राज्यात 4-5 दिवसांपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to very heavy rainfall) पावसानं हजेरी लावली आहे.
उद्या जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे सात जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने आज कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, परभणी आणि नांदेड हे आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी केला आहे.
पुढील काही तासांत याठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात हळुहळू पावसाचा जोर कमी होणार आहे. तर विकेंडला पुन्हा राज्यातून मान्सून गायब होण्याची शक्यता आहे.
नागरिकांना हवामान तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्व राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशाच्या काही भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे.
येत्या काळात बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्याची स्थिती मंदावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्रामुळे येत्या 48 तासात तीव्रता कमी होण्याची शक्यता कमी होऊन ते ओडीशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या दिशेने पुढच्या 3 दिवसात सरकेल.