Home /News /explainer /

Explainer: मुंबई, गोवाच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळले काळे चिकट गोळे, नक्की काय आहे हे आणि किती धोकादायक?

Explainer: मुंबई, गोवाच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळले काळे चिकट गोळे, नक्की काय आहे हे आणि किती धोकादायक?

गोव्याच्या बीचेसवर आणि मुंबईच्या समुद्रकिनारीसुद्धा चिकट काळे Tarballs दिसून येत आहेत. कशामुळे आहे हे? धोकादायक आहेत का?

मुंबई, 21 सप्टेंबर: मुंबई (Mumbai) आणि गोव्याच्या (Goa) किनाऱ्यांवर नागरिकांना मागील अनेक दिवसांपासून काळ्या रंगाचे गोळे दिसत आहेत. मोठ्या प्रमाणावर असलेले हे काळे गोळे (Black oil balls) नक्की कशाचे आहेत हे मात्र कुणालाही सांगता येत नव्हते. लोकांच्या मनात याबाबत भीतीही निर्माण झाली. पण हे गोळे धोकादायक नसल्याचं समजल्यावर ही भीती दूर झाली. समुद्र (Sea) किनाऱ्यावर आढळत असलेल्या या चिकट आणि दुर्गंधीयुक्त गोळ्यांना टार बॉल (tarballs) म्हणतात. याच महिन्यात मुंबई महापालिकेने मुंबई आणि वर्सोवा किनाऱ्यांवरून तब्बल 20 हजार किलोचे हे काळे गोळे बाहेर काढले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला गोव्याचा समुद्र किनारा काळ्या चिकट थराने झाकलेला दिसला. समुद्र किनाऱ्यावर जणू काही कोणी काळे गालिचे घातले आहेत असं दिसून येत होतं. हे टार बॉल नक्की काय आहेत हे आपण जाणून घेऊयात. हे टार बॉल समुद्रातून किनाऱ्यावर येतात. चिकट आणि गडद रंगाचे हे टार बॉल महासागराच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या कच्च्या तेलापासून बनलेले असतात. समुद्राच्या वातावरणात कच्च्या तेलाचा अपक्षय होतो तेव्हा हे काळे गोळे तयार होतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनॉग्राफीच्या संशोधकांनी या टार बॉलवर विशेष संशोधन केलं आहे. Explainer : नेमका कसा होणार कोरोना महासाथीचा अंत? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनॉग्राफीच्या (National Institute of Oceanography) लक्ष्मण शिंदे, वर्षा,सुनील, व्ही. शेणॉय, बेले दामोदरा यांनी या टार बॉलवर शोध निबंध लिहिला आहे. शोध निबंधाचं शीर्षक होतं 'टार बॉलशी संबंधित बॅक्टेरिया आणि बुरशीची विविधता: अलीकडील उत्क्रांती आणि शक्यता'. टार बॉल समुद्राच्या पाण्याखालील प्रवाह आणि लाटांमुळे किनाऱ्यावर फेकले जातात, असं या अभ्यासात सांगण्यात आलं आहे. पावसाळ्यात वाढतं प्रमाण समुद्रातून जात असलेल्या प्रचंड मालवाहू जहाजांमधून मोठ्या प्रमाणावर तेल बाहेर येतं. वारा आणि लाटांमुळे समुद्राच्या पृष्ठभागावर सांडलेल तेल पसरलं जातं. विस्तृत भागात पसरलेल्या या तेलावर अनेक भौतिक, रासायनिक आणि जैविक प्रक्रिया होऊन तुकडे तयार होतात. त्यानंतर गोळ्यांच्या रूपात हे तेलाचे तुकडे किनाऱ्याकडे ढकलले जातात. हे टार बॉल विशेषतः पावसाळ्यात जोरदार वाऱ्यांमुळे किनाऱ्यांवर पोहोचतात. अरबी समुद्रात पसरलेलं सर्व तेल अखेरीस पश्चिम किनारपट्टीवर जमा होतं, असं या अभ्यासात सांगण्यात आलं आहे. AC भिंतीच्या वरच्या बाजूलाच का लावतात; खाली लावला तर काय होईल? समुद्र किनाऱ्यावरून टार बॉल हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने एका सफाई कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. भरती आल्यानंतर हे टार बॉल काढण्याचं काम केलं जातं. 4 सप्टेंबर रोजी जुहू समुद्रकिनारी अनेक टार बॉल गोळा करण्यात आले. टार बॉलची ही समस्या फक्त मुंबई आणि गोव्यापुरती मर्यादित नाही. कधीकधी ते गुजरात आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर देखील दिसतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) तज्ज्ञांनी या टारबॉल्सचे नमुने घेऊन त्यांचा अभ्यास केला होता आणि त्यांची उत्पत्ती शोधून काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तो शोध लागला नव्हता.
First published:

Tags: Environment, Goa, Mumbai, Sea

पुढील बातम्या