मराठी बातम्या /बातम्या /goa /Congress ला बसणार मोठा झटका, गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस TMC सोबत युती करण्याच्या तयारीत

Congress ला बसणार मोठा झटका, गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस TMC सोबत युती करण्याच्या तयारीत

आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षानंही स्वबळाचा नारा दिला आहे.

आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षानंही स्वबळाचा नारा दिला आहे.

आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षानंही स्वबळाचा नारा दिला आहे.

गोवा, 25 नोव्हेंबर: महापालिका (Municipal Election), नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका काँग्रेस (Congress) आता स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वत: याबाबतचे निर्देश दिले. त्यानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षानंही स्वबळाचा नारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं गोव्यात (Goa) काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा झटका देण्याची तयारी केली आहे.

एनसीपी नेत्यांच्या एक वर्ग ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी (AAP) यांच्यासोबत गोव्यात तिसऱ्या आघाडीसाठी चर्चेचा सल्ला देत आहेत.

हेही वाचा-  Terror Alert! आयएसआयच्या ट्रार्गेटवर RSSचे नेते?, भारतात पाठवले 11 टिफिन बॉम्ब

एनसीपीचे सरचिटणीस आणि गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी AICC प्रभारी दिनेश गुंडू राव, निवडणूक निरीक्षक पी चिदंबरम आणि GPCC नेत्यांना युतीच्या परिस्थितीबद्दल त्यांच्या पक्षाची नाराजी सांगितली आहे. काँग्रेसचा काळ संपत चालला आहे, असे पटेल यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं सांगितलं, आम्ही ऐकले आहे की गोव्यातील काँग्रेस नेते त्यांच्या निवडणुकीच्या रणनीतीवरुन आपसात वाद घालत आहेत आणि AICC आतापर्यंत ते वाद सोडवण्यात असमर्थ राहिली आहे. राष्ट्रवादीने खूप वाट पाहिली आहे, पण आम्ही अंतहीन वाट पाहू शकत नाही.

हेही वाचा- विषारी वायू पसरल्यानं दहशत, काही लोकांच्या डोळ्यात जळजळ तर डझनभर लोक बेशुद्ध

पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाओ यांच्यासह गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी टीएमसीसोबत युतीसाठी चर्चेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, शरद पवार भाजपविरोधी आणि बिगर काँग्रेस तिसरी आघाडी करण्याची शक्यता आहे. ज्यात TMC, AAP, NCP आणि इतरांचा समावेश असेल.

राव यांनी नुकतंच सांगितलं होतं की, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) आणि महाराष्ट्र गोमंतक पार्टी (MGP) यांच्याशी युती करण्यासाठी चर्चा करेल. मात्र गोव्यातील अनेक वरिष्ठ काँग्रेस नेते राष्ट्रवादी आणि GFP सोबत युती करण्याबाबत विभागले आहेत. काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस स्वबळावर चांगली कामगिरी करू शकते, असं राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीला विरोध करणाऱ्यांचे मत आहे.

हेही वाचा- याला म्हणतात प्रामाणिकपणा, पर्यटकाचं 5 लाखाचं ब्रेसलेट परत करण्यासाठी केला 90 किमी प्रवास

GFP सोबतच्या युतीला विरोध करणार्‍या एका गटानं त्यांचे नेते विजय सरदेसाई यांनी काँग्रेसशी विश्वासघात केला आणि 2017 च्या निवडणुकीनंतर भाजपला सरकार स्थापन करण्यात मदत केली असे नमूद केले.

First published:

Tags: Goa, Sharad Pawar (Politician), काँग्रेस