EXPLAINER: तालिबानला कडवा प्रतिकार कसे करत आहेत हे पंजशीरचे वीर?

EXPLAINER: तालिबानला कडवा प्रतिकार कसे करत आहेत हे पंजशीरचे वीर?

अद्याप पंजशीर प्रांतावर (Panjshir) मात्र तालिबानला ताबा मिळवता आलेला नाही. अहमद मसूद (Ahmad Massoud) यांच्या नेतृत्वाखाली नॉर्दर्न अलायन्सने (Northern Alliance) कडवी झुंज कायम ठेवली आहे.

  • Share this:

काबुल, 24 ऑगस्ट अमेरिकेने (US in Afghanistan) सैन्य मागे घेतल्यावर तालिबानने (Taliban) संधी साधून अफगाणिस्तानवर (Afghanistan crisis) कब्जा केला. तालिबानला फारसा विरोध न होता बहुतांश प्रांतांत यश मिळालं. असं असलं तरी अद्याप पंजशीर प्रांतावर (Panjshir) मात्र तालिबानला ताबा मिळवता आलेला नाही. अहमद मसूद (Ahmad Massoud) यांच्या नेतृत्वाखाली नॉर्दर्न अलायन्सने (Northern Alliance) तालिबानविरोधात आव्हान उभं केलं असून, त्यांना पंजशीर प्रांतात पाऊलही टाकू देणार नाही, अशी घोषणा केली आहे. तालिबानला प्रतिकार करण्यासाठी आपली शक्ती पुरेशी नाही, याची मसूद यांना पूर्ण कल्पना असूनही त्यांनी तालिबानविरोधात उभं ठाकण्याचं धाडस केलं आहे. त्यांनी जगभरातल्या देशांना मदतीसाठी साद घातली आहे. त्या सादेला प्रतिसाद कसा मिळतो, यावर पंजशीर प्रांतातल्या या 'शेरां'च्या आव्हानाचं भवितव्य अवलंबून आहे. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

अहमद मसूदने तालिबानला आव्हान दिलं आहे; मात्र तालिबानी दहशतवादी आता पंजशीरच्या अगदी जवळ येऊन पोहोचले आहेत. मसूदने एका मुलाखतीत सांगितलं, 'आमच्या मुजाहिदीन (Mujahidin) संघटनेचे सैनिक तालिबानशी पुन्हा एकदा लढण्यासाठी तयार आहेत. आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर हत्यारं आणि दारूगोळा आहे. मी आवाहन केल्यानंतर अनेक नागरिकांनी मला साथ देऊ केली आहे. तालिबानला अजिबातच प्रतिकार न करण्याच्या भूमिकेवर नाराज असलेले अफगाणिस्तानच्या सैन्यातले अनेक जवानही माझ्या बाजूने आहेत.'

अफगाणिस्तानातील 'तालिबान राज'नंतर भारतातही दहशतवाद फोफावणार, काय होणार परिणाम?

पंजशीरमध्ये तालिबानविरोधात 10 हजारांहून अधिक अफगाण सैनिक जमा झाले आहेत. अफगाणिस्तानचे वॉर लॉर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनरल अब्दुल रशीद दोस्तम यांच्या फौजेचाही यात समावेश आहे. त्याशिवाय अता मोहम्मद नूर (Ata Mohammad Noor) यांचाही मसूदला पाठिंबा आहे. शिवाय काबूलवर तालिबानने कब्जा केला, तेव्हा सहा हजारांहून अधिक अफगाणी सैनिक, हवाई दलातले सैनिक आणि फायटर जेट्स ताजिकिस्तानमध्ये नेण्यात आले होते, असं सांगितलं जात आहे. त्यांचा वापर अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह तालिबानविरोधात करू शकतात, असा अंदाज आहे. कारण सालेह यांनीही तालिबानपुढे न झुकण्याची भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तान म्हणजे व्हिएतनाम नाही, हे आपल्या सिद्ध करावं लागेल, असं त्यांनी अफगाणिस्तानवासीयांना सांगितलं आहे. आपण अजूनही आशा सोडलेली नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Explainer: तालिबानकडे युद्धासाठी एवढा पैसा येतो कुठून? कोण पुरवतंय रसद?

एवढं सगळं असलं, तरी आपली ताकद पुरेशी नाही, याची मसूद यांना कल्पना आहे. त्यामुळेच त्यांनी जगभरातल्या वेगवेगळ्या देशांना मदतीचं आवाहन केलं आहे. अहमद मसूद यांचे वडील अहमदशाह मसूद यांनी 1996मध्ये तालिबानी राजवटीविरोधात नॉर्दर्न अलायन्स उभी केली होती, तेव्हा भारत, रशिया, इराणसारख्या बलाढ्य देशांचा पाठिंबा मिळाला होता. तसाच पाठिंबा आत्ताही मिळावा, यासाठी अहमद मसूद यांनी आवाहन केलं आहे, जेणेकरून अफगाणिस्तानला तालिबान्यांच्या कचाट्यातून वाचवता येईल. '20 वर्षांपूर्वी सोव्हिएत संघ (Soviet Union) आणि नंतर तालिबानच्या विरोधात लढताना आम्हाला मदत केली होतीत, तशी मदत आम्हाला पुन्हा एकदा करू शकाल का? काही जणांनी केलेल्या विश्वासघातानंतरही आमचा अजून तुमच्यावर विश्वास आहे,' असं आवाहन अहमद मसूदने फ्रान्स, युरोप, अमेरिका आणि अरब देशांना केलं आहे.

प्रत्यक्षात मात्र या वेळी तसं होणं कठीण दिसत आहे. आता तालिबानी पंजशीरच्या अगदी जवळ आले असून, त्यांनी अहमद मसूदला शरण येण्यास सांगितलं आहे. तो शरण आला नाही तर परिणाम भोगण्याची तयारी त्याने ठेवावी अशी धमकीही त्यांनी दिली आहे.

इराण (Iran) सुरुवातीपासूनच अमेरिकेविरोधात लढण्यासाठी तालिबानला शस्त्रास्त्रांची मदत करत आला आहे. आता तालिबानचंच राज्य येत असेल, तर इराण त्यांनाच पाठिंबा देणार हे उघड आहे. दुसरीकडे इराण आणि चीन यांचे परस्परसंबंधही चांगले आहेत.

Explainer : भारत आणि अफगाणिस्तानातल्या मुस्लिमांमध्ये काय आहे फरक?

भारताने अद्याप या प्रकरणी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. भारत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, येत्या काही दिवसांत तिथे कशी परिस्थिती निर्माण होते, त्यावर भूमिका स्पष्ट केली जाईल, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नॉर्दर्न अलायन्सला भारताची साथ मिळण्याची शक्यताही कमीच आहे.

रशियाच्या राजदूतांनी तर भूमिका स्पष्टच केली असून, तालिबानला पर्याय नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. देश तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर अधिक चांगल्या प्रकारची सुरक्षितता तिथे आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. एकंदरीत परिस्थिती मसूदसाठी प्रतिकूलच आहे.

First published: August 24, 2021, 8:00 AM IST

ताज्या बातम्या