Home /News /goa /

मुंबई NCBची गोव्यात छापेमारी; एका विदेशी महिलेसह दोघींना अटक, 25 किलो गांजा जप्त

मुंबई NCBची गोव्यात छापेमारी; एका विदेशी महिलेसह दोघींना अटक, 25 किलो गांजा जप्त

मुंबई एनसीबीने गोव्यात एक मोठी कारवाई (Mumbai ncb raid in Goa) केली आहे. अधिकाऱ्यांनी एका विदेशी महिलेसह दोघींना अटक केली असून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    पणजी, 21 जानेवारी: मागील काही दिवसांपासून मुंबईसह देशात अनेक ठिकाणी अमली पदार्थांच्या तस्करीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई एनसीबीने कोल्हापुरातील एका फार्म हाऊसवर छापेमारी करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता. ही घटना ताजी असताना मुंबई एनसीबीने गोव्यात एक मोठी कारवाई (Mumbai NCB raid in Goa) केली आहे. मुंबई आणि गोवा एनसीबीने (Goa NCB) काल संयुक्तपणे उत्तर गोव्यातील अर्पोरा (Arpora) याठिकाणी छापेमारी केली आहे. यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन महिलांना अटक केली (2 female drug peddler arrested) असून यांच्याकडून जवळपास 25 किलो गांजा आणि MDMA च्या काही गोळ्या जप्त केल्या (Seized 25 kg Cannabis and MDMA tablets) आहेत. अटक केलेल्या महिलांमध्ये एक महिला विदेशी असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित दोघींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने दोघींनाही न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. या घटनेचा पुढील तपास मुंबई एनसीबी आणि गोवा एनसीबी संयुक्तपणे करत आहेत. हेही वाचा-भरपूर शिकला पण वाया गेला; कौमार्यभंगाच्या कारणातून पुण्यातील तरुणीचा अमेरिकेत छळ तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे मुंबई एनसीबी आणि गोवा एनसीबीच्या टीमने संयुक्तपणे काल जुना गोवा आणि उत्तर गोव्यातील बनस्तारीम आणि पोंडा याठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत एनसीबीने दोन महिला तस्करांना रंगेहाथ अटक केली आहे. आरोपी महिलांकडून पोलिसांनी 25 किलो गांजासह MDMA च्या काही टॅबलेट्स जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींमधील एक महिला विदेशी आहे. हेही वाचा-झोपेतच केला घात; पत्नीने अपंग पतीला दिला भयंकर मृत्यू,कोल्हापुरला हादरवणारी घटना आरोपी महिला तस्करांना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी महिल्यांच्या चौकशीत अमली पदार्थाचं मोठं जाळं उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विदेशी महिला कोणत्या देशाची आहे? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Goa, Mumbai News, NCB

    पुढील बातम्या