मुंबई, 3 डिसेंबर : ऑनलाईन मोबाइल (Online Mobile Shopping) खरेदी करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. ऑनलाईन मोबाइल खरेदीवर कोणती शॉपिंग वेबसाइट जास्तीत जास्त ऑफर्स देते याकडे या व्यक्तींचं बरोबर लक्ष असतं. सध्या तरी ऑनलाईन मोबाईल खरेदीसाठी फ्लिपकार्टला (Flipkart) सर्वांत जास्त पसंती मिळत आहे. फ्लिपकार्टवर असलेल्या भरपूर ऑफर्स हे यामागचं मुख्य कारण आहे. आताही Oppo A12 स्मार्टफोन फक्त 15 रुपयांत मिळणार, अशी ऑफर फ्लिपकार्टवर आहे. साहजिकच याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. याबद्दलचं वृत्त 'झी न्यूज'नं दिलं आहे.
Oppo A12 स्मार्टफोनसाठी फ्लिपकार्टवर एक धमाकेदार एक्स्चेंज ऑफर (Exchange Offer) देण्यात आली आहे. तुमचा जुना Oppo स्मार्टफोन देऊन तुम्ही हा नवीन Oppo A12 स्मार्टफोन खरेदी करणार असाल, तर तुमचे 10,900 रुपये वाचू शकतील. तुमच्या या स्मार्टफोनची पूर्ण किंमत तुम्हाला मिळाली, तर तुम्ही नवा Oppo A12 स्मार्टफोन फक्त 15 रुपयांत खरेदी करू शकाल.
हेही वाचा : जगातला सर्वांत स्वस्त 5G iPhone 'या' महिन्यात होणार लाँच
Oppo A12 स्मार्टफोन या नव्या फोनमध्ये 64GB इंटर्नल स्टोरेज आहे. या फोनची मार्केटमधली किंमत 11,900 रुपये इतकी आहे; पण फ्लिपकार्टवरून तुम्ही हा नवा धमाकेदार फोन घेतलात तर तुम्हाला 4 टक्क्यांची सूट मिळू शकते. म्हणजेच हा फोन फ्लिपकार्टवर तुम्हाला 11,490 रुपयांना मिळेल. शिवाय तुम्ही जर फोनचं पेमेंट (Online Payment) फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून केलंत तर तुम्हाला आणखी 5% म्हणजे 575 रुपये कॅशबॅक (Cashback) मिळेल. याचाच अर्थ हा नवाकोरा स्मार्टफोन तुम्हाला फक्त 10,915 रुपयांनाच मिळेल.
Oppo A12 हा नवा 4G स्मार्टफोन एका डायमंड ब्लेज डिझायनमध्ये आहे. याचा डिसप्ले अगदी बारीक आणि हलका आहे. या फोनमध्ये 6.22 इंचाचा HD+TFT LCD डिस्प्ले आहे. मीडियाटेक हेलिओ P35 चिपसेटवर हा फोन काम करतो. या फोनमध्ये 4GB RAM आणि 64GB इंटर्नल स्टोरेज आहे. यामध्ये 4230mAh ची बॅटरी आहे. यामध्ये ड्युएल कॅमेरा सेटअपही आहे. त्यात मेन सेन्सर 13MP चा आणि दुसरा सेन्सर 2MP चा आहे. तुम्हाला सेल्फी काढायला किंवा व्हिडिओ तयार करायला आवडत असेल तर मग हा फोन तुमच्यासाठी खास आहे. कारण यामध्ये 5MP चा फ्रंट कॅमेराही आहे. या ड्युएल सिमकार्डच्या स्मार्टफोनसाठी एक वर्षाची ब्रँड वॉरंटीही आहे.
तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टला एकदा अवश्य भेट द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone