मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer : Omicron मुळे Booster dose घ्यायचा झाला तर तो कोणत्या Corona vaccine चा घ्यावा?

Explainer : Omicron मुळे Booster dose घ्यायचा झाला तर तो कोणत्या Corona vaccine चा घ्यावा?

Corona vaccine booster dose : कोरोना लशीचे दोन डोस घेतल्यानंतर बुस्टर डोस कोणत्या लशीचा घ्यावा.

Corona vaccine booster dose : कोरोना लशीचे दोन डोस घेतल्यानंतर बुस्टर डोस कोणत्या लशीचा घ्यावा.

Corona vaccine booster dose : कोरोना लशीचे दोन डोस घेतल्यानंतर बुस्टर डोस कोणत्या लशीचा घ्यावा.

  मुंबई, 04 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण अवघ्या काही दिवसांत भारतासह अनेक देशांमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वच देशांनी या विषाणूचा संसर्ग (Corona new Variant)  रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. वेळीच योग्य दक्षता घेतली नाही, तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटविषयी अद्याप फारशी माहिती उपलब्ध नाही (Omicron and corona vaccine) . त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या लशी त्यावर किती प्रभावी ठरू शकतात, हेदेखील निश्चितपणे स्पष्ट झालेलं नाही. परंतु ओमिक्रॉनचा वाढता धोका पाहता सर्वच देशांनी लसीकरणावर (Corona Vaccination) भर दिला आहे. काही देशांनी नागरिकांना बुस्टर डोस (Corona vaccine Booster Dose) देण्यास सुरुवात केली आहे. भारतातही त्याबाबत विचार केला जातो आहे. पण जर बुस्टर डोस घ्यायचा झाला तर तो कोणत्या लशीचा घ्यावा असा प्रश्न पडतोच.

  ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, इस्रायलसह जगातल्या 30हून अधिक देशांनी बूस्टर डोस देणं सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधक लशीच्या बूस्टर डोसबाबत भारत सरकार लवकरच एका धोरणाची (Policy) घोषणा करण्याची शक्यता आहे. सरकार प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण करण्यावर भर देणार असल्याचं काही दिवसांपूर्वी नॅशनल टास्क फोर्सच्या एका सदस्यानं सांगितलं होतं. यासाठी स्थापन केलेला राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट (NTAGI) बूस्टर डोसशी संबंधित धोरणाला अंतिम स्वरूप देईल. येत्या काही दिवसांत याबाबत सविस्तर धोरण घोषित होईल. सध्या या धोरणावर काम सुरू आहे; मात्र 31 डिसेंबरपर्यंत सर्व प्रौढ लाभार्थ्यांना लशीचा किमान एक डोस देण्यावर सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे, असं या सदस्यानं सांगितलं.

  बुस्टर डोसची गरज आहे का?

  देशात बूस्टर डोसची चर्चा सुरू असताना, सध्या बूस्टर डोसची गरज नसल्याचं लॅन्सेट या मेडिकल जर्नलमध्ये (Lancet) ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात म्हटलं आहे. परंतु, कोरोनाचा आणखी नवा धोकादायक स्ट्रेन आल्यास अतिरिक्त डोसची गरज पडू शकते, असंदेखील तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बूस्टर डोसविषयी काहीसं संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

  हे वाचा - काय! कोरोनाचा भयंकर Omicron Variant उंदरांमधून आला आहे?

  याबाबत गेल्या आठवड्यात दिल्ली येथील एम्समधील प्राध्यापक एम. व्ही. पद्मा श्रीवास्तव यांनी `एएनआय`शी बोलताना सांगितलं, की एका विशिष्ट वर्गात इम्युनिटी (Immunity) कमी आहे. लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही त्यांच्यात पुरेशा अँटीबॉडीज तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांना बूस्टर डोसची गरज असल्याचं परदेशातल्या संशोधनाचा संदर्भ देऊन त्यांनी सांगितलं.

  आयसीएमआरचे (ICMR) साथरोगविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी सांगितलं, की बूस्टर म्हणजेच तिसरा डोस देताना लशीच्या दोन डोसचं अभियान विस्कळीत होता कामा नये. ज्यांच्यामध्ये पुरेशी इम्युनिटी तयार होत नाही किंवा जे इम्युनोसप्रेस्ड आहेत, त्यांच्या अनुषंगाने तिसऱ्या डोसची चर्चा होऊ शकते.

  कोव्हॅक्सिनचे संशोधक डॉ. संजय राय यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकाला बूस्टर डोस देण्याची गरज नाही. विशेष करून ज्या व्यक्ती एकदा कोरोनाबाधित झाल्या आहेत, त्यांच्या शरीरात विषाणूविरोधात लढण्याचं तंत्र विकसित झालं आहे. त्यामुळे अशांना बूस्टर डोसची गरज पडण्याची शक्यता नाही.

  बूस्टर डोसकरिता यापूर्वी डोस घेतलेल्या आणि दोन डोसमधलं अंतर कमी असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देणं आवश्यक आहे. कारण त्यांच्या शरीरामधला अँटीबॉडी स्तर कमी झालेला असेल. त्यामुळे त्यांना बूस्टर डोस देणं गरजेचं आहे. यात प्रामुख्यानं आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक आणि को-मॉर्बिडीटी असलेल्यांचा समावेश आहे.

  बुस्टर डोस कोणत्या कोरोना लशीचा घ्यावा?

  भारतात सध्या कोविशिल्ड (Covishield), कोव्हॅक्सिन (Covaxin) किंवा स्पुतनिक V  (Sputnik) या कोरोना लशी दिल्या जात आहेत. ज्या लशीचा पहिला डोस घेतला आहे, त्याच लशीचा दुसरा डोस दिला जातो आहे. अशात तिसरा किंवा बुस्टर डोस घ्यायचा तर तो कोणत्या लशीचा का लशीचे दोन्ही डोस घेतले असतील तर बूस्टर डोस अन्य दुसऱ्या कंपनीच्या लशीचा घेऊ शकतो का, असा प्रश्न प्राधान्यानं विचारला जात आहे.

  हे वाचा - Omicron चा धोका खरंच किती मोठा? भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे का?

  कोणत्याही देशात बूस्टर डोससाठी लशींचा पुरेसा साठा असणं महत्त्वाचं आहे. भारतातही हे कारण महत्त्वाचं आहे. कारण सध्या सर्व पात्र प्रौढ व्यक्तींसाठी लसीकरण अभियान (Vaccination Campaign) राबवलं जात आहे. बूस्टर डोस देण्याच्या प्रयत्नात या अभियानावर परिणाम होणार नाही, याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. परंतु, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute Of India) या देशातल्या प्रमुख लसनिर्मात्या कंपनीने सरकारकडे बूस्टर डोससाठी परवानगी मागितली आहे.

  सिरमने औषध नियमकांकडे कोविशिल्डच्या बूस्टर डोसला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. `देशात पुरेशा प्रमाणात लशींचा साठा उपलब्ध आहे. नवा विषाणू पाहता बूस्टर डोस देणं गरजेचं आहे,` असं कंपनीनं म्हटलं आहे. भारतीय औषध महानियंत्रकांकडे (DCGI) पाठवलेल्या अर्जात सिरम इंडियाचे नियामक व्यवहार संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी ब्रिटनमध्ये बूस्टर डोसला परवानगी मिळाल्याचा हवाला देऊन भारतातही मंजुरीसाठी मागणी केली आहे.

  स्पतुनिक लाइट या सिंगल डोस लशीबाबत उत्पादकांनी असा दावा केला आहे, की ती लस एक चांगला बूस्टर डोस ठरू शकतो. दुसरीकडे, भारत बायोटेक नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लशीवर काम करत आहे. भारत बायोटेकची नाकाद्वारे दिली जाणारी लस बूस्टर डोससाठी चांगला पर्याय ठरू शकते. परंतु, सरकार याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत नागरिकांना याबाबत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  हे वाचा - Explainer: कसा लागला ओमिक्रॉनचा शोध? विषाणूचे नवीन प्रकार शोधण्याची पद्धत कोणती?

  ज्यांनी कोव्हॅक्सिन लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत ते कोविशिल्डचा किंवा ज्यांनी कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतले आहेत ते कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस घेऊ शकतात का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. टीव्ही 9 च्या रिपोर्टनुसार याबाबत दिल्लीतल्या एम्सचे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांनी एक सल्ला दिला आहे. जेव्हा कधी तुम्ही बूस्टर डोस घ्याल, तेव्हा तो वेगळ्या कंपनीच्या लशीचा घ्यावा. समजा तुम्ही कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतले असतील, तर तुम्ही कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस घेऊ शकता. तसंच कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले असतील, तर तुम्ही कोविशिल्डचा बूस्टर डोस घेऊ शकता, असं त्यांनी सांगितलं.

  First published:
  top videos

   Tags: Corona vaccine, Coronavirus, Explainer, Sanjeevani