मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer: शेअर बाजाराला पुन्हा हर्षद मेहता काळाची आठवण; सध्याची तेजी बुडबुडा तर नाही?

Explainer: शेअर बाजाराला पुन्हा हर्षद मेहता काळाची आठवण; सध्याची तेजी बुडबुडा तर नाही?

शेअर बाजारातली सध्याची तेजी पाहता 1992 सालची आठवण अनेकांना येते आहे. हर्षद मेहताने जो घोटाळा त्या वेळी केला तसाच तर आत्ता शिजत नाहीये ना? शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर आवर्जून वाचा ही माहिती

शेअर बाजारातली सध्याची तेजी पाहता 1992 सालची आठवण अनेकांना येते आहे. हर्षद मेहताने जो घोटाळा त्या वेळी केला तसाच तर आत्ता शिजत नाहीये ना? शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर आवर्जून वाचा ही माहिती

शेअर बाजारातली सध्याची तेजी पाहता 1992 सालची आठवण अनेकांना येते आहे. हर्षद मेहताने जो घोटाळा त्या वेळी केला तसाच तर आत्ता शिजत नाहीये ना? शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर आवर्जून वाचा ही माहिती

  मुंबई, 10 जून: 1992 या वर्षात भारतीय इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. मात्र, हे वर्ष अजून एका कारणामुळे ओळखलं जातं, ते म्हणजे शेअर मार्केट. 1992मध्ये शेयर मार्केटच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला होता. हर्षद मेहताने भारतीय शेयर बाजारात जवळपास 500 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. आता तुम्ही विचार करत असाल की, 1992च्या या घोटाळ्याची आम्ही आता चर्चा का करत आहोत. तर याचं कारण म्हणजे 2021 या वर्षातील शेअर मार्केट त्याच वर्षाची पुनरावृत्ती करत आहे. चला जाणून घेऊयात ते कसं?

  शेयर मार्केट ऑल टाइम हाय -

  शेअर मार्केटमध्ये सध्या जोरदार तेजी आहे. यावर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत कंसॉलिडेशननंतर शेअर मार्केटमध्ये वाढ होत आहे. इंडेक्समध्ये मोठी भागीदारी असलेल्या रिलायन्सच्या शेअरमध्येही वाढ झाली असून निफ्टी पुन्हा एकदा नवनवे उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे झालेल्या नुकसानीची भीती मागे पडली आहे.

  Gold: सोन्यामध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची, हे 4 पर्याय मिळवून देतील नफा

  तज्ज्ञांच्या मते, "हा या शतकातील शेअर मार्केटमधील तेजीचा एक मोठा काळ" असू शकतो.

  बुडबुडा फुटण्याची शंका -

  मार्केटमध्ये फुगवटा निर्माण होण्याचा देण्यात आला असूनही शेयर्समध्ये तेजी सुरू आहे. कारण मार्केट चुकीच्या प्रत्येक गोष्टी स्वीकारण्यास नकार देत असून ज्या योग्य आहेत त्यावरचं फोकस करत आहे. मार्केटमध्ये लिक्विडिटी जास्त असल्याने सर्वच सेक्टर्समध्ये जोरदार खरेदी होत आहे.

  Explained :झटपट श्रीमंत बनवणारी क्रिप्टोकरन्सी वादग्रस्त का?भारतात काय आहे नियम

  टेक्नोलॉजी, फायनेन्शियल आणि कंज्यूमर सेक्टर्सनंतर आता केमिकल्स, इंफ्रास्ट्रक्चर आणि हाउसिंग फायनान्स कंपन्यांच्या शेयर्समध्ये वाढ नोंदवली जात आहे. मात्र, RBIला हा फुगवटा फुटेल, असं आरबीआयला वाटतंय.  .

  घसरण आणि रिटर्न झपाट्याने -

  शेअर मार्केटमध्ये घसरण होईल, मात्र ते जास्त काळ होण्याची शक्यता नाही. पुढील काही महिन्यांत अनेक छोटे व मिडल-कॅप शेअर्स तसेच काही लार्ज कॅप शेअर्सच्या किंमती दुप्पट होण्याची शक्यता आहे. आपण गुणवत्तेकडे जास्त लक्ष न दिल्यास रिटर्नदेखील चांगले होऊ शकते.

  मोठ्या तेजीची सुरुवात -

  आता सुरू असलेली तेज आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. निफ्टीसाठी आमचे सुरुवातीचे टार्गेट 20,000 पॉइंट वर कायम आहे. मार्केटमध्ये तेजी आल्यामुळे टार्गेट वाढू शकतं. जगभरातील मार्केट्समध्ये अशीच परिस्थिती आहे.

  या कंपनीच्या शेअर्सनी दिले आठवड्याभरात 100 टक्के रिटर्न्स; फक्त 50 रुपये किंमत

  अमेरिकेत लिस्टेड AMC एंटरटेनमेंट आणि गेमस्टॉपचे शेअर्स गेल्या सहा महिन्यात अनेक टक्क्यांनी वाढले आहेत. भारतीय शेअर मार्केटमध्येही असे काही उदाहरण असून पीएनबी हाउसिंग त्यापैकी एक आहे.

  हर्षद मेहता आणि मार्केटमधील तेजी -

  1992मध्ये हर्षद मेहताच्या काळात मार्केटमधील तेजी अशीच होती. 1992 च्या सुरुवातीला मार्केटमध्ये प्रचंड घसरण झाली मात्र, पुन्हा झपाट्याने रिकव्हरी केली होती. 1992मध्ये मार्च महिन्यात मार्केटमध्ये तेजी सुरू झाली होती आणि त्यामुळे अनेक शेअर्सच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या.

  First published:
  top videos

   Tags: Rbi, Share market, Stock Markets