जयपूर, 7 डिसेंबर : कोरोनाचे निर्बंध उठवण्यात आल्याने देशभरात लग्नांचा धुमधडाका सुरू झाला आहे. सध्या देशभरात बॉलिवूड कपल कतरिना (Katirna kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal)यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. राजस्थानमधील (Rajasthan) सवाई माधवपूर (Sawai madhopur) या ठिकाणी त्यांचा शाही विवाहसोहळा 9 डिसेंबरला संपन्न होत आहे. राजस्थान हे अनेकांच्या शाही विवाह सोहळ्याचं ठिकाण असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण, यापाठीमागचं माहिती आहे का? चला जाणून घेऊया.
राजस्थानचा वालुकामय प्रेदश शाही विवाहाच्या चाहत्यांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. म्हणूनच उदयपूर (Udaipur), जयपूर (jaipur), जैसलमेर (Jaisalmer), जोधपूर (Jodhpu आणि पुष्कर ही थीम बेस्ड असलेल्या लग्नासाठी सर्वोत्तम ठिकाणे आहेत. हत्ती, घोडे, उंट सोबत गाड्या, शाही मिरवणूक सर्वांना मंत्रमुग्ध करते. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची चर्चा यामुळेच जोरात सुरू आहे.
कतरिना आणि विकी कौशल यांचा विवाह सवाई माधवपूर येथील 14व्या शतकातील बरवारा किल्ल्यावर होणार आहे. याआधीही अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी लग्नासाठी राजस्थान हे ठिकाण निवडले आहे. यात केवळ बॉलीवूड स्टार्सच नाही तर अनेक बडे उद्योगपतीही यात सामील आहेत. जाणून घेऊया अशा बिझनेस टायकून ज्यांनी इथे सात फेऱ्या मारल्या आहेत..
आपली बहुरंगी संस्कृती आणि विवाह सोहळ्याची खासियत विदेशी पर्यटकांना देखील आकर्षित करते. तसेच हिंदू रितीरिवाजांनुसार केलेले लग्न अधिक टिकाऊ असल्याचे ते मानतात, त्यामुळे दरवर्षी येथील इव्हेंट कंपन्या लग्नाच्या मोसमात खूप व्यस्त असतात. भव्य हवेल्या आणि महालांच्या पार्श्वभूमीवर विविध रंगांनी सजवलेला लग्नमंडप, शहनाई आणि वैदिक मंत्रांचा आवाज या वाळूच्या भूमीत लग्न करण्याची इच्छा अधिक तीव्र करतो.
Ex Girfriend च्या सुरक्षेसाठी सलमानच आला पुढे; कॅटच्या लग्नात बॉडीगार्ड....
राजस्थानमध्ये राजा-महाराजांच्या लग्नाचा अनुभव
राजस्थानच्या हेरिटेज प्रोपर्टी, भव्य राजवाडे, किल्ले, खाद्यपदार्थ, शांतता आणि संस्कृतीचा प्रत्येकजण चाहता आहे. राजस्थानमध्ये लग्न करणाऱ्या जोडप्यांना खऱ्या राजेशाही शैलीचा अनुभव घेण्याचे हे एक कारण आहे. एखाद्या राजा-महाराजाचं लग्न होतंय असं दिसतंय. इथल्या वास्तू इतक्या मेंटेन आहेत, की आपल्याला इतिहासात गेल्याचा अनुभव येईल.
राजवाडे, किल्ले, हवेल्या हॉटेलमध्ये रुपांतरीत
राजस्थानातील जवळपास प्रत्येक शहरात, पूर्वजांची आठवण करून देणारे हवेल्या, किल्ले आणि राजवाडे पाहायला मिळतील. बहुतेक मोठ्या हवेल्या आणि किल्ल्यांचे रूपांतर आता पंचतारांकित हॉटेल्स आणि लक्झरी रिसॉर्ट्समध्ये झाले आहे. राजवाडा-किल्ल्यांचे नूतनीकरण झालं आहे. पण मूळ रचना बदलली नाही. हेच सर्वांना मोहित करणारा आहे.
राजस्थानमध्ये लग्न करण्याचे आणखी एक कारण म्हणजे वाहतुकीची साधने सहज उपलब्ध आहेत. जयपूर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, जैसलमेर, रणथंबोर, पुष्कर आणि मांडवा या ठिकाणांना लग्नासाठी पसंती दिली जात आहे. ही सर्व ठिकाणे हवाई, रस्ते आणि रेल्वे मार्गाने सहज उपलब्ध आहेत.
राजस्थानमध्ये रॉयल लोकेशनसह पाहुण्यांसाठी पाच हॉटेल्स आहेत. जयपूरमध्ये रामबाग पॅलेस, ताज, ओबेरॉय, ले मेरिडियन, फायर माउंट, जोधपूरमधील उम्मेद भवन, उदयपूरमधील जग मंदिर, ताज अरावली, रॅडिसन, बिकानेरमधील मॅरियट, सूर्यगढ पॅलेस आणि लक्ष्मी विलास यांसारख्या आलिशान हॉटेल्सच्या सुविधा आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Katrina kaif, Vicky kaushal, Wedding couple