जाहिरात
मराठी बातम्या / देश / विषारी वायू पसरल्याची दहशत, 12 हून अधिक लोकांच्या डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास

विषारी वायू पसरल्याची दहशत, 12 हून अधिक लोकांच्या डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास

विषारी वायू पसरल्याची दहशत, 12 हून अधिक लोकांच्या डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास

कथित विषारी वायू (Poisonous Gas) पसरल्यानं दहशत माजली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर: एक मोठी बातमी समोर येतेय. दिल्लीतील (Delhi) आरके पुरममध्ये कथित विषारी वायू (Poisonous Gas) पसरल्यानं दहशत माजली आहे. येथे लोकांच्या डोळ्यात जळजळ (Irritation in Their Eyes) होत असून त्यांना श्वास घेण्यास त्रास (Difficulty In Breathing) होऊ लागला. लोकांनी दावा केला आहे की, येथे 12 हून अधिक लोक बेशुद्ध झाले आहेत. मात्र, अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत ती अफवा आहे की वास्तव, हे कळत नाही. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, एकता विहारच्या शेजारी असलेल्या सीआरपीएफ कॅम्प किंवा एनएसजी कॅम्पमधून विषारी वायू सोडण्यात आला होता. यानंतर येथे गोंधळ उडाला. लोकांच्या डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. लोक घराबाहेर पडून रस्त्यावर आले आणि उभे राहिले. काय होतंय ते कोणालाच समजत नव्हतं. डझनभर लोक बेशुद्ध लोकांनी सांगितलं की, विषारी वायूमुळे अनेक लोक बेशुद्ध झाले, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते महिपाल गौतम पोहोचले आणि त्यांनी लोकांना या विषारी वायूमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून मास्कचे वाटप केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. हेही वाचा-  या राज्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांसह 12 आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

 माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि 6 रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचल्या. तेथून लोकांना रुग्णालयात नेण्यात आलं. सर्वांची प्रकृती ठीक आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस सीआरपीएफ आणि एनएसजी कॅम्पमध्ये जाऊन तपास करत आहेत. ही घटना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली, त्यावेळी लोक जेवण करून झोपण्याच्या तयारीत होते. मात्र या घटनेनंतर लोकांमध्ये घबराट पसरली. या प्रकरणाचा तपास केल्यानंतरच काही सांगता येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: delhi
  • First Published :
जाहिरात
जाहिरात