जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / हाताच्या दुखण्याकडे करू नका दुर्लक्ष; गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

हाताच्या दुखण्याकडे करू नका दुर्लक्ष; गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

Hand Pain

Hand Pain

हाताच्या हाडांमध्ये दुखत असेल, तर त्यामागचं कारण काय असू शकते व त्यावर काय उपचार करणं गरजेचं आहे, याबद्दल जाणून घेऊ या.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 08 नोव्हेंबर : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हात, पाय, गुडघे, सांधे किंवा कंबर दुखण्याच्या समस्येनं त्रस्त असणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. ही समस्या विशिष्ट वयानंतर होणं स्वाभाविक आहे; मात्र सध्याच्या विचित्र जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयामध्ये अनेकांना सांधेदुखीच्या समस्येला सामोरं जाण्याची वेळ येत आहे. अनेकदा हातामध्ये वेदना होतात; पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं; मात्र हाताच्या हाडांमध्ये वेदना होत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबत माहिती देणारं वृत्त दिलं आहे. हात हा शरीरातला महत्त्वाचा अवयव आहे. तो नीट काम करीत नसेल, तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कारण आपल्याला जवळपास सर्वच कामांसाठी हाताची आवश्यकता असते. वैयक्तिक काम असो, ऑफिसचं काम असो किंवा कारखान्यातलं काम, ते करण्यासाठी हात मजबूत असले पाहिजेत. हातामध्ये वेदना होत असतील तर त्यांचा दैनंदिन कामांवरदेखील वाईट परिणाम होतो. हाताचं हे दुखणं स्नायूंमुळे किंवा हाडांमुळे असू शकतं. हाताच्या स्नायूंचं दुखणं सर्वसामान्य असलं तर ते जात; पण हाताच्या हाडांत दुखत असेल, तर गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. हाताच्या हाडांमध्ये दुखत असेल, तर त्यामागचं कारण काय असू शकते व त्यावर काय उपचार करणं गरजेचं आहे, याबद्दल जाणून घेऊ या. हेही वाचा - Diet For Woman : तुमच्या वयानुसार फॉलो करा हा डाएट; आयुष्यभर हेल्दी आणि फिट राहाल कार्पेल टनेल सिंड्रोम कार्पेल टनेल सिंड्रोम हे हातांच्या हाडांमध्ये वेदना होण्यासाठी महत्त्वाचं कारण आहे. कार्पेल टनेल म्हणजे हाताच्या लिगामेंट्स आणि हाडं यांच्यामधली जागा. तिथे सूज आल्यानं हाताला वेदना होऊ शकतात. या आजाराची लक्षणं हळूहळू दिसू लागतात. जसजसं दुखणं वाढतं, तसतशी त्याची लक्षणंही वाढतात. अशा स्थितीत हाताच्या हाडांमध्ये वेदना होतात.

    News18लोकमत
    News18लोकमत

    संधिवात हाताच्या हाडांमध्ये दुखण्याचं कारण संधिवात हेदेखील असू शकतं. संधिवात शरीराच्या अनेक भागांवर परिणाम करतो. ऑस्टियो व हृमॅटॉइड प्रकारचा संधिवात हाताच्या हाडांना जास्त नुकसान पोहोचवतो. संधिवातची समस्या असल्यास हातांच्या सांध्यांना सूज, वेदना आणि जडपणा येतो. हातामध्ये असतात 27 हाडं हातामध्ये अनेक स्नायू आणि हाडं असतात. जेव्हा त्यात कोणतीही समस्या उद्भवते, तेव्हा हात दुखू लागतात. हातात 27 हाडं असतात. त्यांना दुखापत झाल्यास किंवा अन्य कारणांमुळे या हाडांमध्ये वेदना होऊ शकतात. हातामध्ये वेदना होत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच उपचार करणं फायद्याचं ठरेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात