मराठी बातम्या /बातम्या /explainer /Ryan kaji | 10 वर्षांच्या YouTuber ची कमाई पाहून तुमचेही डोळे पांढरे होतील!

Ryan kaji | 10 वर्षांच्या YouTuber ची कमाई पाहून तुमचेही डोळे पांढरे होतील!

इंटरनेटच्या (Internet) जगात 10 वर्षांचा असा यूट्यूबर (YouTubers) मुलगा आहे, की त्याची कमाई पाहून तुमचेही डोळे पांढरे होतील. रायन काजी (Ryan kaji) असं या लहान मुलाचं नाव असून युट्युबच्या जगात तो खूप लोकप्रिय आहे.

इंटरनेटच्या (Internet) जगात 10 वर्षांचा असा यूट्यूबर (YouTubers) मुलगा आहे, की त्याची कमाई पाहून तुमचेही डोळे पांढरे होतील. रायन काजी (Ryan kaji) असं या लहान मुलाचं नाव असून युट्युबच्या जगात तो खूप लोकप्रिय आहे.

इंटरनेटच्या (Internet) जगात 10 वर्षांचा असा यूट्यूबर (YouTubers) मुलगा आहे, की त्याची कमाई पाहून तुमचेही डोळे पांढरे होतील. रायन काजी (Ryan kaji) असं या लहान मुलाचं नाव असून युट्युबच्या जगात तो खूप लोकप्रिय आहे.

न्यूयॉर्क, 3 डिसेंबर: इंटरनेटच्या Internet) जगात काही यूट्यूबर (YouTubers) इतके पैसे कमावतात की ते लोकांचे आदर्श झाले आहेत. असाच एक 10 वर्षांचा मुलगा YouTuber असून तो गेल्या 6 वर्षात स्टार बनला आहे. त्याने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम केले आहेत. रायन काजी (Ryan kaji) लहान मुलांच्या जगात खूप लोकप्रिय असून दरवर्षी त्याची कमाई वाढतच चालली आहे. त्याची प्रेक्षकसंख्या दरवर्षी वाढत आहे. या मुलाची एकूण संपत्ती लाखो डॉलर्सपर्यंत कशी पोहोचली ते जाणून घेऊया.

कोण आहे रायन काझी?

आज जग रायन काझीला प्रसिद्ध You Tuber म्हणून ओळखते. 6 ऑक्टोबर 2011 रोजी टेक्सास, यूएसएमध्ये जन्मलेला रायन त्याची आई लोन काझी आणि वडील शिओन काझी यांच्यासमवेत त्याचे स्वतःचे YouTube चॅनेल चालवतो, ज्यामध्ये रायनच्या धाकट्या जुळ्या बहिणी केट आणि एम्मा देखील आहेत. आज Ryan चे YouTube चॅनल Ryan's World, जे पूर्वी Ryan Toy Review म्हणून ओळखले जात होते.

चॅनेलची सुरुवात कशी झाली?

2015 मध्ये वयाच्या चौथ्या वर्षी, रायनने YouTube वर खेळण्यांचे Review करणारे चॅनेल पाहत असताना, त्याच्या आईला प्रश्न विचारला की तो इतर मुलांप्रमाणे यूट्यूबवर का दिसत नाही. यातून प्रेरित होऊन रायनच्या आईने तिची रसायनशास्त्राच्या शिक्षकाची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि तिचे लक्ष YouTube चॅनल तयार करण्यावर केंद्रित केले. YouTube वर जाण्यापूर्वी कुटुंबाने त्यांचे आडनाव गुआनवरून बदलून काझी केले होते.

रायनची एकूण संपत्ती किती आहे?

आज रायनच्या यूट्यूबवर लाखो प्रेक्षक आहेत, ज्यांच्या अनेक व्हिडिओंच्या व्ह्यूजची संख्या अब्जावधीपर्यंत पोहोचली आहे. लोकांना हे जाणून आश्चर्य वाटले की रायनची स्वतःची संपत्ती 3.2 कोटी डॉलर आहे, तर दुसऱ्या अंदाजानुसार ती 50 कोटी डॉलरवर पोहोचली आहे. आज काजी कुटुंबाची संपत्तीही करोडोंमध्ये आहे.

फ्लिपकार्टची नवी ऑफर... फक्त 15 रुपयात घेता येईल Oppo चा नवा स्मार्टफोन!

त्याच्या सब्सक्राइबर्स काय स्थिती आहे?

आज रायनच्या चॅनेलचे एकूण 4 कोटींहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. रायनच्या व्हिडिओंना आतापर्यंत 44 अब्ज पेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. त्‍याच्‍या चॅनलमध्‍ये रोज काही नवे व्हिडिओ लाँच होत असतात. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, रायनच्या Hughes Eggs Surprise Toys Challenge ला विक्रमी 2 अब्ज व्ह्यूज मिळाले.

Living Robot | आता जिवंत रोबोट मुलं जन्माला घालणार? अमेरिकेत प्रयोग

रायनच्या नावावर हजारो खेळणी विकली जातात

रायनच्या कुटुंबाने रायनच्या नावावर परवाना मिळवला आहे, ज्यामध्ये Ryans Worlds मधील 5,000 हून अधिक उत्पादनांमध्ये खेळणी, अॅक्शन फिगर, फेस मास्क, होम डेकोर वस्तूंचा समावेश आहे. फोर्ब्सच्या मते, 2016-17 मध्ये युट्यूबमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये रायनचे कुटुंब 8व्या स्थानावर आहे.

खेळण्यांची मालिका

यूट्यूबवर रायनची मुख्य कमाई जाहिरातींमधून येते. 2017 मध्ये रायनच्या पालकांनी पॉकेट वॉच कंपनीसोबत करार केला, जी रायनच्या YouTube चॅनेलसाठी मार्केटिंग आणि विक्रीचे काम करते. अशाप्रकारे उत्पादन लाइनशी संबंधित असलेला रायन हा पहिला मुलगा ठरला. यानंतर न्यूयॉर्क टॉय फेअरने नवीन खेळण्यांची मालिका जाहीर केली. पुढच्या वर्षी ही साखळी वॉलमार्ट आणि अॅमेझॉनवरही दिसू लागली.

कोणीच पाहू शकणार नाही तुमचं सिक्रेट WhatsApp Chat, असं करा Hide

एवढी कमाई करण्याच्या बाबतीतही रायनला नशीबवान मानले जाते. यूट्यूबवर अधिक सब्सक्राइबर असल्याने, अधिक पसंती मिळाल्यामुळे, लोकांना प्रायोजक मिळू लागतात जे त्यांच्या जाहिराती देऊन त्या व्यक्तीला भरपूर पैसे देतात. रायनची लोकप्रियता कालांतराने झपाट्याने वाढली, ज्याचा खेळण्यांच्या उद्योगावर मोठा परिणाम झाला, ज्याचा रायन आणि त्याच्या कुटुंबाला फायदा झाला.

First published:

Tags: Youtube, YouTube Channel, Youtubers