मुंबई, 09 जुलै: लसींचा (Corona Vaccination) उपलब्ध साठा नसल्यानं आज पुन्हा एकदा मुंबईतील (Mumbai) लसीकरणाची मोहीम थंडावली आहे. आज 9 जुलै, 2021 रोजी मुंबईतील शासकीय आणि महापालिका (BMC) केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. लसींचा साठा मर्यादित असल्यानं गुरुवारी दिवसभरात केवळ 45 हजार नागरिकांना लस मिळाली. दरम्यान आज लसींचा (Mumbai Vaccination) साठा शिल्लक नसल्यानं लसीकरण मोहीम बंद राहणार आहे. या आठवड्यात केंद्र सरकारकडून लसींचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे मुंबईतील लसीकरण मोहीम काही प्रमाणात मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडीमध्येही आज लसीकरण बंद राहणार आहे. मुंबई पालिकेकडील लशींचा साठा संपल्यामुळे 1 जुलैला सरकारी आणि पालिका केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात आलं होतं.
Dear Mumbaikars,
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 8, 2021
Please note that all BMC and Government vaccination centers will remain closed tomorrow (July 9, 2021).
We apologize for the inconvenience.
Please watch this space for updates regarding vaccination centres and schedules.#MyBMCvaccinationUpdate https://t.co/3M3bRR783X
कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज दिनांक 9 जुलै 2021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. मुंबईकर नागरिकांनी मुंबई पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहनही मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. हेही वाचा- राज्यातल्या पावसासंदर्भातली मोठी बातमी, हवामान खात्यानं दिली GOOD NEWS मुंबईत आठवड्याभरात दुसऱ्यांदा पालिकेकडील लससाठा संपला आहे. मंगळवारी आणि बुधवारी अनुक्रमे सुमारे 42 हजार आणि 52 हजार जणांचे लसीकरण करण्यात आले.