मराठी बातम्या /बातम्या /explainer /कोरोनापासून तुमच्या चिमुकल्यांचा बचाव कसा कराल? तज्ज्ञांनी पालकांना सांगितला मार्ग

कोरोनापासून तुमच्या चिमुकल्यांचा बचाव कसा कराल? तज्ज्ञांनी पालकांना सांगितला मार्ग

हिमाचल प्रदेशात 62 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं हिमाचल प्रदेश सरकारनं 22 ऑगस्टपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पंजाबमध्ये ऑगस्टच्या सुरुवातीला शाळा, कॉलेज सुरू करण्यात आली होती. तिथं 27 शाळकरी मुलांना कोरोनाची लागण झाल्यानं सरकारनं शाळांमध्ये कोरोनासंबधीच्या सुरक्षा नियमांच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.

हिमाचल प्रदेशात 62 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं हिमाचल प्रदेश सरकारनं 22 ऑगस्टपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पंजाबमध्ये ऑगस्टच्या सुरुवातीला शाळा, कॉलेज सुरू करण्यात आली होती. तिथं 27 शाळकरी मुलांना कोरोनाची लागण झाल्यानं सरकारनं शाळांमध्ये कोरोनासंबधीच्या सुरक्षा नियमांच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.

मुलांना कोरोना होऊ नये म्हणून किंवा कोरोना झाल्यानंतर पालकांनी काय काळजी घ्यायला हवी, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

नवी दिल्ली, 03 जून : कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) काही अंशी आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. मात्र आता तिसऱ्या लाटेची (Corona third wave) शक्यता वर्तवण्यात आली आहे. या लाटेत सर्व वयोगटातील हजारो मुलं कोरोना (Corona in child) पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आले. त्यामुळे पालकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून येत आहेत, त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गापासून दूर ठेवणं आवश्यक आहे.

मुलांचा कोरोनापासून बचाव कसा करायचा? कोरोनाची लागण झाली तर त्यांची काळजी कशी घ्यायची? त्यांच्यावर काय उपचार करायचे? पालकांच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञांनी दिलं आहे. पिडियाट्रिक गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट आणि आयसीएआरच्या टास्क फोर्स नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 (Navoc) चे डॉ. एन. के. अरोरा यांनी याबाबत मार्गदर्शन केलं आहे.

प्रश्न – नुकतेच काही राज्यांमध्ये मोठ्या संख्येने बालकं कोरोनाबाधित झाल्याचं आढळून आलं आहे. दुसऱ्या लाटेत बालकं अधिक संक्रमित होत आहेत, असं तुम्हाला वाटतं का?

उत्तर- लहान मुलं देखील मोठ्या माणसांप्रमाणे कोरोना संसर्गासाठी अधिक संवेदनशील असतात. आम्ही नुकत्याच केलेल्या सिरो सर्व्हेत 25 टक्के लहान मुलं कोरोनाग्रस्त आढळून आली आहेत. अगदी 10 वर्षे वय असणाऱ्या मुलांमध्येही मोठ्या माणसांप्रमाणे संसर्ग आढळून आला आहे. राष्ट्रीय आकडेवारीनुसार पहिल्या लाटेत 3 ते 4 टक्के लहान मुलं ही कोरोनाबाधित आढळली होती. दुसऱ्या लाटेत हा दर पूर्वी इतकाच होता. दराकडे दुर्लक्ष करून संख्येकडे पाहिलं तर दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित मुलांची संख्या वाढल्याचं दिसून आलं. पहिल्या लाटेच्या तुलनेत यावेळी मुलांमध्ये कोरोना संसर्ग अधिक प्रमाणात दिसून आला.

प्रश्न – यावेळी मुलांमध्ये कोरोना संसर्ग गंभीर स्वरुपाचा आहे का?

उत्तर – कोरोना संसर्ग झाल्यावर मुलांमध्ये एक तर संसर्गाची सौम्य लक्षणं दिसून आली किंवा बहुतांश मुलं ही असिम्प्टोमॅटिक (Asymptomatic) म्हणजे लक्षणं नसलेली होती. जर कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या तर साहजिकच मुलांमध्येही संसर्ग पसरण्याची शक्यता वाढते. अशा केसेसमध्ये कोरोनाग्रस्त मुलांचं वय 10 वर्षांपेक्षा कमी होतं.

हे वाचा - आयुर्वेदिक उपचार देताना एकही कोरोना बळी नाही; केंद्रीय रुग्णालयाचा मोठा दावा

तसंच बरेच रुग्ण असिम्प्टोमॅटिक होते किंवा त्यांच्यात खोकला आणि डायरियासारखी लक्षणं दिसून आली. गंभीर लक्षणांबाबत बोलायचं तर हृदयविकार, डायबेटिस, अस्थमा, कॅन्सर किंवा इम्युन सप्रेसेंटसंबंधी आजाराने पीडित मुलांमध्ये कोरोनाचा धोका सर्वाधिक दिसून आला. त्यामुळे आई-वडिलांनी यापैकी आजार असल्यास आपल्या मुलांना कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. कोरोना संसर्गाविषयी बोलायचं झालं मोठ्या संख्येने मोठी माणसं कोरोनाबाधित होत असल्याने साहजिकच मुलांमध्येही संसर्ग वाढतो आहे आणि त्यांची संख्याही वाढते आहे.

प्रश्न – कोरोनाबाधित मुलांवर जे उपचार केले जातात ते मोठ्या माणसांप्रमाणेच असतात की वेगळे असतात? तसंच असिम्प्टोमॅटिक मुलांना कोणती औषधं दिली जाऊ शकतात का?

उत्तर – सौम्य लक्षणं असणाऱ्या कोरोनाबाधित मुलांना ताप कमी होण्यासाठी पॅरासिटेमॉल दिली जाऊ शकते. डायरिया झाला असेल तर ओरल डिहाइड्रेशन फूड आणि पुरेशा प्रमाणात लिक्विड दिलं जाऊ शकतं. सौम्य ते गंभीर लक्षणं असणाऱ्या मुलांवर मोठ्या माणसांप्रमाणे उपचार केले जाऊ शकतात. परंतु मुलास जर श्वास घेण्यास त्रास होत असेल, गंभीर स्वरुपाच्या खोकल्यामुळे मूल दूध पिऊ शकत नसेल, हायपोक्सिया किंवा तीव्र ताप असेल, त्वचेवर लालसर चट्टे उठले असतील, जास्त वेळ झोपून राहणं किंवा कोणतीही असामान्य लक्षणं दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क करावा. मुलांमध्ये दीर्घकालीन कोरोनाचीही लक्षणं आढळून येत आहेत. संसर्गातून मूल बरे झाल्यानंतर 3 ते 6 महिन्यांनी डायबेटिस किंवा हायपरटेन्शनची लक्षणं दिसून येत आहेत. त्यामुळे अशा मुलांच्या इलाजासाठी त्यांच्या पालकांनी सातत्यानं डॉक्टरांच्या संपर्कात राहिले पाहिजे.

प्रश्न – जर आई-वडिल कोरोना निगेटिव्ह पण मुलं पॉझिटिव्ह असतील तर त्यांची काळजी कशी घ्यावी, तसंच आपण स्वतः पॉझिटिव्ह होऊ नये, यासाठी काय दक्षता घ्यावी?

उत्तर – अशा स्थितीत मुलांना हा संसर्ग बाहेरून झाल्याची शक्यता असते. अशावेळी कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी. जो सदस्य कोरोनाबाधित मुलाची देखभाल करणार आहे, त्याने बचावात्मक साधनांचा म्हणजेच मास्क (Mask), हँडग्लोव्हज, फेसशिल्डचा वापर करणं आवश्यक आहे. कोरोनाबाधित मुलाची देखभाल ही एका डॉक्टरने दिलेल्या गाईडलाईननुसार केली जावी. देखभाल करणारा नातेवाईक आणि कोरोनाबाधित मुलास तातडीनं आयसोलेट (Isolate) करावं.

प्रश्न – आम्ही मुलांचा कोरोना संसर्गापासून कसा बचाव करायचा?

उत्तर – मोठी मुलं कोरोना गाईडलाईन्सचं पालन करून संसर्गापासून आपला बचाव करू शकतात. 2 वर्षांखालील मुलांना मास्क न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना घरात राहणं अनिवार्य आहे. घरात राहत असताना त्यांना सातत्याने शारीरिक हालचालींमध्ये व्यस्त ठेवावं. कारण लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पहिली पाच वर्षे महत्त्वाची असतात.

हे वाचा - लहान मुलांवरील कोरोना लशीचं ट्रायल थांबवा; याचिकाकर्त्याने का घेतली कोर्टात धाव?

घरातील 18 वर्षांवरील मुलांनी लसीकरण (Vaccination) करून घ्यावं. संसर्गापासून मोठ्यांचा बचाव झाला तर मुलंही सुरक्षित राहतील. आपल्या बाळाला स्तनपान देत असलेल्या महिलांनी लस घेणं सुरक्षित आहे. त्यामुळे अशा महिलांनी देखील लस घ्यावी.

First published:

Tags: Corona, Corona patient, Coronavirus, Small child