जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Excercise during Period : मासिक पाळीच्या प्रत्येक समस्येपासून मिळेल आराम; त्या दिवसात करा 'हा' व्यायाम

Excercise during Period : मासिक पाळीच्या प्रत्येक समस्येपासून मिळेल आराम; त्या दिवसात करा 'हा' व्यायाम

Excercise during Period : मासिक पाळीच्या प्रत्येक समस्येपासून मिळेल आराम; त्या दिवसात करा 'हा' व्यायाम

अनेक महिलांना वाटतं की जर त्यांनी मासिक पाळी दरम्यान व्यायाम केला तर त्यांच्या वेदना वाढतील.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 ऑक्टोबर : मासिक पाळीच्या काळात कोणत्याही महिलेला थकवा आणि वेदना जाणवणे हे एक सामान्य लक्षण आहे. मासिक पाळीचे दिवस प्रत्येक स्त्री किंवा मुलीसाठी सर्वात वेदनादायक असतात. सतत रक्तस्त्राव होत असल्याने खूप अशक्तपणाही जाणवतो. अशा परिस्थितीत महिलांना शक्य तितका आराम करायला आवडते. पण महिलांनी मासिक पाळीच्या काळात व्यायामाचा नियम मोडू नये. अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना असे वाटते की जर त्यांनी मासिक पाळी दरम्यान व्यायाम केला तर त्यांच्या वेदना वाढतील. हा चुकीचा विचार आहे. नियमित व्यायाम केल्याने मानसिक, शारीरिक आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळू शकतो. याचे इतरही अनेक फायदे आहेत, परंतु काही गोष्टींपासून अंतर ठेवणेही आवश्यक आहे.

लघवीला जळजळ होत असल्यास करु नका दुर्लक्ष; असू शकतं मोठ्या आजाराचं संकेत

मासिक पाळीदरम्यान व्यायामाचे फायदे

PMS लक्षणे कमी होतील Flow.health.com नुसार, काही शारीरिक आणि रासायनिक बदल मासिक पाळी दरम्यान होतात. ज्यावर व्यायामाने नियंत्रण ठेवता येते. व्यायाम केल्याने एंडोर्फिन हार्मोन रिलीज होते, ज्याला फील-गुड हार्मोन्स म्हणतात. यामुळे चिंता, नैराश्य, वेदना आणि मूड स्विन्ग्सपासून पासून आराम मिळतो. अशा परिस्थितीत दररोज एरोबिक व्यायाम केल्यास वेदना कमी होण्यास मदत होते. मासिक पाळीच्या वेळी जेवढा व्यायाम करणे शक्य होईल तेवढाच व्यायाम करा.

News18लोकमत
News18लोकमत

क्रॅम्पिंग कमी होईल मासिक पाळी दरम्यान व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि पीरियड क्रॅम्प्स कमी होण्यास मदत होते. मासिक पाळीत व्यायाम करून एनाल्जेसियापासूनही सुटका मिळू शकते. मासिक पाळी नियमित होईल अनेक महिलांची मासिक पाळी अनियमित असल्याची तक्रार असते. मासिक पाळीच्या दरम्यान व्यायाम केल्याने या समस्येपासून सुटका मिळू शकते. हे पीरियड्स कॅलेंडर ट्रॅकवर ठेवते. ऊर्जा टिकेल मासिक पाळीदरम्यान आळस आणि थकवा सामान्य आहे. पीरियड्समध्ये नियमित व्यायाम केला तर दिवसभर शरीरात एनर्जी टिकून राहते. मूड सुधारेल मासिक पाळीदरम्यान महिलांमध्ये तणाव संप्रेरक कॉर्टिसॉल लक्षणीयरित्या वाढते. व्यायामामुळे ते संतुलित होण्यास मदत होते, ज्यामुळे मूड देखील चांगला होतो.

Too Much Exercise Side Effects : तुमची एक चूक आणि तुम्हाला फिट ठेवणारा व्यायामही घेऊ शकतो तुमचा जीव

मासिक पाळीत व्यायाम करताना घ्या ही काळजी - मासिक पाळीत व्यायाम करताना शरीराला जास्त ताण देऊ नका. - मासिक पाळी दरम्यान जास्त वेळ व्यायाम करणे टाळा. - जेव्हा तुम्ही मासिक पाळी दरम्यान व्यायाम कराल तेव्हा त्याचा कालावधी अर्धा तास ठेवा. - व्यायाम करताना मळमळ होणे, उलट्या होणे यासारख्या समस्या असल्यास व्यायाम करणे थांबवावे. - पीरियड्स दरम्यान, शरीराला जेवढा थकवा सहन होतो तेवढाच व्यायाम करा, त्यापेक्षा जास्त नाही. - पीरियड्स दरम्यान व्यायाम करणं बऱ्याच अंशी फायदेशीर आहे, पण थोडी खबरदारी घेतल्यास त्याचा अधिक फायदा होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात