जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / तणावमुक्तीसाठी Google CEO Sundar Pichai घेतात NSDR ची मदत; काय आहे हे वाचा सविस्तर

तणावमुक्तीसाठी Google CEO Sundar Pichai घेतात NSDR ची मदत; काय आहे हे वाचा सविस्तर

तणावमुक्तीसाठी Google CEO Sundar Pichai घेतात NSDR ची मदत; काय आहे हे वाचा सविस्तर

NSDR म्हणजे काय आणि हे गुगल सीईओ सुंदर पिचाई (Google ceo sundar pichai) यांना तणावमुक्त राहण्यासाठी कशी मदत करतं.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 10 मार्च : सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात ताण-तणावांचा सामना करावा लागतो. ताण निर्माण होण्याची कारणे प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकतात. ताण-तणावांचा आपल्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम पडतो. तणावमुक्त राहण्यासाठी अनेक जण आपआपल्या परीने वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. काहीजण ध्यान करतात. तर काही लोक संगीत ऐकतात. भारतीय वंशाचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) तणावमुक्त राहण्यासाठी NSDR ची मदत घेतात. या तंत्राच्या मदतीने झोप न घेता विश्रांतीद्वारे शरीराला पुन्हा कार्य करण्यास तयार केले जाऊ शकते. एनएसडीआर (Non Sleep Deep Rest ) खूप फायदेशीर आहे. पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांना याबाबत माहिती मिळाली होती. जेव्हा त्यांना एकाग्रता करण्यात त्रास होतो तेव्हा ते NSDR शी संबंधित व्हिडिओ शोधतात आणि त्यांचे अनुसरण करतात. ते 10, 20, 30 मिनिटांच्या व्हिडिओद्वारे NSDR करण्याचा प्रयत्न करतात, असं सुंदर पिचाई यांनी वॉल स्ट्रीट जनरलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. एनएसडीआरचा शोध स्टॅनफोर्ड न्यूरोसायन्सचे प्रा. अँड्र्यू ह्युबरमन यांनी लावल्याचा दावा केला. NSDR मध्ये व्यक्ती डोळे मिटून जमिनीवर झोपते आणि एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते. ध्यान करण्यापेक्षा NSDR करणे सोपे असल्याचे म्हटलं जातं. NSDR मध्ये, मेंदू विश्रांती घेतो. तसेच हृदयाची गती मंद होते. मानवी मेंदू बीटा लहरींकडून अल्फा लहरींकडे वळतो. बीटा लहरी सक्रिय मनाशी संबंधित असतात, तर अल्फा लहरी शांत स्थितीत अधिक सक्रिय असतात. हे वाचा -  शरीरात डुकराचं हृदय धडधडल्यानंतर 2 महिन्यांनी…; ‘त्या’ रुग्णाबाबत शॉकिंग बातमी आराम करण्यासाठी, झोप लागण्यासाठी, किंवा तणाव, चिंता कमी करण्यासाठी नाही तर NSDR मदत करतेच. शिवाय, व्यक्तीचा शिकण्याचा वेगदेखील वाढवते. हे आपण योग निद्रा आणि संमोहन दोन प्रकारे साध्य करू शकतो. NSDR करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर झोपा आणि डोळे बंद करा. यानंतर आपलं लक्ष एका गोष्टीवर केंद्रीत करण्याचा प्रयत्न करा. श्वासावरही तुम्ही लक्ष केंद्रीत करू शकता. आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाचा अनुभव घ्या. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा, असं योग निद्रा प्रशिक्षक ट्रेसी स्टॅनली यांनी सांगितलं. हे वाचा -  No Covid: काही व्यक्तींना Coronavirus ने काहीच केलं नाही; काय होतं नेमकं रसायन? योग निद्रा (Yoga Nindra) ही जगाला भारताची देणगी आहे. ऋग्वेदातही याचा उल्लेख आढळतो. योग निद्रेमध्ये जाण्यासाठी शांत आणि कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी चटई टाकावी. यानंतर चटईवर आपल्या पाठीवर झोपावे. एक दीर्घ श्वास घ्यावा. यावेळी श्वास घेताना आपल्या पायाच्या बोटांवर लक्ष केंद्रित करावं. तुमच्या मनात येणारे विचार थांबवण्याचे प्रयत्न करू नका. यानंतर तुमचं लक्ष पायाच्या बोटांपासून गुडघ्याकडे, नंतर मांडीकडे आणा. हीच प्रक्रिया दुसऱ्या पायावर करा. हे करत असताना घसा, छाती इत्यादींवर लक्ष केंद्रित करावं. दीर्घ श्वास घ्यावा आणि काही वेळ याच स्थितीत झोपावं. आता सभोवतालच्या वातावरणावर लक्ष केंद्रित करावं. यानंतर उजव्या अंगावर झोप आणि डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा. आता उठून बसा आणि अलगद डोळे उघडा. असं केल्याने तुम्हाला शांत वाटेल. या संपूर्ण प्रक्रियेस 10-15 मिनिटे लागतात. तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे फार फायदेशीर ठरतं. यामुळे शरीर ताजंतवानं होतं आणि काम करण्याचा उत्साह वाढतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात