Home /News /explainer /

Explainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का? मान्सूनचं चक्र बिघडलंय का?

Explainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का? मान्सूनचं चक्र बिघडलंय का?

गणपती संपले पण पावसाचे ढोल-ताशे अजून जोरदार सुरूच आहेत. या वर्षीही मान्सून उशिरा परतणार का? मान्सूनचं चक्र (Monsoon Cylcle) बिघडलंय का?

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर: गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देशभरातलं पाऊसमान (Rainfall in India during Monsoon) सर्वसाधारण होतं; मात्र सप्टेंबर महिना सुरू झाला आणि पहिल्या 15 दिवसांतच अनेक ठिकाणी पावसाने अनेक विक्रम (September Rain) केले. सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत एका दिवसात जर 1500 टक्के जास्त पाऊस झाला, तर काय होईल बरं? तसंच झालं. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तर भारतात आणि दक्षिण भारतातही अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस झाला. महाराष्ट्रातही गणपती संपले पण पावसाचे ढोल-ताशे अजून जोरदार सुरूच आहेत. इतक्यात मान्सूनची माघार नाही, असं राज्यातल्या हवामान तज्ज्ञांनीही (Weather Forecast) सांगितलं आहे. उलट दोन दिवस राज्यात (Weather alert in Maharashtra) बहुतेक भागात पावसाचे इशारेही देण्यात आले आहेत. हे नेमकं कशामुळे होतंय? पावसाचं चक्र (Monsoon Cycle) थोडं पुढे सरकतंय का? की यामागे आणखी काही कारण आहे, ज्यामुळे गेल्या दोन वर्षांत सप्टेंबर (September Rains) महिन्यात इतका प्रचंड पाऊस कोसळतो आहे? ही परिस्थिती नॉर्मल नाही, असं हवामान विशेषज्ञही सांगत आहेत. राज्यात मुसळधार पावसाचा धोका;मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा भारतीय हवामान खात्याच्या (IMD) म्हणण्यानुसार, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत जवळपास निम्म्या देशात, अगदी नेमक्या आकड्यात सांगायचं, तर 48 टक्के भागात सप्टेंबरच्या नॉर्मल प्रमाणापेक्षा खूप जास्त पाऊस झाला. संपूर्ण देशाबद्दल बोलायचं झालं, तर सप्टेंबरमधल्या सर्वसाधारण प्रमाणाच्या तुलनेत देशभरात 129 टक्के अधिक पाऊस झाला. 10 ते 14 सप्टेंबर या चार-पाच दिवसांत तर दिल्ली, लखनौ, गोवा, ओडिशा या राज्यांत पावसाने हाहाकार माजवला आणि जनजीवन विस्कळीत झालं. 14 सप्टेंबर या एकाच दिवशी देशातल्या अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस झाला. तो पाऊस इतका जास्त होता, की वेगवेगळ्या राज्यांमध्ये भारतीय हवामान विभागाला रेड अॅलर्ट जारी करावे लागले. ओडिशामध्ये तर त्या एका दिवसाच्या पावसाने तिथल्या जवळपास सहा नद्यांना पूर आला. नदीकिनारी राहणाऱ्या 1500 हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. Weather Update: राज्यात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा; कधी थांबतील कोसळधारा? भारतीय हवामान विभागाने देशाची 36 हवामान उपविभागांमध्ये (Meteorological Sub Divisions) विभागणी केलं आहे. हे उपविभाग वेगवेगळी भौगोलिक स्थिती असलेले आहेत. उत्तर प्रदेशात दोन पूर्व आणि दोन पश्चिम सबडिव्हिजन्स आहेत. गुजरातमध्ये सौराष्ट्र हे एका सबडिव्हिजनमध्ये येतं, तर बाकीचं गुजरात दुसऱ्या सबडिव्हिजनमध्ये. याच प्रकारे राजस्थानमध्येही पूर्व आणि पश्चिम असे दोन सबडिव्हिजन्स आहेत. महाराष्ट्रात कोकण-गोवा, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र असे चार सबडिव्हिजन्स आहेत. सोबतचा नकाशा पाहिला, तर हवामानानुसार देशाचे सबडिव्हिजन्स अधिक चांगल्या प्रकारे कळू शकतील. 14 सप्टेंबरला काय झालं? या दिवशी सौराष्ट्र आणि गुजरातमध्ये नॉर्मल प्रमाणापेक्षत्रा 951 टक्के जास्त जास्त पाऊस झाला. राजकोटमध्ये 516 टक्के जास्त पाऊस झाला. जामनगरमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली. पावसाच्या थेंबांपासून होणार वीजनिर्मिती; IIT दिल्लीने विकसित केलं खास तंत्रज्ञान ओडिशामध्ये 881 टक्के जास्त पाऊस झाला. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही साधारण अशीच काहीशी स्थिती होती. 20 सप्टेंबरच्या दरम्यान कोलकात्यात एवढा पाऊस झाला, की शहर पाण्यात गेलं. एवढा पाऊस तिथे गेल्या 14 वर्षांत कोसळला नव्हता. असं का झालं? हवामानशास्त्रज्ञ म्हणतात, हवामानबदलामुळे बंगालच्या उपसागरात सप्टेंबर महिन्यात दोन-तीनदा कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं. त्यामुळे पावसासाठी अनुकूल स्थिती अचानक उत्तरेपासून पूर्वेकडच्या किनारी भागांमध्ये निर्माण झाली. आता असं वारंवार होऊ शकतं, असं हवामानशास्त्रज्ञांना वाटतं. पावसाळ्याच्या दिवसांत पाऊस खूप जास्त पडू शकतो आणि उन्हाळ्याच्या दिवसांत उन्हाळा तीव्र होऊ शकतो. कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं, की त्याचा प्रभाव साधारण 10 दिवसांपर्यंत राहतो. ओडिशामध्ये टोकाची परिस्थिती हवामानबदलामुळे ओडिशात (Odisha) प्रत्येक हंगामात तीव्रता अनुभवायला मिळते आहे. आधी तिथे उन्हाळ्यात प्रचंड उष्ण वारे वाहू लागले. त्यानंतर दुष्काळासारखी स्थिती निर्माण झाली. कारण जुलै-ऑगस्टपर्यंत पुरेसा पाऊस नव्हता. भातलागवड तर करून झाली होती; मात्र शेतात पुरेसं पाणीच नव्हतं. नंतर पाऊस आला; पण तो इतका कोसळला, की भातशेती पाण्याखाली बुडाली. हवामानबदल (Climate Change) वेगाने होऊ लागल्यामुळे देशात अनेक ठिकाणी असा पाऊस पडतोय, की तसा गेल्या काही दशकांत झाला नव्हता. येत्या काही दशकांत अशा परिस्थितीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर स्थलांतरही करावं लागू शकतं. साधारणतः सप्टेंबर महिन्यात एवढा पाऊस अनुभवायला मिळत नाही. कारण हा परतीच्या मान्सूनचा कालावधी असतो; मात्र या वेळी सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस पडतोय. याचाच अर्थ असा, की गेल्या 60 वर्षांच्या तुलनेच सलग दुसऱ्या वर्षी मान्सून परतायला उशीर होत आहे. यापूर्वी 1960 साली मान्सून उशिरा परतला होता. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार 1901 सालापासून अशी स्थिती या वर्षी चौथ्यांदा आली आहे. रायगड, रत्नागिरीला झोडपलं ही झाली सप्टेंबर महिन्यातली स्थिती; पण या वर्षी जुलै महिन्यातही देशाच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्राचा समावेश होतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात आणि त्यातही रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जुलै महिन्याच्या अखेरीला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं होतं.

Explainer: मुंबई, गोवाच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळले काळे चिकट गोळे, नक्की काय आहे हे आणि किती धोकादायक?

 चिपळूणची वाशिष्ठी, खेडची नारिंगी आणि जगबुडी, संगमेश्वरची शास्त्री आणि सोनवी, लांज्यातली काजळी, राजापूरची अर्जुना यांसह रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच महत्त्वाच्या नद्यांना प्रचंड पूर आला होता. चिपळुणात तर महापुराने 2005च्या पुराची पातळीही केव्हाच मागे टाकली आणि प्रचंड हाहाकार माजवला. रायगड जिल्ह्यात दरडी कोसळून काही कुटुंबं त्याखाली गाडली गेली. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातही दरड कोसळून जीवित आणि वित्त हानी झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही पुराचा फटका बसला. मुळातच कोकणात प्रचंड पाऊस पडतो. तितल्या सर्वसामान्य पावसाच्या प्रमाणाच्याही किती तरी पट अधिक पाऊस पडल्याने ही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा सप्टेंबरमध्येही खूप पाऊस पडतो आहे.
First published:

Tags: Monsoon, Weather, Weather warnings

पुढील बातम्या