मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /विकी-कतरीना बनणार अनुष्का-विराटचे शेजारी! नव्या घरात होणार अभिनेत्रीचा गृहप्रवेश

विकी-कतरीना बनणार अनुष्का-विराटचे शेजारी! नव्या घरात होणार अभिनेत्रीचा गृहप्रवेश

  बॉलिवूड स्टार विकी कौशल   (Vicky Kaushal)   आणि कतरिना कैफ   (Katrina Kaif)   एका भव्य सोहळ्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. 7 ते 9 डिसेंबर दरम्यान राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील चौथ का बरवारा (Chauth Ka Barwara) शहरात हा विवाह सोहळा   (Wedding ceremony)   पार पडणार आहे.

पुढे वाचा ...

     मुंबई, 7 डिसेंबर-   बॉलिवूड स्टार विकी कौशल   (Vicky Kaushal)   आणि कतरिना कैफ   (Katrina Kaif)   एका भव्य सोहळ्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. 7 ते 9 डिसेंबर दरम्यान राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील चौथ का बरवारा (Chauth Ka Barwara) शहरात हा विवाह सोहळा   (Wedding ceremony)   पार पडणार आहे. एका अत्याधुनिक रिसॉर्टमध्ये रूपांतरित झालेला आणि 700 वर्षांचा वारसा असलेला सिक्स सेन्सेस फोर्ट (Six Senses Fort) या नेत्रदीपक सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. सोमवारी (6 डिसेंबर 2021) सायंकाळी विकी आणि कतरिना आपल्या कुटुंबासह या ठिकाणी पोहोचले आहेत. पाहुण्यांपैकी कबीर खान  (Kabir Khan)  पत्नी मिनी माथूर आणि नेहा धुपिया पती अंगद बेदीसह याठिकाणी दाखल झाली आहे.

    लग्नसोहळा पार पडण्यापूर्वी  हाती एक महत्त्वाची माहिती आली आहे. लग्नानंतर नववधू कतरिना जुहूतील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये (Juhu apartment) गृहप्रवेश करणार आहे. विकी कौशलनं यावर्षी जुलै महिन्यात जुहूतील 'राजमहल' (Rajmahal) या अल्ट्रा लक्झुरियस (ultra-luxurious) आलिशान इमारतीचा आठवा मजला भाड्यानं घेतला आहे. लग्नानंतर दोघे याच ठिकाणी राहणार आहेत. विशेष म्हणजे पॉवर कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli Anushka Sharma) हे विकी आणि कतरिनाचे शेजारी असणार आहेत. राजमहल इमारतीमध्ये विराट-अनुष्कानं दोन मजले खरेदी केलेले आहेत.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला विकीनं अंधेरी येथील त्याच्या आई-वडिलांच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानं जुहूमध्ये भाड्यानं अपार्टमेंट घेतलं असून त्यासाठी दरमहा 8 लाख रुपये भाडं भरावं लागत आहे. लग्नानंतर विकी आणि कतरिना त्यांच्या या नवीन घरात राहणार असून तिथेच कतरिनाचा गृहप्रवेश विधी (Grihapravesh rituals) केला जाणार आहे. हा गृहप्रवेश सोहळा पुढील आठवड्यात होणार आहे. यासाठी कौशल आणि कैफ कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. सध्या मुंबईमध्ये या सोहळ्याची तयारीही सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

    गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही कलाकारांनी अनेकदा घराच्या सजावटीसाठी (home decor) आणि इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी याठिकाणाला भेटी दिल्या आहेत. याच ठिकाणी ते अनेकदा एकत्र दिसले. सुरुवातीला घर पाहण्यासाठी मात्र ते सोबत गेले नव्हते, असंही सूत्रांनी सांगितलं.अगोदर हाती आलेल्या माहितीनुसार, या अपार्टमेंटसाठी 1.75 कोटी रुपयांची रक्कम डिपॉझिट म्हणून भरली आहे. जुलै 2021 पासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी विकीनं हे अपार्टमेंट भाड्यानं घेतलं आहे. सुरुवातीच्या 36 महिन्यांचं भाडं 8 लाख रुपये प्रति महिना इतकं असेल. त्यानंतर एका वर्षासाठी दरमहा 8 लाख 40 हजार रुपये तर शेवटच्या वर्षासाठी दरमहा 8 लाख 82 हजार रुपये भाडं भरावं लागणार आहे.

    First published:

    Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal