मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Fatty Liver Disease : ...तर दारू न पिताही तुमचं लिव्हर होतं खराब; दिसतात अशी लक्षणं

Fatty Liver Disease : ...तर दारू न पिताही तुमचं लिव्हर होतं खराब; दिसतात अशी लक्षणं

फॅटी लिव्हर रोग अशा लोकांना देखील होऊ शकतो जे अल्कोहोल पीत नाहीत. याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतात. फॅटी लिव्हर डिसीजमध्ये यकृतामध्ये जादा चरबी जमा होते, ज्यामुळे यकृताच्या सामान्य कार्यावर परिणाम होतो.

फॅटी लिव्हर रोग अशा लोकांना देखील होऊ शकतो जे अल्कोहोल पीत नाहीत. याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतात. फॅटी लिव्हर डिसीजमध्ये यकृतामध्ये जादा चरबी जमा होते, ज्यामुळे यकृताच्या सामान्य कार्यावर परिणाम होतो.

फॅटी लिव्हर रोग अशा लोकांना देखील होऊ शकतो जे अल्कोहोल पीत नाहीत. याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतात. फॅटी लिव्हर डिसीजमध्ये यकृतामध्ये जादा चरबी जमा होते, ज्यामुळे यकृताच्या सामान्य कार्यावर परिणाम होतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 09 नोव्हेंबर : फॅटी लिव्हर डिसीज हा लिव्हरचा असा आजार आहे, ज्यामध्ये चरबी किंवा फॅटचे प्रमाण जास्त असल्याने लिव्हरमध्ये चरबी जमा होऊ लागते. लिव्हर हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो रक्तातील बहुतेक रसायनांवर नियंत्रण ठेवतो आणि पित्त उत्सर्जित करतो. या पित्ताच्या साहाय्याने लिव्हरमध्ये निर्माण होणारा टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. लिव्हर रक्तातील सर्व प्रकारचे हानिकारक पदार्थ शरीरातून काढून टाकते. पोट आणि आतड्यांमधून बाहेर पडणारे सर्व रक्त लिव्हरमधून जाते.

लिव्हरमध्ये अनेक पोषक द्रव्ये साठवण्याची क्षमता असते. याशिवाय ते शरीरासाठी आवश्यक प्रोटीन तयार करते, ज्यामुळे ऊर्जा बनते आणि आपण सर्वजण आपल्या कामासाठी ही ऊर्जा वापरतो. इतका महत्त्वाचा अवयव असल्याने लिव्हरला एक अतुलनीय गुणवत्ता आहे. म्हणजेच, लिव्हर स्वतःच दुरुस्त करते. परंतु जेव्हा चरबीचे प्रमाण खूप वाढते, तेव्हा कधीकधी लिव्हरमध्ये फॅटी लिव्हर रोग होतो. ते घातक ठरू शकते. फॅटी लिव्हर रोग यकृत सिरोसिस होऊ शकते जे घातक आहे.

हाताच्या दुखण्याकडे करू नका दुर्लक्ष; गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे काय?

मेयो क्लिनिकनुसार, फॅटी लिव्हर डिसीजमध्ये लिव्हरमध्ये खूप चरबी जमा होते, ज्यामुळे यकृताच्या कार्यावर परिणाम होतो. फॅटी लिव्हर रोगाचे दोन प्रकार आहेत. एक अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग (AFLD) आणि दुसरा नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. जे लोक भरपूर दारू पितात त्यांना अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज होऊ शकतो, तर जे लोक कमी दारू पितात किंवा पिट नाहीत त्यांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज होऊ शकतो.

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजची लक्षणं

- भूक न लागणे आणि खाण्याची इच्छा कमी होणे. याचे कारणे असू शकते. असे खूप काळ सुरु राहिल्यास अचानक मळमळ, डोकेदुखी आणि उलट्या झाल्यासारखे वाटले तर स्थिती गंभीर होऊ शकते.

- सतत अशक्तपणा फॅटी लिव्हर डिसीजचे लक्षण असू शकते. एका संशोधनानुसार, मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरमधील बदलांमुळे असे होऊ शकते. जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल तर लिव्हरची चाचणी करून घ्यावी.

- या डिसीजचा तुमच्या त्वचेवरही परिणाम होऊ शकतो. संशोधनात असे दिसून आले आहे की, लिव्हरच्या समस्यांमध्ये त्वचा कोरडी होते आणि खाज सुटते. तसेच याचा तुमच्या डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो. यामुळे पिवळेपणा येतो. याला कावीळ म्हणतात.

- फॅटी लिव्हर डिसीज झाल्यास तुमचे वजन कमी होऊ लागते. जर तुमचे वजन अचानक वेगाने कमी होऊ लागले तर ते गंभीर गंभीर आजारांचे लक्षणही असू शकते.

सावधान! मेंदू वृद्ध झाल्याची आहेत ‘ही’ लक्षणं; वयाच्या तिशीनंतर दिसू लागतात बदल

या लोकांना असतो फॅटी लिव्हरचा जास्त धोका?

फॅटी लिव्हर रोगाचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. यकृतात चरबी का जमा होऊ लागते हे तज्ज्ञांना माहिती नाही. परंतु काही लोकांना फॅटी लिव्हर डिसीज होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असेल, त्याला मधुमेह असेल, शरीरातील चरबी जास्त असेल, कोलेस्टेरॉल वाढले असेल, विशेषत: रक्तातील ट्रायग्लिसराइड्स, मेटाबॉलिक सिंड्रोम, महिलांना पीसीओएस, स्लिप अॅप्निया, टाइप 2 मधुमेह, थायरॉईडचा धोका असेल, तर अशा व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हर डिसीज होण्याची शक्यता जास्त असते.

First published:

Tags: Alcohol, Fat, Health, Health Tips, Lifestyle, Weight gain