मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अफगाणिस्तानात जीन्सवर बंदी? हा इस्लामचा अपमान असल्याचं सांगत तरुणांना तालिबानकडून मारहाण

अफगाणिस्तानात जीन्सवर बंदी? हा इस्लामचा अपमान असल्याचं सांगत तरुणांना तालिबानकडून मारहाण

अनेक तरुण अफगाण नागरिकांनी सोशल मीडियावर याबाबत आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. जीन्स घालून इस्लामचा तथाकथित अपमान केल्याचे सांगत ही मारहाण केली असल्याचे या तरुणांनी म्हटलं आहे.

अनेक तरुण अफगाण नागरिकांनी सोशल मीडियावर याबाबत आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. जीन्स घालून इस्लामचा तथाकथित अपमान केल्याचे सांगत ही मारहाण केली असल्याचे या तरुणांनी म्हटलं आहे.

अनेक तरुण अफगाण नागरिकांनी सोशल मीडियावर याबाबत आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. जीन्स घालून इस्लामचा तथाकथित अपमान केल्याचे सांगत ही मारहाण केली असल्याचे या तरुणांनी म्हटलं आहे.

  काबूल 24 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (taliban) कब्जा केल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडण्यासाठी धावपळ करत आहेत. तर, दुसरीकडे अफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यानंतर नागरिकांच्या अधिकारांवर विविध निर्बंध तालिबानकडून लादण्यात येऊ लागले आहेत. तालिबानने महिला वृत्त निवेदिकांवर बंदी घालत सरकारी न्यूज चॅनलच्या एका महिला वृत्त निवेदिकेला (women anchor) नोकरीवरून काढून टाकल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता पाश्चिमात्य कपडे घालणाऱ्या (Western clothing in Afghanistan) नागरिकांना मारहाण केली जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.

  पाश्चिमात्य संस्कृतीतील फॅशनचे कपडे घालणाऱ्या अफगाणी नागरिकांना तालिबानी मारहाण करीत आहेत. नवभारत टाइम्सनं याबाबत वृत्त दिलं आहे. अफगाणिस्तानात लोकांचा छळ सुरू झाला आहे. जीन्स पँट (jeans) घातल्याबद्दल लोकांना तालिबानी मारत आहेत. अनेक तरुण अफगाण नागरिकांनी सोशल मीडियावर याबाबत आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. जीन्स घालून इस्लामचा तथाकथित अपमान केल्याचे सांगत ही मारहाण केली असल्याचे या तरुणांनी म्हटलं आहे.

  तालिबानचा क्रिकेटला फटका : अफगाणिस्तानची वन-डे सीरिज स्थगित

  काबूलमध्ये मित्रांसोबत फिरत असताना तालिबानींनी आम्हाला घेरले, व मारहाण केल्याचा अनुभव एका सोशल मीडिया युजरने व्यक्त केला आहे. तो म्हणतो, काबूलमध्ये मी मित्रांसोबत फिरत असताना तालिबानींनी आम्हाला घेरलं. माझे दोन मित्र पळून जाण्यात यशस्वी झाले तर बाकीच्यांना मारहाण करण्यात आली. तर, तालिबानच्या एका अधिकाऱ्याने स्थानिक वृत्तपत्र इतिल्लतरोझच्या (Etilaatroz) पत्रकारांना माहिती दिली की, आम्ही पुरुषांसाठी 'ड्रेस कोड' वर चर्चा करत आहे. तालिबान नागरिकांना पाश्चिमात्य कपडे परिधान करू देणार नाही, असा दावा इतर बातम्यांच्या माध्यमातूनही केला जातो आहे.

  द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानात बुरख्याची विक्री झपाट्याने वाढली आहे. बुरख्याच्या किमतीही दुप्पट झाल्या आहेत. एका आठवड्यापूर्वी, स्थानिक वृत्तपत्रातील एका पत्रकाराला अफगाणी पद्धतीचे कपडे न घातल्यामुळे मारहाण झाली होती. तसे वृत्त संबंधित वृत्तपत्राने दिले होते. 90 च्या दशकात तालिबान राजवटीत पुरुषांना पारंपारिक कपडे घालणे बंधनकारक होते, तर महिलांना बुरखा घालणे बंधनकारक होते.

  EXPLAINER: तालिबानला कडवा प्रतिकार कसे करत आहेत हे पंजशीरचे वीर?

  अफगाणिस्तानातून समोर आलेल्या अलीकडील फोटो-व्हिडीओमध्ये तालिबानी गॉगल, कॅप, बूट घालून वावरताना दिसत असून हे त्यांच्या 'कट्टर विचारसरणी'च्या विरोधात आहे. अफगाणिस्तानध्ये सध्या पंजशीर सर्वात तणावग्रस्त क्षेत्र बनले आहे. पंजशीरवर अद्याप ताबा मिळवण्यात तालिबानी यशस्वी झाले नाही. सोमवारी तालिबानच्या प्रवक्त्याने दावा केला की, त्यांनी तीन बाजूंनी पंजशीरला घेरले आहे. येथे सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे.

  दरम्यान, 20 वर्षांपूर्वी तालिबानच्या शासन काळात अफगाणिस्तानातील महिलांना अत्यंत छळाचा सामना करावा लागला होता. तेव्हाही महिलांचं जीवन आणि अधिकारांवर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या सत्तेत तालिबान्यांची वापसी झाली आहे.

  First published:
  top videos

   Tags: Afghanistan, Taliban