवीन शिकण्यात व्यतीत करा. सगळ्यांच्याच बाबतीत ही गोष्ट घडत आहे असं आपल्या मनाला समजवा.
प्रोडक्टीव्ह विचार
सगळीकडे निराशा पसरलेली आहे. पुढे काय होणार याचा विचार सगळे करत आहेत. त्यामध्ये गुंतू नका. त्याऐवजी काहीतरी प्रोडक्टीव्ह विचार करायला सुरुवात करा. त्यानेच या काळात फायदा होणार आहे.
(1 जुलैपासून सर्वसामान्यांना बसणार आणखी एक धक्का?, या योजनांचे व्याजदर कमी होणार?)
रिअॅलिस्टीक अॅप्रोच
शाळा, कॉलेज बंद आहेत, परीक्षा होणार का ? हे अनिश्चित असलं तरी, ही परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. पुढे जाऊन नव्या संधी मिळतील याचा विचार करा. फोन, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मित्र-मैत्रिणींबरोबर बोला. विचारांची देवाणघेवाण करा. केवळ एकाच्याच नाही तर, सगळ्यांच्याच करियरवर या परिस्थितीचा परिणाम होत आहे. त्यामुळे नवीन सुरुवात कशी करायची याचा विचार करा.
नवीन सुरुवात
कोरोनामुळे घरातच रहावं लागत असलं तरी, घरामध्ये राहूनही नवीन कोर्स करता येऊ शकतात. अनेक ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार त्याची माहिती घ्या. एखादा छोटा कोर्स सुरू करुन तुम्ही सुरुवात करु शकता.
(अवेळी दुधाचं सेवन ठरू शकतं घातक; जाणून घ्या दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?)
योग्य निर्णय
कोरोनामुळे लहान मोठ्या सगळ्यांवरच अनिश्चिततेचं सावट आहे. पण कोणीही थांबत नाही. नवीन सुरुवात सगळ्यांनाच करावी लागते. त्यामुळे हा वेळ स्वत: ला द्या. स्वत:शी बोला. नवीन ध्येय निश्चित करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Colleges closed, Coronavirus, Health, Lockdown, Mental health, Student