हरियाणा, 21 जानेवारी: हरियाणातील अंबाला (Ambala, Haryana) येथे भरदिवसा रस्त्यात झालेल्या गुंडगिरीची घटना समोर आली आहे. जिथे हल्लेखोरांनी एका कारला घेराव घातला आणि त्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. गुंडगिरी आणि गोळीबाराची ही घटना घटनास्थळावर लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली (Captured On CCTV Camera) आहेत. या घटनेत गोळी लागल्यानं एका तरुणाचा जागीच (young man died) मृत्यू झाला. त्याचवेळी दुसऱ्या तरुणाला PGIमध्ये रेफर करण्यात आलं आहे. हरियाणाच्या अंबालामधील हल्लेखोऱ्यांचे लाईव्ह फोटो समोर आले आहेत. जिथे दिवसाढवळ्या दुष्कृत्यांनी एका कारला घेरलं आणि त्यावर गोळीबार केला. घटना अंबाला-जगाधरी हायवेची आहे, जिथे संध्याकाळी पंजाब नंबरच्या काळ्या रंगाच्या वेर्ना कारला दिल्ली क्रमांकाच्या पांढऱ्या इको स्पोर्ट कारमधून आलेल्या हल्लेखोऱ्यांनी घेरलं. कारमधील तरुण काही रिअॅक्श देण्याआधीच हे पाहून हल्लेखोरांनी कारमधील प्रवाशांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. हल्लेखोरांकडून 10 राउंड फायर CCTV कॅमेऱ्यात कैद झालेली हे फुटेज या आरोपींना कायद्याचा धाक नसल्याची साक्ष देत आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळ गाठून जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल केले. जिथे एका तरुणाचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सुमारे 10 राउंड गोळीबार करण्यात आला आहे.
ही घटना भरदिवसा भररस्त्यात घडली आहे. गोळीबाराच्या घटनेची महिती देताना डॉक्टरांनी सांगितलं की,संध्याकाळी दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी एकाचा आधीच मृत्यू झाला होता. तर दुसऱ्याची गंभीर स्थिती पाहता, त्याला प्राथमिक उपचार देऊन चंदीगड पीजीआयमध्ये रेफर करण्यात आलं आहे. जखमी व्यक्तीला सुमारे 4 ते 5 गोळ्या लागल्या आहेत.