नवी दिल्ली, 9 मार्च: कोविड-19 या विषाणूने ग्रस्त झालेली पहिली केस 2019 मध्ये चीनमधील वुहानमध्ये पहिल्यांदा सापडली होती. त्यानंतर या विषणूने संपूर्ण जगाला आपल्या कह्यात घेतलं आणि प्रत्येकाच्या मनात जीवे मरण्याची भीती उत्पन्न केली. अजूनही या विषाणूचे नवनवे व्हेरियंट्स सापडत असून रोगाचा प्रसार सुरूच आहे. मनुष्यजातीला सगळ्यात भीषण असा कोणता धडा आतापर्यंत मिळाला असेल तर तो या कोविड काळाने दिला आहे. हा मानव जातीच्या इतिहासातील काळा पीरिएडही म्हणता येईल. मूळ विषाणूमधून अनेक व्हेरियंट (Variant) म्युटेट होताना दिसत आहेत. कोविड-19 महामारी मानव जातीसाठी सर्वात कठीण ठरली आहे. कोरोनामुळे लोकांना अनेक निर्बंधाचाही सामना करावा लागला. कोविड-19 ने लोकांमध्ये कोणताही भेद केला नाही. त्याने सर्वांनाच वेठीस धरलं. जरी कोविडचा विषाणू स्री पुरूष, तरुण म्हातारा, मुलं-मुली या कोणातच भेदभाव करत नसला तरीही काही जण मात्र या विषाणूपासून दूर राहिले म्हणजे त्यांना दोन-अडीच वर्षांच्या काळात कोविड-19 विषाणूची लागण झाली नाही. या गटातल्या लोकांना No Covid किंवा Never Covid पीपल म्हटलं जातं. No Covid पीपल म्हणजे त्याच वातावरणात, त्याच भीतीच्या सावटाखाली राहूनही ज्यांना कोविडची लागण झाली अशी माणसं.
काय सर्वांना आहे कोरोना व्हॅक्सीनच्या Booster Dose ची आवश्यकता? लवकरच होणार निर्णयलंडनमधील इंपिरिकल कॉलेजने केलेल्या संशोधनात असं लक्षात आलं आहे की No Covid पीपल या गटातल्या व्यक्तींच्या शरीरात T सेल्स (T Cells) या विशिष्ट प्रकारच्या रोगप्रतिकारक पेशींचं प्रमाण अधिक होतं. सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार या संशोधनाच्या प्रमुख डॉ. रिया कुंडू म्हणाल्या, ‘कोविडसदृश लक्षणं असलेल्या सामान्य सर्दीमध्येही त्या व्यक्तीच्या शरीरात आधीपासून असलेल्या टी सेल्सनी त्याचं संरक्षण केलं आणि याच टी-सेल्सचं अतिरिक्त प्रमाण शरीरात असल्याने त्याचा कोविड-19 प्रादूर्भावापासूनही बचाव झाला असावा, असं या संशोधनात दिसून आलं.’
महाभयंकर Coronavirus वर भारी ठरले Bacteria; Covid शी लढण्याचा नवा मार्ग सापडलाया संशोधनात No Covid पीपल आणि कुठलीही लक्षणं दिसली नाहीत (Asymptomatic) पण ज्यांना कोविडची बाधा झाली होती अशा पेशंटच्या अवस्थेत काय फरक होता हेही लक्षात आलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ``टी-सेल्सच्या प्राबल्यामुळे नो कोविड श्रेणीतील लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक प्रतिक्रियाशील असल्याचं दिसून आलं. यामुळे विषाणू शरीरात दीर्घकाळ टिकाव धरू शकत नाही. मात्र दुसरीकडे असिम्प्टोमॅटिक लोकांमध्ये लक्षणं नसतात पण विषाणू शरीरात अस्तित्वात असल्याचं दिसून आलं.``
याच विषयासंबंधी दुसऱ्या एका संशोधनात असं दिसून आलं की जेव्हा विषाणू नवा होता आणि तो SARS-CoV-2 या प्रकारात होता तेव्हा त्याच्याशी लढताना No Covid पीपल गटातील व्यक्तींच्या शरीरातील जीन्सनेही या विषाणूशी लढण्याचं बळ त्यांना दिलं होतं. या गटातील व्यक्तींच्या डीएनएमध्ये असलेल्या HLA (Human Leukocyte Antigen) या जीनचं कॉम्पोझिशन वेगळं होतं असं या संशोधनात लक्षात आलं. No Covid पीपल गटातील लोकांची बळकट प्रतिकारशक्ती आहे हे मान्य केलं तरीही त्यांनी कोविड-19 ची लस घ्यायला हवीच. नवनवे व्हेरियंट येत असल्याने कोविडचा नवा व्हेरियंट No Covid पीपल गटातील व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीला भेदून त्याला बाधित करू शकतो. त्यामुळे सावध रहायलाच हवं.