काय म्हणाली मार्टिना? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही हुकूमशाही प्रवृत्तीचे नसून ते सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतात, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शाहांनी एका मुलाखतीत केलं होतं. या संदर्भातील बातमीला टॅग करत मार्टिनानं ‘हा एक चांगला विनोद होता’, असं म्हटलं आहे. And My Next Joke असं म्हणत मार्टिनानं अमित शाहांच्या ट्विटला उत्तर दिलं आणि त्यानंतर तिच्यावर टीका व्हायला सुरू झाली. मोदी समर्थकांनी तिला जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली, तर काहींनी तिचं समर्थन करत तिचं कौतुक केलं.And for my next joke … https://t.co/vR7i5etQcv
— Martina Navratilova (@Martina) October 10, 2021
That's it!! I will no longer watch any tennis match featuring her. Canceling my yearly pass to all 4 grand slams. What a major loss to the WTA tour.
— AbuAyra (@NamBiz) October 10, 2021
सोशल मीडियावर जोरदार वाद मार्टिना नवरातिलोवाच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. मार्टिनाशी संबंधित असलेल्या कुठल्याही सामन्याला आपण हजर राहणार नसून ग्रँडस्लॅमशी संबंधित सर्व पासेस रद्द करत असल्याचं एका नेटकऱ्यानं म्हटलं. मार्टिनाच्या वक्तव्यामुळे WTA ला मोठा झटका बसणार असल्याचंही तो म्हणाला. यावर मार्टिनाने एक स्माईली पोस्ट करत त्याला उत्तर दिलं.Dear bhakts, Martina Navratilova is a former TENNIS player. FYI
— Dr V (@DrVW30) October 10, 2021
अनेकांनी केलं कौतुक टेनिस कोर्टवर तुमच्याप्रति असणारा सन्मान आता आणखीनच वाढल्याचं एका नेटकऱ्यानं म्हटलं. तर आता आयटी सेलद्वारे तुम्हाला बॅन करण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी मेसेजेस फिरवले जातील, असा इशाराही एका नेटकऱ्यानं दिला. तर काहींनी तिच्या बँकहँड शॉटचं कौतुक करत त्याचं नातं या ट्विटशी जोडलं. हे वाचा - जास्तीचं भाडं नाकारल्याने उगवला सूड; मुंबईतील तरुणीसोबत उबेर एजंटचं भयंकर कृत्य अनेकांकडून विनोदी ट्विट भक्तांनो, मारिया नवरातिलोवा ही एक टेनिसपटू आहे, असं ट्विट करत एका नेटकऱ्याने ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न केला. तर भाजपची आयटी सेल गोंधळलेली असल्याचा दावा एका नेटकऱ्याने केला. मार्टिना नवरातिलोवा हे नाव ऐकून नवरात्री बॅन करावी आणि मार्टिनी प्यावी की मार्टिनी बॅन करून नवरात्री सुरु ठेवावी, असा गोंधळ झाल्याचं मजेशीर ट्विट एकाने केलं.Martina Navratilova has mocked at Modiji, and now IT Cell is confused.
They can either boycott Navratri and drink Martini, or they can boycott Martini and continue Navratri. — PuNsTeR™ (@Pun_Starr) October 10, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Narendra modi, Tweet