• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • आता पावसाच्या थेंबांपासून होणार वीजनिर्मिती; IIT दिल्लीचे अफलातून तंत्रज्ञान

आता पावसाच्या थेंबांपासून होणार वीजनिर्मिती; IIT दिल्लीचे अफलातून तंत्रज्ञान

पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा ढगाळ वातावरणामुळे सोलार उपकरणे काम करत नाहीत. अशा वेळी पावसाच्या पाण्यापासून ऊर्जा निर्माण करणारे हे उपकरण बरेच फायद्याचे ठरणार आहे.

पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा ढगाळ वातावरणामुळे सोलार उपकरणे काम करत नाहीत. अशा वेळी पावसाच्या पाण्यापासून ऊर्जा निर्माण करणारे हे उपकरण बरेच फायद्याचे ठरणार आहे.

पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा ढगाळ वातावरणामुळे सोलार उपकरणे काम करत नाहीत. अशा वेळी पावसाच्या पाण्यापासून ऊर्जा निर्माण करणारे हे उपकरण बरेच फायद्याचे ठरणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : आपल्याकडे पाऊस म्हटलं की वीज जाणं हे फिक्सच असतं. पावसाचं वातावरण जरी झालं, तरी आपल्याला अंदाज येतो की आता काही वेळात लाईट जाऊ शकते. मग आपण तातडीने आपले मोबाईल आणि इतर डिव्हाईसेस चार्ज करून घेतो. पण जर या पावसाच्या मदतीनेच वीज (Generate electricity from raindrops) तयार झाली तर? होय, हे खरंय. चक्क पावसाच्या थेंबांपासून वीजनिर्मिती करण्यात संशोधकांना यश मिळालं आहे. विविध संस्थांच्या मदतीने, तीन वर्षं अभ्यास केल्यानंतर IIT दिल्लीने (IIT Delhi) हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
  देशात गेल्या कित्येक वर्षांपासून याबाबत संशोधन सुरू आहे. आता दिल्ली IIT ने विकसित केलेले हे उपकरण या संशोधनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो आहे. पावसाच्या थेंबांमध्ये असलेली कायनॅटिक एनर्जी (Kinetic energy) आणि इलेक्ट्रिक चार्ज (Electric charge) यांच्या मदतीने वीज निर्माण करण्यासाठी हे उपकरण तयार करण्यात आले आहे. या उपकरणाचे डेमो मॉडेल तयार झाले असून, लवकरच पेटंट प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. लवकरच या मशीनच्या माध्यमातून छोटी उपकरणे चार्ज (Electricity from rain) होतील, असं आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
  हे उपकरण लिक्विड-सॉलिड इंटरफेसने बनवण्यात आले आहे. पावसाचे थेंब यावर जोरात आदळण्यानंतर होणाऱ्या ‘ट्रिबोइलेक्ट्रिक इफेक्ट’च्या (Triboelectric effect) माध्यमातून यात वीज निर्माण (Electricity from raindrops) होईल. यामुळे या उपकरणात असलेले नॅनो सेल्स चार्ज होणार आहेत. नॅनोकंपोझिट पॉलिमर्सचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या या उपकरणाची निर्मिती करण्यासाठी तीन वर्षांहून अधिक काळ लागला. आयआयटी दिल्लीसोबतच (IIT Delhi new experiment) मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन, टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने हे संशोधन करण्यात आले आहे. भविष्यात पावसाच्या पाण्याप्रमाणेच, समुद्राच्या लाटांचा (Electricity from sea waves) वापर करुन वीज तयार करण्याचाही विचार हे करत आहेत.
  देशात आतापर्यंत हायड्रो पॉवर प्रोजेक्टच्या (Hydro power project) मदतीन वीजनिर्मिती केली जात होती. कित्येक तज्ज्ञांनी यामुळे भूस्खलन आणि भूकंप येण्याची भीती व्यक्त केली आहे. यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असंही सांगण्यात येत आहे. अशात IIT दिल्लीने केलेल्या या संशोधनाचा नक्कीच भविष्यात मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. या उपकरणाला पेटंट मिळाल्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य होईल. यानंतर कदाचित काही काळातच हे उपकरण सर्वांसाठी उपल्बध केले जाईल.
  पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा ढगाळ वातावरणामुळे सोलार उपकरणे काम करत नाहीत. अशा वेळी पावसाच्या पाण्यापासून ऊर्जा निर्माण करणारे हे उपकरण बरेच फायद्याचे ठरणार आहे. यामुळे आता आपल्याला वर्षभर अक्षय्य ऊर्जा वापरता येणार आहे.
  First published: