Home /News /explainer /

Explainer: काश्मीरमध्ये मोदी वापरणार का चायनीज फॉर्म्युला? परिस्थिती सुधारण्यासाठी नव्या धोरणाचा विचार?

Explainer: काश्मीरमध्ये मोदी वापरणार का चायनीज फॉर्म्युला? परिस्थिती सुधारण्यासाठी नव्या धोरणाचा विचार?

Jammu Kashmir News: चीनने उईगर मुस्लीम (Uighur Muslims) बहुल भागात अवलंबलं ते तत्त्व भारत पण अलिप्तवाद्यांच्या बाबतीत अवलंबणार का?

    नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या (kashmiri Pandit) हत्यांचं प्रमाण वाढलं आहे. लष्कर -ए- तैयबासारखी (LET) टीआरएफ (TRF) ही दहशतवादी संघटना काश्मीरमध्ये हिंदू, शीख समाजातील लोकांना लक्ष्य करून ठार करत असल्याचे उघडकीस आलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेसह सुरक्षा दलं, जम्मू काश्मीर पोलिस दल सज्ज झाले असून, या संघटनेसाठी काम करणाऱ्या तब्बल 900 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आतापर्यंतची अशाप्रकारची ही काश्मीरमधील सर्वांत मोठी कारवाई आहे. यामुळे हिंदू,शीख समुदायातील लोकांना सुमारे तीन दशकांपूर्वीची परिस्थिती आठवत असून, त्यावेळीही अल्पसंख्यांक हिंदूंना लक्ष्य करून त्यांना काश्मीर सोडण्यास भाग पाडलं होतं. सुमारे 80 हजार हिंदू कुटुंबांना (Kashmiri Hindu) काश्मीर सोडावं लागलं होतं. तशीच स्थिती पुन्हा निर्माण होण्याच्या शंकेनं काश्मीरमधील हिंदू आणि शीख समुदायात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता मोदी सरकारनं या कश्मिरी पंडितांचं काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली असून हळूहळू पंडित परत आपल्या गावी येऊ लागले आहेत. हेच तिथल्या फुटीरतावादी नेत्यांना, संघटनांना नको आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदूना लक्ष्य केलं जात आहे. काश्मीरमधील हिंसाचार आणि दहशतवाद ही कायमच भारतासाठी डोकेदुखी ठरली आहे. आतापर्यंत या समस्येवर कोणताही प्रभावी उपाय सापडलेला नाही. काश्मीरमध्ये पुन्हा उद्भवलेल्या या स्थितीमुळे या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी विविध उपायांबाबत चर्चा सुरू आहे. त्यात चिनी उपायाची (China's Strategy) भरपूर चर्चा होत आहे. चीनलाही आपल्या एका प्रांतात काश्मीरसारखीच समस्या (Kashmir Issue) भेडसावत होती. अत्यंत कठोर पावलं उचलून त्यांनी ही समस्या सोडवली. या सूत्राचा भारताला (India) काही अंशी उपयोग होऊ शकतो, असं मानलं जात आहे. चीनमधील समस्या चीनचा झिंजियांग प्रांत हा उईगर मुस्लिम (Uighur Muslims) बहुल भाग आहे;पण भारताच्या जम्मू -काश्मीर प्रांताप्रमाणे तेथेही अलिप्ततावादाची समस्या होती. तसेच हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. यानंतर, चीनने अत्यंत कठोर भूमिका घेतली आणि परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले. या कामात, त्यांच्यावर अनेक मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप झाले, परंतु चीनच्या बलाढ्य शक्तीमुळे संपूर्ण जगाने याबाबत मौन पाळले. 15 लाख लोकांना शिबिरात ठेवले झिंजियांगमधील हिंसाचार आणि चीनविरोधी भावनांचा उद्रेक झाल्यानंतर, चीनमधील कम्युनिस्ट सरकारने 2014 पासून अतिशय कठोर धोरण स्वीकारले. सर्वप्रथम चीननं या भागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने देखरेख यंत्रणा कडक केली. यानंतर, अल्पसंख्यांक उईघूर मुस्लिमांना शिक्षणासाठी आणि त्यांची राजकीय विचारसरणी सुधारण्यासाठी सरकारी छावण्यांमध्ये ठेवण्यात आले. सुमारे 15 लाख लोकांना बंदिवासात ठेवण्यात आलं. चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे उईघुर मुस्लिमांमधील अलिप्ततावादाची प्रवृत्ती संपवल्याबद्दल खूप कौतुक झाले. पण चीनच्या या धोरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार टीका झाली. पाश्चिमात्य देशांनी जिनपिंग यांचे हे धोरण म्हणजे नरसंहार असल्याचं म्हटलं आहे. झिंजियांगचं भौगोलिक महत्त्व भारतासाठी जसं जम्मू -काश्मीरचं भौगोलिक महत्त्व आहे, तसंच झिंजियांगच्या प्रांताचं चीनसाठी महत्त्व आहे.या प्रदेशातून चीनचा मध्य आशिया, पश्चिम आशिया आणि युरोपच्या बाजारपेठांशी थेट संपर्क आहे. हा परिसर चीनच्या प्रसिद्ध बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचे हृदय असल्याचे म्हटले जाते. एवढेच नाही तर वादग्रस्त चीन-पाकिस्तान कॉरिडॉरदेखील याच भागातून सुरू होतो. काश्मीरप्रमाणेच चीनचाही हा प्रदेश मुस्लिमबहुल क्षेत्र आहे. जम्मू -काश्मीरच्या एकूण लोकसंख्येपैकी 68 टक्के मुस्लिम आणि 28 टक्के हिंदू आहेत. हे जम्मू आणि काश्मीर या दोन विभागात विभागले गेले आहे. काश्मीर हे पूर्णपणे मुस्लिम बहुल क्षेत्र आहे, तर जम्मूमध्ये हिंदू लोकसंख्या बहुसंख्य आहे. या क्षेत्रावर आपली पकड मजबूत करण्यासाठी तिथली लोकसंख्येचं प्रमाण बदलण्याची (Population Change) गरज चीनच्या लक्षात आली होती. त्यामुळं चीनने रणनीतीचा भाग म्हणून झिंजियांगची लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न केला. एका अहवालानुसार, 1945 मध्ये झिंजियांगमध्ये हान नावाच्या चिनी लोकांचं प्रमाण फक्त सहा टक्के होतं. तथापि, 2010 मध्ये, एकूण लोकसंख्येमध्ये हान लोकांचं प्रमाण 40 टक्क्यांपर्यंत पोहोचलं होतं. चीनवर टीका चीनच्या या धोरणावर टीकाही केली जाते. याचं मुख्य कारण म्हणजे या भागात हान लोकांचे वर्चस्व आहे. एका अहवालानुसार, 65 टक्के हान लोक या क्षेत्रात उच्च सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत, तर तेथील मूळ उईघूर मुस्लिमांपैकी 81 टक्के लोक शेतीशी संबंधित कामात गुंतलेले आहेत. लोकसंख्येतील फरक आणि आर्थिक शोषण यामुळे या लोकांचा अलिप्ततावादाकडे कल होता; मात्र ही अलिप्ततावादी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अत्यंत कठोर आणि आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला. बापरे ! Corona नंतर आता Black death ची लाट येणार? रशियन डॉक्टरने दिला इशारा त्यांच्या आधीचे अध्यक्ष झिंजियांगच्या विकासावर जोर देत होते,ज्यामुळे इथली विषमता दूर करून मूळ लोकसंख्या चीनच्या मुख्य प्रवाहाशी जोडली जाऊ शकेल. पण 2014 मध्ये शी जिनपिंग यांनी झिंजियांगबाबत चीनच्या धोरणात मोठा बदल केला. त्यांनी उईघुर मुस्लिम लोकांची संख्या वाढ थांबवण्यापासून त्यांची सांस्कृतिक ओळख नष्ट करण्यापर्यंत अनेक पावले उचलली. दोनपेक्षा जास्त मुले झाल्यास उईघुर मुस्लिमांवर जबर दंड लादण्यात आला. गर्भधारणेदरम्यान महिलांना कधीही गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. या उपाययोजनांमुळे, उईघुर मुस्लिमांचा लोकसंख्या वाढीचा दर तब्बल 84 टक्क्यांनी कमी झाला. 1200 छावण्या चीनने या भागात पुन्हा शिक्षण शिबिराच्या नावाखाली 1200 हून अधिक छावण्या (Re-education Centres) बांधल्या. या शिबिरांमध्ये दीड लाखांहून अधिक उईघुर मुस्लिमांना ठेवण्यात आले होते. ज्या मुस्लिम पुरुषांना लांब दाढी होती त्यांना इथं ठेवण्यात आलं. बुरखा घातलेल्या महिलांनाही येथे ठेवण्यात आले होते. या लोकांना चिनशी निष्ठेचे धडे देण्यात आले. मँडरीन ही चीनची भाषा शिकवण्यात आली. या लोकांना इस्लामिक संस्कृतीचा (Islamic Culture) निषेध करण्यास भाग पाडण्यात आलं. चीन सरकारने या उपाययोजना राबवण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केला असल्याची चर्चा आहे. माजी टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवावर का घसरले मोदी समर्थक? काय घडलं नेमकं? चीनचा झिंजियांग प्रांत आणि भारतातील जम्मू-काश्मीर हे दोन्ही प्रांत परस्पर भिन्न आहेत. तिथली परिस्थितीही वेगळी आहे त्यामुळे भारतात कोणत्याही सरकारला चीनसारखं धोरण अवलंबता येणं कठीण आहे.
    First published:

    Tags: India china, Jammu kashmir, Muslim

    पुढील बातम्या