Home /News /goa /

Goa Assembly Election: 2027 ला उत्पल पर्रिकरांना लॉन्च करणार BJP, समोर ठेवले पर्याय

Goa Assembly Election: 2027 ला उत्पल पर्रिकरांना लॉन्च करणार BJP, समोर ठेवले पर्याय

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) भारतीय जनता पक्षाने (BJP) गुरुवारी 34 उमेदवारांची नावे जाहीर केली. विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांचे नाव या यादीत नाही आहे.

पुढे वाचा ...
    पणजी, 21 जानेवारी: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) भारतीय जनता पक्षाने (BJP) गुरुवारी 34 उमेदवारांची नावे जाहीर केली. विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल (Utpal Parrikar) यांचे नाव या यादीत नाही आहे. मात्र भाजपकडून तिकीट न मिळाल्यानं आधीच नाराजी व्यक्त करणाऱ्या उत्पल यांना आणखी दोन जागांची ऑफर देण्यात आल्याचं वृत्त आहे. दरम्यान असंही म्हटलं जात आहे की, पक्षाने 2027 मध्ये लॉन्चिंगशी संबंधित योजना देखील त्यांच्याशी शेअर केली आहे. उत्पल यांना त्यांच्या वडिलांच्या पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. NDTV च्या वृत्तानुसार, भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते की, उत्पल यांना आणखी दोन पर्याय देण्यात आले आहेत. त्यांनी ते पर्याय स्वीकारावे असं आम्हाला वाटतं, असे ते म्हणाले. मुंबई NCBची गोव्यात छापेमारी; एका विदेशी महिलेसह दोघींना अटक, 25 किलो गांजा जप्त भाजपने पर्रिकर कुटुंबाला नेहमीच आदर दिला आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या माहितीनुसार असे म्हटले आहे की, पक्षाने उत्पल यांच्यासोबत एकाधिक पर्याय शेअर केले आहेत आणि त्यांना आश्वासन दिले आहे की ते हरले तरीही त्यांना संघटनेत स्थान दिलं जाईल. आम्ही त्यांच्यासोबत 2027 मध्ये चांगल्या लॉन्चसह 5 वर्षांची योजना शेअर केली आहे. त्यावर चर्चा सुरू आहे आणि आशा गमावलेली नाही, असंही सुत्रांनी सांगितलं आहे. इतर पक्षांकडून तयारी सुरु अलीकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्पल यांना आम आदमी पक्षाकडून लढण्याची ऑफर दिली आहे. गुरुवारी केजरीवाल यांनी ट्विट केलं की, गोव्यातील जनतेला फार वाईट वाटते की भाजपने पर्रिकर कुटुंबासह वापरा आणि फेकण्याचे धोरण स्वीकारलं आहे. मनोहर पर्रिकर यांचा मी नेहमीच आदर करतो. AAP मध्ये सामील होण्यासाठी आणि तिकिटावर लढण्यासाठी उत्पल जी यांचे स्वागत आहे. Exclusive Video: घेराव घालत रस्त्यात थांबवली कार, हल्लेखोरांकडून 10 राऊंड फायरिंग गेल्या आठवड्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनीही विरोधी पक्षांना अपक्ष म्हणून उत्पल यांच्या लढ्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. अहवालात भाजपच्या सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे की, आम्हाला आशा आहे की ते थोड्या फायद्यासाठी पक्षाची फसवणूक करणार नाहीत. पर्रिकर तुम्हाला भविष्य नाही. भाजप हे त्यांचे घर आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत पर्रिकर यांचे पणजी भागात 25 वर्षे वास्तव्य होते. बाबूश हे त्यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. पर्रिकर यांच्या निधनानंतर बाबूश यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पोटनिवडणूक जिंकली होती, पण नंतर ते भाजपमध्ये दाखल झाले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Election, Goa

    पुढील बातम्या