न्यूयॉर्क, 2 डिसेंबर : विज्ञानाने (Science) इतकी प्रचंड प्रगती केली आहे की आता फक्त बोलायचा उशीर की गोष्टी घडायला सुरुवात होते. या प्रगतीचा वेग पाहता आता तो दिवस दूर नाही जेव्हा माणूस स्वतः मानवाला कृत्रिमरीत्या तयार करू शकेल. सोबतच वैज्ञानिक पद्धतीने मुलंही निर्माण करेल. सध्यातरी शास्त्रज्ञ याला अजून खूप वेळ असल्याचे सांगत आहे. असे असले तरी याची पहिली पायरी विज्ञानाने यशस्वी पार केली आहे. जगातील पहिला जिवंत रोबोट (Living Robots) तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांचा दावा आहे की आता ते जैविक पुनरुत्पादन (Reproduction) देखील करू शकतील, म्हणजेच ते स्वतःच्या मुलांना जन्म देऊ शकतील. ही गोष्ट सध्या विज्ञान कथेतील वाटत असली तरी भविष्यात प्रत्यक्षात येऊ शकते.
जिवंत रोबोट कसा तयार केला?
अमेरिकन शास्त्रज्ञांनी आफ्रिकन Xenopus laevis नावाच्या बेडकाच्या स्टेम पेशींद्वारे रोबोट विकसित केला आहे, ज्याला त्यांनी Xenobots नाव दिलंय. तो फक्त एक मिलिमीटरपेक्षा कमी असून गेल्या वर्षी त्याला पहिल्यांदा प्रदर्शनात आणले गेले होते. त्यावेळी प्रयोगांमध्ये तो चालणे, गटांमध्ये एकत्र काम करणे आणि स्वत:चे औषधोपचार करण्यास देखील सक्षम असल्याचे पहायला मिळाले.
नवीन प्रकारचे जैविक पुनरुत्पादन
आता व्हरमाँट युनिव्हर्सिटी ऑफ टफ्ट्स युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या वाईज इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकलली इंस्पायर्ड इंजिनिअरिंगच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की त्यांनी जैविक पुनरुत्पादनाचा एक नवीन प्रकार शोधला आहे, जो विज्ञानाला ज्ञात असलेल्या कोणत्याही वनस्पती किंवा प्राण्यांच्या पुनरुत्पादनापेक्षा वेगळा आहे.
धक्कादायक शोध
या नवीन अभ्यासाचे सहप्रमुख लेखक आणि टफ्ट्स विद्यापीठातील जीवशास्त्राचे प्राध्यापक आणि अॅलन डिस्कव्हरी सेंटरचे संचालक मायकेल लेव्हिन, म्हणाले की या शोधाचा त्यांना धक्का बसला आहे. सीएनएसच्या अहवालानुसार, त्यांनी सांगितले की बेडकांची पुनरुत्पादनाची स्वतःची पद्धत असते. पण, जेव्हा उर्वरित भ्रूणातून पेशी सोडल्या गेल्या आणि त्यांना नवीन वातावरण मिळाले तेव्हा असे धक्कादायक परिणाम आढळले.
Robot ला तुमचा चेहरा वापरण्याची परवानगी द्या आणि मिळवा 1.5 कोटी रुपये
हे खरोखर जीव आहेत का?
नवीन वातावरणात त्यांना या वर्तणुकीचा एक नवीन मार्ग मिळालाय. इतकेच नाही तर पुनरुत्पादनाचा एक नवीन मार्ग देखील सापडला. स्टेम पेशी सामान्य पेशी असतात ज्यात विविध प्रकारच्या पेशींमध्ये विकसित होण्याची क्षमता असते. झेनोबॉट्स तयार करण्यासाठी, संशोधकांनी बेडकाच्या भ्रूणांमधून जिवंत स्टेम पेशी काढल्या आणि त्यांना उष्मायनासाठी सोडले. यामध्ये जीन्ससोबत कोणतीही छेडछाड झाली नाही. अशा प्रकारे ते बेडूकच्या अपरिवर्तित पेशीपासून अनुवांशिकरित्या तयार केलेले जीव आहेत.
हे किती रोबोट आहेत
या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि व्हरमाँट विद्यापीठातील संगणक विज्ञानाचे प्राध्यापक आणि रोबोटिक्स तज्ञ जोश बोंगार्ड म्हणतात की बहुतेक लोकांना असे वाटते की रोबोट धातू किंवा सिरॅमिकचे बनलेले आहेत. पण यंत्रमानव केवळ त्यांच्यापासून बनलेले नाहीत. ते कशापासून बनले हे ते कायकाय करू शकतात यावर अवलंबून आहे. या अर्थाने ते रोबोट आहेत.
ते स्वतःची प्रतिकृती कशी तयार करतात?
झेनोबॉट्स सुरुवातीला गोलाकार होते आणि ते सुमारे तीन हजार पेशींनी बनलेले होते. बोंगार्ड म्हणतात की त्यांच्या टीमने शोधून काढले की झेनोबॉट्स स्वतःची प्रतिकृती बनवू शकतात. परंतु पूर्वी हे केवळ अधूनमधून आणि विशेष परिस्थितीत होऊ शकत होते. झेनोबॉट्स गतिज प्रतिकृतीची प्रक्रिया वापरतात जी आण्विक स्तरावर होते. मात्र, हे संपूर्ण पेशी किंवा जीवांच्या स्तरावर कधीही पाहिलं गेलेलं नाही.
वैज्ञानिक चमत्कार.. जन्माला येतंय असं शहर जिथे सगळी कामं करणार रोबोट
पीअर रिव्ह्यूसाठी PANS या जर्नलमध्ये या आठवड्यात प्रकाशित झालेल्या अभ्यासात संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अब्जावधी शरीराच्या आकारांची चाचणी करताना दाखवले आहे जे झेनोबॉट्सची प्रतिकृती तयार करण्यासाठी योग्य असतील. एआयने असा आकार प्रोग्राम केला नाही. उलट त्याने सी अक्षरासारखा दिसणारा जो पूर्वीच्या पॅकमॅनसारखा आकार दिला, ज्यामुळे अशा प्रकारचे प्रजनन करू शकेल. सध्या हे तंत्रज्ञान आपल्या क्षेत्रातील नवजात तंत्रज्ञान मानले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Robot, Science, Technology