• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • घरच्या घरी अशी करा corona test; 15 मिनिटांत कळेल result! ICMR ने दिली 3 किट्सना मान्यता

घरच्या घरी अशी करा corona test; 15 मिनिटांत कळेल result! ICMR ने दिली 3 किट्सना मान्यता

कोरोनाची चाचणी (Corona Test) करण्यासाठी आता हॉस्पिटलमध्ये (Hospital) किंवा लॅबमध्ये (Lab) जाण्याची गरज नसून घरच्या घरी ही टेस्ट करणं भारतीयांना शक्य होणार आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 29 जुलै: कोरोनाची चाचणी (Corona Test) करण्यासाठी आता हॉस्पिटलमध्ये (Hospital) किंवा लॅबमध्ये (Lab) जाण्याची गरज नसून घरच्या घरी ही टेस्ट करणं भारतीयांना शक्य होणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या तीन किट्सना (Three Kits) इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) मान्यता दिली आहे. किट्स बाजारात उपलब्ध होत असून त्याचा उपयोग करून आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे प्रत्येकाला समजू शकणार आहे. या किट्सना मंजुरी कोविसेल्‍फ (पॅथोकॅच) कोविड 19 ओटीसी एंटीजन एलएफ डिव्हाइस, पॅन बायो कोविड 19 एँटिजन रॅपिड टेस्‍ट डिव्हाइस आणि कोविफाइन्‍ड कोविड 19 रैपिड एज सेल्फ टेस्‍ट अशी या 3 किट्सची नावं आहेत. ही किट्स सध्या देशाच्या विविध भागात उपलब्ध असून त्याचा उपयोग करून घरबसल्या कोरोनाची टेस्ट करणं शक्य होणार आहे. अशी होणार टेस्ट या किटचा उपयोग करून कोरोनाची टेस्ट करता येते. या टेस्टमध्ये येणारे तपशील ICMR लाही समजतात. या टेस्टमध्ये दिसणारे निकष आयसीएमआरच्या ऍपवर अपलोड करावे लागतात. त्यानंतर काही मिनिटांमध्ये टेस्टचा रिपोर्ट समजतो. मात्र आयसीएमआरला डिटेल्स सबमिट केल्याशिवाय टेस्टचा निकाल समजू शकत नाही. अनेक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असतानादेखील ही बाब लपवून ठेवण्याची शक्यता असते. हे प्रकार टाळण्यासाठी आयसीएमआरकडे त्याचे तपशील पाठवण्याची तरतूद या किट्समध्ये करण्यात आली आहे. हे वाचा -Airtel ग्राहकांना मोठा फटका; प्रीपेड प्लॅन दरात वाढ,आता किती रुपये द्यावे लागणार किट्समुळे होणार उपयोग कोरोनाची लक्षणं दिसायला लागलेला रुग्ण हा अऩेकदा अशक्त झालेला असतो. त्यामुळे कोरोनाची टेस्ट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणे किंवा लॅबमध्ये जाणे त्रासाचे होते. त्याशिवाय रुग्ण बाहेर पडल्यामुळे इतरांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. रुग्णाला घराबाहेर पडावं न लागता त्याची चाचणी होऊ शकते का, याविषयी गेल्या काही महिन्यांपासून संशोधन सुरू होते. त्यापैकी तीन कंपन्यांच्या किट्सना भारत सरकारनं मंजुरी दिली आहे.
    Published by:desk news
    First published: