मुंबई, 19 मे: केंद्र सरकारकडून सर्वसामान्य, छोट्या गुंतवणूकदारांसाठी सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, भविष्य निर्वाह निधी (PPF) अशा अनेक योजना चालवल्या जातात. दर तीन महिन्यांनी या योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेऊन ते त्या वेळच्या परिस्थितीनुसार कमी किंवा जास्त केले जातात. येत्या एक जुलैपासून सुरू होणाऱ्या तिमाहीत या योजनांच्या व्याजाचे दर केंद्र सरकारकडून कमी केले जाण्याची शक्यता आहे. याबद्दलचा निर्णय जून महिन्यात घेतला जाण्याची शक्यता आहे. जो काही निर्णय होईल, त्याचीअंमलबजावणी एक जुलैपासून होईल. गेल्या वर्षभराहून अधिक काळ कोरोनामुळे सरकारचा खर्च वाढला आहे. तसंच आर्थिक विकास दरावरही विपरीत परिणाम झाला आहे. अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, विकासाची गती पुन्हा मिळवण्यासाठी काही वेगळी पावलं उचलणं गरजेचं आहे. छोट्या बचत योजनांवरच्या (Small Savings Scheme) व्याजदरात कपात केल्यानंतर सरकारच्या उधारीचं प्रमाण कमी होईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला आधार मिळेल. भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) तसंच अन्य बँकाही व्याजदर घटविण्याच्या बाजूने आहेत. Happy Birthday:‘किराणा दुकानात काम ते प्रसिद्ध लेखक’ रस्किन बॉन्ड यांचा प्रवास एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीसाठी या छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता; मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी काही तासांमध्ये ट्विट करून हा निर्णय चुकून जाहीर झाल्याचं सांगितलं होतं. त्या वेळी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका व्हायच्या होत्या. त्यामुळे त्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारने त्या वेळी व्याजदर कपातीचा निर्णय पुढे ढकलल्याचं बोललं गेलं. आता मात्र तसं कोणतंही बंधन सरकारवर नाही. त्यामुळे 30 जूनपर्यंत या दरकपातीचा निर्णय सरकार घेऊ शकतं. आईच्या निधनानंतर टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचा मोठा निर्णय, तुम्हीही कराल सलाम! या व्याजदरांमध्ये कपात झाली, तर छोट्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान होणार आहे. कारण कोरोना (Corona Pandemic) आणि लॉकडाउन (Lockdown) यामुळे सर्वच बँकांच्या बचत खात्यांचे, मुदत ठेवींचे आणि सर्वच प्रकारच्या बचतींचे व्याजदर घटले आहेत. अशा स्थितीत छोट्या बचत योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना आधार आहे. या योजनांचे सध्याचे व्याजदर असे आहेत. सुकन्या समृद्धी योजना -7.6 % ज्येष्ठ नागरिक बचत योजना -7.4 % पब्लिक प्रॉव्हिडंट फंड -7.1 % किसान विकास पत्र -6.9 % नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट -6.8 % मासिक प्राप्ती खातं -6.6 %
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.