मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer: पालकांनो लक्ष द्या! जाणून घ्या लहान-किशोरवयीन मुलांसाठी कोरोना लस सुरक्षित आहे का

Explainer: पालकांनो लक्ष द्या! जाणून घ्या लहान-किशोरवयीन मुलांसाठी कोरोना लस सुरक्षित आहे का

दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला असून, ही तिसरी लाट मुलांसाठी (Children) धोकादायक ठरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, लवकरात लवकर मुलांसाठी लस उपलब्ध होणं आवश्यक आहे. मात्र ही लस मुलांसाठी किती सुरक्षित असा सवाल अनेक पालकांना पडला आहे

दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला असून, ही तिसरी लाट मुलांसाठी (Children) धोकादायक ठरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, लवकरात लवकर मुलांसाठी लस उपलब्ध होणं आवश्यक आहे. मात्र ही लस मुलांसाठी किती सुरक्षित असा सवाल अनेक पालकांना पडला आहे

दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला असून, ही तिसरी लाट मुलांसाठी (Children) धोकादायक ठरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, लवकरात लवकर मुलांसाठी लस उपलब्ध होणं आवश्यक आहे. मात्र ही लस मुलांसाठी किती सुरक्षित असा सवाल अनेक पालकांना पडला आहे

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 08 जून: सध्या देशात कोरोनाची (Corona) दुसरी लाट नियंत्रणात येताना दिसत आहे. या लाटेनं अनेक राज्यांमध्ये कहर केला होता. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. एकीकडे ही स्थिती असताना शासन, प्रशासन लसीकरणावर भर देताना दिसत होते. कारण या संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळं देशात वेगवान लसीकरण (Vaccination) मोहीम सुरू करण्यात आली; मात्र लसींचा पुरवठा कमी झाल्यानं सध्या लसीकरण मोहिमेत अडथळे येत आहेत.

या दरम्यान दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला असून, ही तिसरी लाट मुलांसाठी (Children) धोकादायक ठरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, लवकरात लवकर मुलांसाठी लस उपलब्ध होणं आवश्यक आहे. अमेरिकेत लहान मुलांना लस देण्यास सुरुवात झाली असून, लसीचा काही काळानंतर होणारा परिणाम आणि साईड इफेक्टस याविषयी त्याबाबत अनेक शंका उपस्थित होत असल्यानं भारतातही मुलांच्या लासीबाबत अनेक प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाले आहेत. भारतातही  मुलांसाठी लशीच्या ट्रायल्स सुरू झाल्या आहेत. लसीबाबत सर्व शंकांचे निरसन होत नाही तोपर्यंत मुलांचे लसीकरण थांबवावं अशी पालकांची भूमिका  आहे.

हे वाचा-कोरोनापासून चिमुकल्यांचा बचाव कसा कराल? तज्ज्ञांनी पालकांना सांगितला मार्ग

दरम्यान अमेरिकेत 12 ते 17 वर्षे वयोगटातील लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी सध्या फायझर-बायोएनटेक (Pfizer - BioNTech) च्या लशीला परवानगी देण्यात आली आहे. लवकर आणखी 2 लशींना देखील परवानगी दिली जाणार आहे. तर भारतात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची 525 स्वयंसेवकांवर ट्रायल सुरू आहे. ट्रायलनंतर या लशीला परवानगी दिली जाणार आहे. तर फायझर लस ही मुलांना दिली जाणारी जगातली पहिली लस असून ती सर्वाधिक म्हणजे 95 टक्के प्रभावी आहे. भारतातही फायझरची ही लस आणण्याची तयारी सुरू असल्याचे एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अमेरिकेत जरी 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी लसीकरणास सुरुवात झाली असली तरी याबाबत काही प्रश्न अमेरिकन पालकांकडून विचारले जात आहेत. अमेरिकेत पालकांकडून विचारले जाणारे प्रश्न आपल्यासाठीही 3 कारणांमुळे महत्वाचे आहेत. पहिले कारण म्हणजे कोरोनाबाधितांची संख्या बघता भारतापेक्षा जास्त कोरोनाबाधित असणारा अमेरिका हा एकमेव देश आहे. दुसरे कारण असे की अमेरिकेत मोठ्या व्यक्तींबरोबर लहान मुलांचेही लसीकरण वेगात सुरू आहे. आणि तिसरे कारण म्हणजे अमेरिकेत सध्या लहान मुलांना दिली जाणारी फायझरची mRMA ही लस लवकरच भारतीय मुलांसाठी वापरली जाणार आहे. दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिले आहे. जाणून घ्या काय आहेत हे प्रश्न

प्रश्न – लसीकरणानंतर लहान मुलांमध्ये मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत वेगळे काही साईड इफेक्टस दिसू शकतात का?

उत्तर – अमेरिकेतील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस दिल्यानंतर 12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांना मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक प्रमाणात ताप येत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हे वाचा-राज्यात मृत्यूतांडव! कोरोना मृत्यूचा आकडा एक लाख पार; फक्त 4 महिन्यात निम्मे बळी

प्रश्न – ज्या मुलांना नुकतीच अन्य आजारांवरील प्रतिबंधक लस दिली असेल तर त्यांना कोरोना प्रतिबंधक लस द्यावी का?

उत्तर – सीडीसीने (CDC) सुरुवातीला कोरोना लस देण्यापूर्वी 2 आठवडे आणि लस दिल्यानंतर 2 आठवडे दुसरी कोणतीही लस देऊ नये, असा सल्ला दिला होता. मात्र आता सीडीसीच्या म्हणण्यानुसार, कोरोना प्रतिबंधक लस आणि अन्य लस देण्यासाठी वेळेचे कोणतेही अंतर ठेवण्याची गरज नाही. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, कोरोना लसीमुळे होणारे दुष्परिणाम आणि आणि अन्य कोणत्याही आजारावरील लसीचे दुष्परिणाम हे जवळपास सारखेच आहेत. एकाच वेळी एकापेक्षा जास्त लसी घ्यायच्या असतील तर त्या घेता येतील. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ पिडीयाट्रिक्सनेही सीडीसीच्या या सल्ल्याचे समर्थन केले आहे. यामुळे मुलांच्या रुटीन इम्युनायझेशनवर (Routine Immunization) कोणताही परिणाम होणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितले आहे.

प्रश्न – मुलांना दिली जाणारी लसीची मात्रा आणि मोठ्या व्यक्तींना दिली जाणारी लस मात्रा यात फरक असेल का?

उत्तर  - 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना फायझर लसीचे 30 मायक्रोग्रॅमचे 2 डोस दिले जात आहेत. 2 डोसमध्ये 3 आठवड्यांचे अंतर आहे. मॉडर्ना (Moderna) 2 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना 50 आणि 100 मायक्रोग्रॅमचा डोस देऊन ट्रायल घेत आहे. ही कंपनी 2 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना 25, 50 आणि 100 मायक्रोग्रॅम डोस देऊन ट्रायल घेत आहे.

प्रश्न – एफडीएच्या म्हणण्यानुसार लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये क्लिनिकल ट्रायल दरम्यान कोणते साईड इफेक्टस दिसून आले?

उत्तर – लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये लसीकरणाचे साईड इफेक्टस एक ते तीन दिवसांपर्यंत दिसून येतात.

मुलांना लसीचे दोन डोस दिल्यानंतर इजेक्शन टोचलेल्या ठिकाणी वेदना जाणवतात. हा कॉमन साईड इफेक्ट (Common Side Effect) आहे. मात्र सर्वसाधारणपणे, लहान मुले किंवा किशोरवयीन मुलांना लसीचे दोन्ही डोस दिल्यानंतर जास्त साईड इफेक्टस दिसून येत आहेत.

सर्वसाधारणपणे कमी वयाच्या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वेगात तयार होते. त्यामुळे एकसारखे लस डोस दिल्यानंतर आई-वडिलांच्या तुलनेत मुलांमध्ये जास्त साईड इफेक्टस दिसणे शक्य आहे.

प्रश्न – 12 वर्षांखालील मुलांना लस केव्हा मिळणार?

उत्तर – अमेरिकेत 12 वर्षांखालील मुलांना डिसेंबरनंतर लस उपलब्ध होऊ शकेल. सप्टेंबरपासून 2 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांसाठी लसीला मान्यता घेण्याचे फायझरचे नियोजन आहे. सहा महिन्यांखालील मुलांसाठी लसीचे ट्रायल्स डिसेंबर मध्ये सुरू होतील.

प्रश्न – यासारखी लस मुलांना पहिल्यांदा देण्यात आली आहे का? ही लस कशी काम करते?

उत्तर – फायझर आणि मॉडर्नाची लस ही mRNA बेस्ड आहे. इथे m चा अर्थ मेसेंजर असा होतो. पारंपारिक लस कमजोर किंवा निष्क्रिय विषाणूच्या मार्फत शरीरात रोगप्रतिकार शक्ती सक्रिय करते. मात्र mRNA लस आपल्या पेशींना अँटीबॉडीज तयार करण्याचे निर्देश देते. ही नव्या पध्दतीची लस आहे. लसीच्या माध्यमातून शरीरात पोहोचणारे मेसेंजर मॉलिक्यूल मुलांच्या पेशींमध्ये सामावतात आणि त्यांना स्पाईक प्रोटीन म्हणजेच कोरोना विषाणूप्रमाणे स्पाईक प्रोटीन तयार करण्याचे निर्देश देतात. हे स्पाईक (Spikes) पेशीच्या पृष्ठभागावर येतात. स्पाईक पृष्ठभागावर येताच ते बाहेरील असल्याचे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ते ओळखते आणि त्यांच्यावर हल्ला करते. याच पध्दतीने मुलांचे शरीर कार्य करते.

हे वाचा-Explainer: सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही पाळावी लागणार बंधनं; काय आहे नियम

प्रश्न – वाढत्या शरीरावर कोरोना लसीचा दीर्घकालीन परिणाम माहित आहे का?

उत्तर – प्रौढ आणि किशोरवयीन मुलांसाठी तयार केलेल्या लसीच्या सहा महिन्यांच्या आणि मुलांवर तीन महिन्यांच्या चाचण्यांचा डेटा शास्त्रज्ञांकडे आहे. त्यानुसार ही लस वाढत्या शरीरात अँटीबॉडीज तयार करण्यासाठी सुरक्षित आहे, असे तज्ज्ञ सांगतात. न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ क्रिस्टीन ओलिवर यांनी सांगितले की, लसीचा कोणाताही कायमस्वरुपी दुष्परिणाम होणार की नाही याबाबत दिर्घकालीन संशोधन झालेले नाही. या लसीमुळे मुलींच्या मासिक पाळी किंवा प्रजजन क्षमतेवर परिणाम होईल का असा प्रश्न पालकांकडून विचारला जातोय, मात्र या घटकावर परिणाम होईल किंवा नाही याबाबत कोणतेही बायोलॉजिक स्पष्टीकरण नाही. मात्र एक गोष्ट नक्की आहे की काम पूर्ण झाल्यावर पेशी mRNA लसीचे मॉलिक्यूल नष्ट करतात, त्यामुळे ते शरीरात साठून राहत नाही.

प्रश्न- मुलांमध्ये कोरोनाचा धोका कमी आहे तर जास्त डेटा जमा होईपर्यंत वाट पाहू शकतो का?

उत्तर – मुलांना कोरोनाचा धोका आहे. या साथीच्या सुरुवातीला अमेरिका 40 मुलं कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. अमेरिकन अकॅडमी ऑफ पेड्रियाट्रिक्सच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे 300 पेक्षा अधिक मुलांचे मृत्यू झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी मुलांमध्ये मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमही दिसून आला होता. यात मुलांमध्ये ह्रदयासह अन्य अवयवांवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.

ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक आणि इमर्जन्सी रुमच्या फिजीशियन डॉ. मेगन रॅनी यांच्या म्हणण्यानुसार, मुलांना कोरोना होणं आणि ती गंभीर आजारी पडण्याची शक्यता कमी आहे. परंतु ही शक्यता शून्य नाही. फिलाडेल्फिया येथील चिल्ड्रन हॉस्पिटलमधील लसीकरण प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि एफडीएचे लसीकरण सल्लागार पॅनेलचे सदस्य डॉ. पॉल ऑफिट यांच्या म्हणण्यानुसार,  अमेरिकेत 24 टक्के कोरोना केसेस या मुलांच्या आहेत. अमेरिकेत दर वर्षी 75  ते 100 मुले फ्ल्यूने, तर  सुमारे 100 मुले गोवर, कांजिण्या यामुळे मृत्यूमुखी पडतात. परंतु, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण याहून अधिक आहे. त्यामुळे मुलांना लस देणं अत्यंत गरजेचं आहे. खासकरुन 12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांना लवकरात लवकर लस देणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Vaccinated for covid 19, Vaccination