मुंबई, 03 जून : शरीरात ऊर्जा राखण्यासाठी यकृत चरबी साठवते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे यकृतात अतिरिक्त चरबी साठली तर ही स्थिती आरोग्याला हानी पोहोचवते. फॅटी लिव्हर सहसा दोन कारणांमुळे उद्भवते. पहिले कारण अल्कोहोल-दारूमुळे यकृताचे नुकसान होऊ शकते आणि दुसरे म्हणजे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर (Fatty liver problem) होणे. हा आजार बरा करण्यात आणि आयुष्य परत रुळावर आणण्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. काही खाद्यपदार्थ आहेत जे फॅटी लिव्हरमध्ये प्रभावी आहेत, ते खाणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आपला डाएट चार्ट तयार करा. आज आपण काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या फॅटी लिव्हरमध्ये टाळल्या पाहिजेत. फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊया. MedicalNewsToday च्या माहितीनुसार, गोड पदार्थांचे अधिक सेवन केल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढते, त्यामुळे शरीरातील लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी साठते, त्यामुळे शारीरिक समस्या वाढतात. अल्कोहोलचे सेवन केल्याने यकृताचेही खूप नुकसान होऊ शकते. यामुळे फॅटी लिव्हर तसेच शरीरातील इतर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे दारूचे सेवन टाळावे. रिफाइंड धान्यांवर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केली जाते. त्यांच्यामध्ये रक्तातील साखर वाढण्याचा धोका जास्त असतो. म्हणून आपल्या आहारातून रिफाइंड ग्रेन वगळणे चांगले होईल. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम जर तुम्ही जास्त तळलेले किंवा प्रक्रिया केलेले अन्न खाल्ले तर फॅटी लिव्हरची समस्या देखील यामुळे दिसू शकते, म्हणून तुमच्या आहारात घरगुती अन्न आणि फळे आणि भाज्या समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार ऑर्गन मीट, लिव्हर मीट इत्यादी सॅच्युरेटेड फॅट्समुळेही शरीरातील फॅटचे प्रमाण वाढते, त्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास असलेल्या रुग्णांनी मांस खाणे बंद करावे. तसेच या सर्वांशिवाय डॉक्टरांना भेटा आणि त्यांच्या सल्ल्यानेच तुमचा आहार आणि दिनचर्या ठरवा.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)