Home /News /pune /

California Plane crash: अपघातात पुण्यातील डॉक्टरांचा मृत्यू, स्वतःच्याच मालकीचं होतं प्रायव्हेट प्लेन

California Plane crash: अपघातात पुण्यातील डॉक्टरांचा मृत्यू, स्वतःच्याच मालकीचं होतं प्रायव्हेट प्लेन

कॅलिफोर्नियात विमान कोसळून झालेल्या अपघातात (Death of a doctor from Pune in California plane crash) पुण्यातील एका डॉक्टरांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

    कॅलिफोर्निया, 12 ऑक्टोबर : कॅलिफोर्नियात विमान कोसळून झालेल्या अपघातात (Death of a doctor from Pune in California plane crash) पुण्यातील एका डॉक्टरांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे नाव डॉ. सुगता दास असून पुण्यातील एका बंगाली परिवारात त्यांचा जन्म झाला होता. अमेरिकेतील अरिझोनामध्ये (He was working as heart specialist) हृदयरोग तज्ज्ञ म्हणून ते कार्यरत होते. पुण्यातच बालपण गेलेल्या डॉ. दास यांचा ज्या विमान अपघातात मृत्यू झाला, ते विमान त्यांच्याच मालकीचं असल्याची माहिती आता समोर येत आहे. या अपघातात डॉ. दास यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विमानाने घेतला पेट विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच पेट घेतला. हे विमान एका निवासी भागात कोसळलं. पेट घेतल्यामुळे झालेल्या स्फोटात डॉ. दास आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे सेसना सी 340 नावाचं विमान होतं. याच विमानातून प्रवास करत असताना सोमवारी ही दुर्घटना घडली आणि त्यात डॉक्टरांचा मृत्यू झाला. वायआरएमसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी भारत मागू यांनी याबाबत निवेदन सादर केलं असून डॉ. दास यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. हे वाचा - BREAKING: 2-18 वयोगटासाठी Covaxin लशीला मान्यता, लवकरच सुरू होणार लसीकरण दास करायचे एड्स ग्रस्तांना मदत डॉ. दास हे एड्स ग्रस्तांना मदत करायचे. आपल्या व्यवसायासोबत त्यांनी सामाजिक बांधिलकीदेखील जपली होती. पॉवर ऑफ लव्ह नावाच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठं समाजकार्य केल्याचं सांगितलं जात आहे. डॉ. दास यांची संस्था ना नफा ना तोटा तत्वावर काम करत होती आणि समाजातील अनेक घटकांना त्यांनी मदत केली होती. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले होते. एका घरावर हे विमान कोसळल्यामुळे घराला आग लागली होती. या आगीत भाजून पाच जण जखमी झाले होते.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Airplane, Pune (City/Town/Village)

    पुढील बातम्या