मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer: तालिबानचा कथित म्होरक्या हिबातुल्लाह अखुंदजादा आहे तरी कुठे? ठावठिकाणा गुप्त ठेवण्याचं हे आहे कारण

Explainer: तालिबानचा कथित म्होरक्या हिबातुल्लाह अखुंदजादा आहे तरी कुठे? ठावठिकाणा गुप्त ठेवण्याचं हे आहे कारण

तालिबानचा म्होरक्या किंवा कथित कमांडर हिबातुल्लाह अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) सत्ता आल्यावरही अजून समोर का आलेला नाही? काय आहे तालिबानची Secret History?

तालिबानचा म्होरक्या किंवा कथित कमांडर हिबातुल्लाह अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) सत्ता आल्यावरही अजून समोर का आलेला नाही? काय आहे तालिबानची Secret History?

तालिबानचा म्होरक्या किंवा कथित कमांडर हिबातुल्लाह अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) सत्ता आल्यावरही अजून समोर का आलेला नाही? काय आहे तालिबानची Secret History?

काबुल, 28 ऑगस्ट: अफगाणिस्तानवर (Afghanistan Crisis) तालिबानने (Whereabouts of Taliban Supremo) कब्जा केल्यानंतर तालिबानी संघटनेशी संबंधित अनेक व्यक्तींनी काबूलमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे अनेक कमांडोज, मदरशांतले सशस्त्र विद्यार्थी आणि अनेक वर्षं अज्ञातवासात असलेले नेते आदींचा त्यात समावेश आहे. या सगळ्याला एक मोठा अपवाद आहे. तो म्हणजे तालिबानचा म्होरक्या हिबातुल्लाह अखुंदजादा (Hibatullah Akhundzada). हा तालिबानचा कथित म्होरक्या किंवा कमांडर कुठे आहे याचा ठावठिकाणा जगासमोर आलेला नाही.

कोण आहे हिबातुल्लाह अखुंदजादा?

2016 पासून हिबातुल्लाह तालिबानचं नेतृत्व करतो आहे. संघटनेच्या आधीच्या म्होरक्यांप्रमाणेच त्यालाही कमांडर ऑफ द फेथफुल असं संबोधलं जातं. त्याच्याआधी मुल्ला अख्तर मन्सूर तालिबानचा म्होरक्या होता. तो अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला. तसंच, तालिबानचा संस्थापक मुल्ला मोहम्मद उमर (Mullah Mohammad Omar) याच्या मृत्यूची वार्ता तालिबानच्या नेत्यांनी गुप्त राखली होती. त्यानंतर तालिबानमध्ये दुफळी माजली होती आणि सत्तासंघर्ष सुरू झाला होता. संघटनेच्या दृष्टीने अशा कठीण काळात हिबातुल्लाहकडे नेतृत्व आलं.

काबुल एअरपोर्ट स्फोटाचं धक्कादायक India Connection; ISIS-K मध्ये 14 केरळी सामील

तरीही अखुंदजादाबद्दल अद्याप फारशी माहिती नाही. त्याचं दैनंदिन कामकाज कसं असतं, याबद्दलही फारसं काही प्रसृत झालेलं नाही. इस्लामच्या पवित्र दिवसांमध्ये प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या संदेशांपुरताच त्याची सार्वजनिक ओळख सध्या तरी मर्यादित राखण्यात आली आहे.

एवढी गुप्तता का?

तालिबानकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका फोटोव्यतिरिक्त हिबातुल्लाह कधीही सार्वनिक कार्यक्रमात दिसलेला नाही. तो नेमका कुठे असतो, याचीही माहिती गुप्त राखली जाते. तसंच, अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतरही तालिबानने अद्याप अखुंदजादाच्या हालचालींबद्दल अवाक्षरही काढलेलं नाही.

तालिबानला केवळ महिलांचाच नाही तर शिक्षणाचाही आहे तिटकारा? जाणून घ्या सत्य

'तुम्ही त्यांना लवकरच पाहाल, देवाची इच्छा,' अशा शब्दांत तालिबानचा प्रवक्ता झबीबुल्लाह मुजाहिद याने, पत्रकारांनी त्याच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. गेल्या काही दिवसांत तालिबानच्या वेगवेगळ्या गटांच्या अध्यक्षांनी काबूलमधल्या मशिदींमध्ये जाहीररीत्या नमाज पढला, विरोधी नेत्यांच्या भेटी घेतल्या. एवढंच नव्हे, तर अफगाण क्रिकेट अधिकाऱ्यांच्याही भेटी घेतल्या आहेत; मात्र अखुंदजादाबद्दल कोणीच कसलीही माहिती दिलेली नाही.

तालिबानी संघटनेला आपल्या नेतृत्वाबद्दल (Taliban Leader) गुप्तता राखण्याचा इतिहासच आहे. तालिबानचा संस्थापक मुल्ला मोहम्मद उमरदेखील 90च्या दशकात तालिबानची सत्ता असतानाही काबूलला फारसा जात नसे. कंदाहारमध्ये आपल्या घराच्या आवारात, कोणाच्याही नजरेस पडणार नाही, अशा पद्धतीने राहणं तो पसंत करत असे. त्याला कोणी शिष्टमंडळं भेटायला आली, तरी तो भेटण्यास नाखूश असे. तरीही त्याचा शब्द अंतिम असे. तसाच आदर मिळवणारं व्यक्तिमत्त्व त्यांच्या संघटनेत नंतर झालं नाही.

अफगाणिस्तानात जीन्सवर बंदी? हा इस्लामचा अपमान असल्याचं सांगत तरुणांना मारहाण

इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपच्या एशिया प्रोग्रामचे प्रमुख लॉरेल मिलर सांगतात, की अखुंदजादाने उमरसारखीच दुर्लक्ष करण्याची शैली स्वीकारली आहे. ही गुप्तता सुरक्षिततेच्या कारणासाठीही असू शकेल. कारण अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात त्याच्या आधीच्या म्होरक्याचा मृत्यू झाला होता.

तालिबानच्या प्रवक्त्याने संकेत दिले आहेत, की त्यांचा म्होरक्या लवकरच सर्वांना दिसेल. कारण तो मृत्यू पावल्याचा संशय कोणाला येत असेल, तर त्याचं निराकरण ते त्याद्वारे करू इच्छित असावेत, असं मिलर यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं.

'पण एकदा त्याचं सार्वजनिकरीत्या दर्शन घडवण्यात आलं, कीनंतर तो मुल्ला उमरसारखाच दुरून कुठून तरी कारभार हाकील, अशीही शक्यता आहे,' असंही मिलर म्हणाले.

अखुंदजादाला झाला कोविड?

अखुंदजादाला कोविड झाला असावा किंवा तो बॉम्बवर्षावात मारला गेला असावा, अशा चर्चा सर्वत्र आहेत. त्यानंतर तो गेल्या काही काळात सार्वजनिकरीत्या समोर आलेलाच नाही. सध्या तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केलेला असूनही तो समोर आला नाही, हे आश्चर्य मानलं जात आहे.

मुल्ला उमरच्या मृत्यूची बातमी लपवून ठेवल्यामुळे तालिबानमध्ये दुफळी माजली. आता तालिबान पुन्हा सत्तेकडे वाटचाल करत असताना सर्वांना शांत करणं हे स्थिर सत्तेसाठी त्यांना आवश्यक वाटत असावं. कारण त्यांच्या संघटनेत नेतृत्वाची पोकळी पुन्हा निर्माण झाली, तर त्यांचा इतक्या वर्षांचा संघर्ष वाया जाईल, अशी भीती त्यांना आहे. त्यामुळे ते सावधगिरी बाळगत असावेत, असंही सांगितलं जात आहेत.

काबूल स्फोटाचं अमेरिकेनं दिलं प्रत्युत्तर; अफगाणिस्तानात ISIS वर ड्रोन हल्ला

अमेरिकी फौजा अफगाणिस्तानातून पूर्णपणे निघून जात नाहीत, तोपर्यंत अशीच स्थिती राहील, असाही अंदाज वर्तवला जात आहे. पाकिस्तानस्थिती सुरक्षाविषयक विश्लेषक इम्तियाझ गुल यांच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानात जोपर्यंत परकीय फौजा आहेत, तोपर्यंत तालिबान स्वतःला जिहादच्या स्थितीत असल्याचं मानतात. त्यामुळे अमेरिकी फौजा निघून जाईपर्यंत ते त्यांच्या नेत्याला अज्ञातवासात ठेवतील, असं ते म्हणतात.

First published:

Tags: Taliban