मराठी बातम्या /बातम्या /देश /लहान मुलांचं सप्टेंबरपासून लसीकरण होणार? Zydus Cadila लशीबाबत प्रमुखांनी दिली माहिती

लहान मुलांचं सप्टेंबरपासून लसीकरण होणार? Zydus Cadila लशीबाबत प्रमुखांनी दिली माहिती

लहान मुलांसाठी लवकरात लवकर लस उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) लशीला लवकरच आपत्कालीन वापरासाठीची परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे.

लहान मुलांसाठी लवकरात लवकर लस उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) लशीला लवकरच आपत्कालीन वापरासाठीची परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे.

लहान मुलांसाठी लवकरात लवकर लस उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) लशीला लवकरच आपत्कालीन वापरासाठीची परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 9 जुलै: कोरोना साथीच्या विळख्यातून सुटका होण्यासाठी देशात लसीकरणाला (Vaccination) वेग दिला जात आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत (Third Wave) लहान मुलांना धोका असल्याचं म्हटलं जात असल्यानं लहान मुलांसाठी लस उपलब्ध होण्याची तीव्र निकड भासत आहे. बालरोग तज्ज्ञ संघटनांसह मुलांशी संबंधित बर्‍याच तज्ज्ञ समूहांनी कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत मुलांना धोका असण्याचा अंदाज चुकीचाही असून शकतो असं म्हटलं असलं, तरीही आता तिसऱ्या लाटेत कोणताही धोका पत्करण्याची सरकारची तयारी नाही.

    याकरता लहान मुलांसाठी लवकरात लवकर लस उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) लशीला लवकरच आपत्कालीन वापरासाठीची परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सप्टेंबरपासून ही लस देता येऊ शकते, अशी माहिती लस विषयक राष्ट्रीय तज्ज्ञ समितीचे (National Expert Group on Vaccine Administration) प्रमुख डॉ. एन. के. अरोरा (Dr. NK Arora) यांनी दिली आहे.

    झायडस कॅडिलाच्या लसीच्या चाचण्यांचा अहवाल लवकरच येण्याची शक्यता आहे. तसंच भारत बायोटेकची (Bharat Biotech) लहान मुलांसाठीची कोवॅक्सिन (Covaxin) लसही लवकरच उपलब्ध होऊ शकते. तिच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असून, त्या सप्टेंबरच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे देशात 12 ते 18 वर्षे वयातील मुलांचं लसीकरण ऑक्टोबर ते डिसेंबर किंवा जानेवारी-फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरू होऊ शकते, असं अरोरा यांनी स्पष्ट केलं.

    (वाचा - Cytomegalovirus: काय आहेत याची लक्षणं आणि कोविड-19 शी याचा कसा आहे संबंध?)

    दरम्यान, देशाचे नवे आरोग्यमंत्री (New Health Minister) मनसुख मंडावीया (Mansukh Mandavia) यांनी, सरकार आरोग्य क्षेत्रासाठी एक पायाभूत सुविधा पॅकेज तयार करत असल्याचं म्हटलं आहे. 9 महिन्यांत हे पॅकेज लागू केलं जाणार असून, या अंतर्गत देशातील 736 जिल्ह्यात बालरोग केंद्रं सुरू केली जातील आणि त्यात मुलांसाठी सुमारे 4 हजार आयसीयू बेड असतील.

    गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालय बंद असल्याने मुलांच्या शिक्षणाचं अतोनात नुकसान होत आहे, त्यामुळे लस लवकर आल्यास मुलांचं लसीकरण करून त्यांना सुरक्षित करता येईल आणि शाळा, महाविद्यालय सुरू करता येतील. मुलांच्या लसीकरणाशी संबधित विविध मुद्द्यांवर गांभिर्याने विचार केला जात असल्याचं अरोरा यांनी सांगितलं.

    (वाचा - झोप नाही तर अँटिबॉडीज नाहीत; लस घेतल्याचाही नाही होणार फायदा)

    कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका बसलेल्या दिल्ली आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांनीही आपल्या पातळीवर मुलांच्या उपचारासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उभारण्यावर भर दिला आहे. अनेक ठिकाणी विशेष रुग्णालयं, तज्ज्ञांची टीम, आवश्यक औषधाची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं असून अनेक ठिकाणी या सुविधा सज्ज झाल्या आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Corona vaccine, Coronavirus