मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer: वाढत्या R-Value मुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली; काय आहे हा R फॅक्टर?

Explainer: वाढत्या R-Value मुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली; काय आहे हा R फॅक्टर?

देशातल्या मेट्रो शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली असली तरी R Value वाढत आहे. रुग्णसंख्या हजारांमध्ये असेल आणि R Value 1 पेक्षा अधिक झाली तर ती भयानक स्थिती असते. त्या स्थितीत संसर्गाचं नियंत्रण अवघड असतं.

देशातल्या मेट्रो शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली असली तरी R Value वाढत आहे. रुग्णसंख्या हजारांमध्ये असेल आणि R Value 1 पेक्षा अधिक झाली तर ती भयानक स्थिती असते. त्या स्थितीत संसर्गाचं नियंत्रण अवघड असतं.

देशातल्या मेट्रो शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली असली तरी R Value वाढत आहे. रुग्णसंख्या हजारांमध्ये असेल आणि R Value 1 पेक्षा अधिक झाली तर ती भयानक स्थिती असते. त्या स्थितीत संसर्गाचं नियंत्रण अवघड असतं.

नवी दिल्ली, 30 जुलै: भारतातल्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) संख्या पुन्हा वाढायला लागली असून, शुक्रवारी (30 जुलै) 44,230 नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन आठवड्यांतली ही सर्वाधिक संख्या असून, संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची भीती (Third Wave) यातून दिसत आहे. देशात कोविड-19चा (Covid19) संसर्ग किती वेगाने होत आहे, हे दर्शविणारा आर-फॅक्टर (R-Factor) किंवा आर-व्हॅल्यू (R-Value) सातत्याने वाढत असून, केरळ आणि ईशान्येकडच्या राज्यांमधली रुग्णसंख्या जास्त आहे. चेन्नईतल्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्समधल्या संशोधकांनी केलेल्या विश्लेषणातून असं आढळलं आहे, की दिल्लीसारख्या मेट्रो शहरांमधल्या आर-व्हॅल्यूजदेखील वाढत आहेत.

आर-व्हॅल्यू काय दर्शवते?

R-Value 0.95 असेल, तर त्याचा अर्थ असा, की कोरोना संसर्ग झालेल्या 100 व्यक्ती सरासरी 95 जणांना बाधित करतात. R-Value एकपेक्षा कमी असेल, त्याचा अर्थ असा, की आधीच्या कालावधीतल्या बाधित रुग्णांपेक्षा नव्याने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. म्हणजेच संसर्ग कमी होत असल्याचं यावरून समजतं. R-Value एकपेक्षा जास्त असेल, तर आधीच्या बाधितांपेक्षा नव्याने संसर्ग झालेल्या बाधितांची संख्या जास्त आहे आणि प्रत्येक वेळी ती वाढत आहे, असा त्याचा अर्थ. तांत्रिक भाषेत याला एपिडेमिक फेज (Epidemic Phase) असं म्हणतात. म्हणजेच R-Value जितकी जास्त, तितका लोकसंख्येत संसर्ग पसरण्याचं प्रमाण जास्त असतं.

दैनंदिन रुग्णसंख्या किती झाल्यावर समजायचं कोरोनाची लाट आली? तज्ज्ञांचं मत काय?

दैनंदिन रुग्णवाढ आणि अॅक्टिव्ह रुग्णसंख्या (Active Patients) यांचं प्रमाण जवळपास सारखंच राहिलं आहे. जेव्हा अॅक्टिव्ह रुग्णसंख्या काही शेकड्यांत असते आणि R-Value एकच्या जवळ असते, तेव्हा संसर्ग नियंत्रित करणं बऱ्यापैकी सोपं असतं, असतं, असं इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसचे सीताभद्र सिन्हा यांनी सांगितलं. त्यांच्याच नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आलं.

भारताची एकंदर R-Value

भारतात 9 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत कोविड-19ची दुसरी लाट (Second Wave Peak) सर्वोच्च पातळीवर होती, तेव्हा देशाची एकंदर R-Value 1.37 एवढी होती. 24 एप्रिल ते एक मे या कालावधीत ती 1.18पर्यंत खाली आली, तर 29 एप्रिल ते 7 मे या कालावधीत ती 1.1 पर्यंत खाली आली, असं विश्लेषणात आढळलं.

9 मे ते 11 मे या कालावधीत R-Value 0.98 एवढी होती. 14 मे ते 30 मे या कालावधीत ती 0.82 एवढी झाली, तर 15 मे ते 26 जून या कालावधीत ती 0.78 पर्यंत खाली आली. त्यानंतर मात्र त्यात वाढ होऊ लागली आहे. 20 जून ते 7 जुलै या कालावधीत R-Value पुन्हा वाढून 0.88 एवढी झाली. 3 जुलै ते 22 जुलै या कालावधीत R-Value 0.95 एवढी नोंदवली गेली आहे.

'भारतातल्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या प्रमाणात खूपच चढ-उतार होत आहेत. त्यामुळे खात्रीशीर अंदाज बांधणं अवघड आहे; पण एकंदर माहिती पाहिली, तर R-Value एकच्या जवळपास आहे, असं दिसतं आहे. येत्या काळात ती कोणत्याही दिशेने झुकू शकते,' असं सिन्हा यांनी सांगितलं.

केरळमधला भीतीदायक ट्रेंड

देशातली सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णसंख्या केरळ राज्यातली आहे. तसंच, त्या राज्याची R-Value सातत्याने 1.11 एवढी आहे. 'येत्या काही आठवड्यांमध्ये केरळ आघाडीवरच राहील, असं दिसतं आहे. ईशान्येकडच्या राज्यांमधली (North East States) स्थितीही भीतिदायक असून, तिथल्या अनेक राज्यांची R-Value एकपेक्षा जास्त आहे,' असं सिन्हा यांनी नमूद केलं.

घरच्या घरी अशी करा कोरोना टेस्ट; 15 मिनिटांत कळेल रिझल्ट! 3 किट्सना मान्यता

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (29 जुलै) सांगितलं, की केरळमधल्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसत असल्याने कोविड-19चं प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी सहा सदस्यांची विशेष टीम केरळला पाठवली जाणार आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेचे संचालक ए. के. सिंग यांच्या नेतृत्वाखालची ही टीम शुक्रवारी केरळमध्ये दाखल होणार असून, पॉझिटिव्हिटी दर जास्त असलेल्या काही जिल्ह्यांना भेट देणार आहे. देशाचा एकंदर विचार करता कोरोनाबाधितांची संख्या घटत असताना केरळमध्ये जास्त असलेला पॉझिटिव्हिटी दर ही चिंतेची बाब आहे.

केरळमध्ये (Kerala) बुधवारी (28 जुलै) 22,056 नव्या कोरोनाबाधितांची, तर 131 नव्या मृत्यूंची नोंद झाली. तिथल्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 33,27,301 एवढी झाली असून, आतापर्यंत 16 हजार 457 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

ईशान्येकडच्या राज्यांचा विचार केला, तर केवळ त्रिपुराची R-Value एकपेक्षा बऱ्यापैकी कमी असून, मणिपूरची R-Value एकपेक्षा जेमतेम कमी आहे. देशातल्या अन्य राज्यांचा विचार करता उत्तराखंड राज्याची R-Value सध्या एकच्या जवळ आहे.

महत्त्वाच्या शहरांच्या R-Value मध्ये वाढ

देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीमध्ये (Delhi) R-Value एकच्या दिशेने वाटचाल करत आहे. 21 ते 26 जून या कालावधीत दिल्लीची R-Value 0.8 एवढी होती. 28 जून ते 6 जुलै या कालावधीत ती 0.66पर्यंत खाली आली; मात्र 4 जुलै ते 20 जुलै या कालावधीत ती पुन्हा वाढून 0.84वर पोहोचली. गुरुवारी दिल्लीत 51 नवे कोरोनाबाधित सापडले आणि पॉझिटिव्हिटी दर 0.08 टक्के एवढा होता. सध्या दिल्लीत 554 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सिन्हा यांनी दिल्लीतल्या परिस्थितीबद्दलही भाष्य केलं. ते म्हणाले, 'R-Value एकपेक्षा जास्त झाली, पण रुग्णसंख्या शेकड्यात असेल, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी नियंत्रित करणं शक्य असतं; मात्र R-Value एकपेक्षा जास्त झाली आणि रुग्णसंख्या हजारांमध्ये असेल, तर ती भयानक स्थिती असते. त्या स्थितीत संसर्गाचं नियंत्रण अवघड असतं.'

11 ते 13 जुलै या कालावधीत पुणे (Pune) शहराची R-Value 0.85 एवढी होती, तर 15 ते 20 जुलै या कालावधीत ती 0.89 एवढी झाली होती.

बेंगळुरू (Bengaluru) शहराची R-Value 7 ते 13 जुलै या कालावधीत 0.92 एवढी होती. 13 ते 17 जुलै या कालावधीत ती 0.95 एवढी झाली. 17 ते 23 जुलै या कालावधीत ती 0.72 एवढी झाली.

कोरोनाच्या लक्षणांमध्ये बदल, लस घेतलेल्या आणि न घेतलेल्यांमध्ये लक्षण वेगवेगळी

मुंबई (Mumbai) शहराची R-Value 2 ते 4 जुलै या कालावधीत 0.96 एवढी होती. 6 ते 9 जुलै या कालावधीत ती 0.89 एवढी झाली. 22 ते 24 जुलै या कालावधीत ती आणखी घटून 0.74वर आली.

चेन्नई (Chennai) शहराची R-Value 29 जून ते 7 जुलै या कालावधीत 0.63 एवढी होती. 16 ते 19 जुलै या कालावधीत ती 1.05 वर गेली. 21 ते 24 जुलै या कालावधीत ती पुन्हा घटून 0.94वर आली.

Coronavirus: कसा तयार होतो कोरोनाचा नवा व्हेरिएंट? शास्त्रज्ञांनी केला खुलासा

कोलकाता (Kolkata) शहराची R-Value 1 ते 13 जुलै या कालावधीत 0.80 एवढी होती. ती 12 ते 17 जुलै या कालावधीत 0.91 एवढी झाली, तर 17 ते 24 जुलै या कालावधीत 0.86 एवढी झाली.

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus cases, Covid19