मराठी बातम्या /बातम्या /देश /

ईमानदारी! पर्यटकाचं 5 लाखाचं ब्रेसलेट परत करण्यासाठी घोड्यावाल्याची धडपड, केला 90 किमी प्रवास

ईमानदारी! पर्यटकाचं 5 लाखाचं ब्रेसलेट परत करण्यासाठी घोड्यावाल्याची धडपड, केला 90 किमी प्रवास

प्रामाणिकपणाचं (Best Example Of Honesty) उत्तम उदाहरण समोर आलं आहे.

प्रामाणिकपणाचं (Best Example Of Honesty) उत्तम उदाहरण समोर आलं आहे.

प्रामाणिकपणाचं (Best Example Of Honesty) उत्तम उदाहरण समोर आलं आहे.

  • Published by:  Pooja Vichare

श्रीनगर, 25 नोव्हेंबर: प्रामाणिकपणाचं (Best Example Of Honesty) उत्तम उदाहरण समोर आलं आहे. 22 नोव्हेंबर रोजी सुरतचे रहिवासी घनश्याम भाई आपल्या कुटुंबासह काश्मीरमध्ये फिरत होते. पहलगामला फिरण्याच्या नादात त्यांचे पाच लाखांचं सोन्याचं ब्रेसलेट कुठेतरी पडलं. फिरून झाल्यानंतर ते श्रीनगरला पोहोचले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, त्याचं मौल्यवान ब्रेसलेट कुठेतरी पडलं आहे. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. संपूर्ण कुटुंबाने त्यांची बॅग तपासली पण ब्रेसलेट कुठेच सापडले नाही. पहलगाममध्ये फिरत असताना ब्रेसलेट कुठेतरी पडल्याची खात्री पटली. 5 लाखांचे दागिने कोणाला मिळालं तरी ते काही परत करणार नाही, असं त्यांच्या मनात आलं.

पण पहलगामचे घोडेस्वार अफरोज अहमद यांनी प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण दिलं आहे. ज्यांनी घनश्याम भाई आश्चर्यचकित झालेत.

'कोणतं ब्रेसलेट सापडलं का?'

लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या तणावात घनश्याम यांनी पहलगाममधील आपल्या टुरिस्ट ऑपरेटरला फोन केला आणि सांगितले की, त्याचे मौल्यवान ब्रेसलेट पहलगाममध्ये कुठेतरी पडले आहे. ऑपरेटरने लगेच घोडेस्वार संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद रफी यांना विचारले, 'वाटेत कोणा घोडेस्वाराला ब्रेसलेट सापडलं आहे का?'

हेही वाचा- Terror Alert! आयएसआयच्या ट्रार्गेटवर RSSचे नेते?, भारतात पाठवले 11 टिफिन बॉम्ब

पहलगाममध्ये आपल्या घोड्यावर पर्यटकांना चालवणारे अफरोज अहमद मीर यांनी सांगितलं की, 'आम्ही कामावरून परतत असताना आम्हाला एक ब्रेसलेट दिसलं. मी माझ्या मित्रांना आणि असोसिएशनच्या अध्यक्षांना याबद्दल सांगितले. पण ते कोणाचे आहे हे आम्हाला माहीत नव्हतं.

'आपण प्रामाणिक राहिलो नाही तर आमचीही फसवणूक होईल'

मोहम्मद रफी म्हणाले की, गुजरातच्या सुरतमध्ये राहणाऱ्या एका पर्यटकाचा काही वेळात फोन आला की त्याची सोन्याची एक ब्रेसलेट हरवलं आहे. पण ते ज्या ब्रेसलेटबद्दल विचारत आहेत तेच आहे का हे आम्हाला पडताळून पाहायचे होते. यानंतर त्यांनी ब्रेसलेटचा फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि आम्हाला मिळालेले ब्रेसलेट फोटोशी जुळत होतं.

22 नोव्हेंबरलाच रात्री 9 वाजता अफरोज आणि मोहम्मद दागिने परत करण्यासाठी पहलगामहून निघाले. 90 किमीचा प्रवास करून दोघेही श्रीनगरला पोहोचले.

'काश्मिरी लोक खूप प्रामाणिक आहेत'

रफी आणि अफरोज 5 लाख रुपयांचे ब्रेसलेट घेऊन श्रीनगरला पोहोचले तेव्हा घनश्याम भाई आणि बाकीच्या कुटुंबाचा उदास चेहरा हास्याने उजळला. सुरतचा रहिवासी मुकेश सांगतात की, 'आम्ही काश्मीरला फिरायला आलो होतो. पहलगाम या पर्यटन स्थळातील हॉटेलमध्ये मुक्काम केला. माझ्या मुलाच्या हातातून सोन्याचं ब्रेसलेट पडले, घोडे बंधू रफी आणि अफरोज यांना ते ब्रेसलेट मिळालं. आम्ही श्रीनगरला परत आलो होतो, पण ताहिर आणि बिलाल भाई या टॅक्सी चालकांनी पहलगाममधील फोनवरून संपर्क साधला, ते मिळाल्यावर ते ब्रेसलेट परत करण्यासाठी प्रामाणिकपणे श्रीनगरला परत आले. या घटनेनंतर काश्मीरमधील जनता खूप प्रामाणिक आहे याची खात्री पटली आहे.

हेही वाचा- विषारी वायू पसरल्यानं दहशत, काही लोकांच्या डोळ्यात जळजळ तर डझनभर लोक बेशुद्ध

घोडेस्वार अफरोज आणि मोहम्मद भाई सांगतात की, 'आम्ही पर्यटकांशी प्रामाणिक राहिलो, तरच आमची कामं चांगलं होईलं. जर तुम्ही प्रामाणिकपणे चालला नाही तर तुमची फसवणूक होईल.

First published:

Tags: Jammu and kashmir