मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explained : झटपट श्रीमंत बनवणारी क्रिप्टोकरन्सी का आहे वादग्रस्त; भारतात काय आहेत नियम

Explained : झटपट श्रीमंत बनवणारी क्रिप्टोकरन्सी का आहे वादग्रस्त; भारतात काय आहेत नियम

झटपट श्रीमंत बनवणाऱ्या जगभरात क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) म्हणजेच व्हर्च्युअल चलनाबाबत (Virtual Currency) आणि क्रिप्टो मार्केट्सबद्दल भारतासह जगभरात चर्चा आहे.

झटपट श्रीमंत बनवणाऱ्या जगभरात क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) म्हणजेच व्हर्च्युअल चलनाबाबत (Virtual Currency) आणि क्रिप्टो मार्केट्सबद्दल भारतासह जगभरात चर्चा आहे.

झटपट श्रीमंत बनवणाऱ्या जगभरात क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) म्हणजेच व्हर्च्युअल चलनाबाबत (Virtual Currency) आणि क्रिप्टो मार्केट्सबद्दल भारतासह जगभरात चर्चा आहे.

नवी दिल्ली, 9 जून : गेल्या काही वर्षांपासून अगदी झटपट श्रीमंत बनवणाऱ्या जगभरात क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) म्हणजेच व्हर्च्युअल चलनाबाबत (Virtual Currency) आणि क्रिप्टो मार्केट्सबद्दल भारतासह जगभरात चर्चा आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क (Elon Musk) यांच्यासह अनेक दिग्गजांना क्रिप्टो मार्केटमध्ये रस आहे, तर काही दिग्गज या आभासी चलनापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. जाणून घ्या या आभासी चलनाबाबत...

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

क्रिप्टोकरन्सी हा एक डिजिटल अॅसेट (Digital Asset) आहे, जो वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी वापरला जातो. या चलनात क्रिप्टोग्राफी वापरली जाते. आपण ते प्रॉपर्टी म्हणून वापरू शकतो, परंतु यासाठी बँक, एटीएम असं काही नसतं. जगातील बऱ्याच देशांमध्ये क्रिप्टोकरन्सी ऑनलाईन शॉपिंगमध्ये वापरली जाते. प्रत्येक देशाचं स्वतःचं असं एक चलन असतं. जसं भारताचं चलन रुपया आहे. सौदी अरेबियाचं रियाल आणि अमेरिकेचं डॉलर हे चलन आहे. इतर देशांकडेही त्यांचं स्वतःचं चलन आहे. तसंच क्रिप्टोकरन्सी हे आभासी चलन आहे. ते नोटा किंवा नाणी स्वरुपात छापता येत नाही, तरीही त्याला मूल्य आहे.

क्रिप्टोकरन्सी कधी सुरू झाली?

क्रिप्टोकरन्सीची सुरुवात 2009 मध्ये झाली. बिटकॉइन (Bitcoin) ही जगातील सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी असून तिच्यामुळेच क्रिप्टोकरन्सी जगाला माहित झाली. जपानमधील सतोशी नाकामोटो नावाच्या इंजिनीअरने बिटकॉइनची निर्मिती केली. जगभरात 1000 हून अधिक क्रिप्टोकरन्सीज आहेत.

क्रिप्टोकरन्सी कसं काम करते?

क्रिप्टोकरन्सीची उलाढाल ब्लॉक चेन तंत्रज्ञानाद्वारे (Block chain Technology) चालते. या तंत्रज्ञानाच्या आधारे यातील व्यवहारांची नोंद ठेवली जाते. क्रिप्टोकरन्सीचं मायनिंगही (Mining) याच ब्लॉक चेन तंत्रज्ञानाद्वारे होते. हे व्यवहार करणाऱ्यांना मायनर्स म्हणतात. अत्यंत अत्याधुनिक संगणक यावर देखरेख ठेवतात. त्यामुळे ही करन्सी हॅक करणं कठीण असतं. ब्लॉक चेनमुळे, क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार अत्यंत विश्वासार्ह असतात. त्यावर बँक किंवा कोणतीही वित्तीय संस्था अशा तिसऱ्या घटकाच्या देखरेखीची आवश्यकता नसते. क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग म्हणजे त्याची खरेदी-विक्री क्रिप्टो एक्स्चेंजवर (Crypto Exchange) होते. बिनान्स, कॉईनबेस, वजीरएक्स, कॉईनवन, क्रिप्टो डॉट कॉम असे अनेक क्रिप्टो एक्स्चेंज आहेत.

ब्लॉक चेन म्हणजे काय आणि ते कसं काम करतं?

क्रिप्टोकरन्सीची उलाढाल ब्लॉक चेन तंत्रज्ञानाद्वारे चालते. या तंत्रज्ञानाच्या आधारे यातील व्यवहारांची नोंद ठेवली जाते. त्याची मालकी आणि सुरक्षा मायनर्सची असते. यासाठी ते एक क्रिप्टोग्राफिक कोडं सोडवतात, त्यासाठी एक कोड शोधला जातो. जेव्हा एखादा मायनर ब्लॉक सुरक्षित असल्याचं सांगतो तेव्हा ते ब्लॉक चेनमध्ये जोडलं जातं. त्यानंतर ते नेटवर्कमधील इतर नोड्सद्वारे व्हेरीफाय केलं जातं. या प्रक्रियेस कॉन्सेन्शस म्हणतात. यात ब्लॉक सुरक्षित असल्याचं निश्चित केलं जातं आणि ते योग्य असल्याचं नक्की झाल्यावर मायनरला क्रिप्टो कॉईन दिली जातात.

(वाचा - APY Scheme: दररोज 7 रुपयांच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला होईल 5 हजारांची सेव्हिंग)

या आहेत काही प्रमुख क्रिप्टोकरन्सीज -

बिटकॉईन-बीटीसी ( Bitcoin-BTC)

इथरियम-ईटीएच (Ethereum-ETH)

रिपल –एक्सआरपी (Ripple- XRP)

मोनेरो-एक्सएमआर (Monero- XMR)

कॉसमॉस- एटीओएम (Cosmos- ATOM)

बिनान्स कॉईन-बीएनबी (Binance Coin-BNB)

पोल्काडॉट-डॉट (Polkadot-DOT)

युनिस्वॅप युएनआय (Uniswap-UNI)

कार्डानो-एडीए (Cardano-ADA)

टिथर-यूएसडीटी (Tether-USDT)

लिटेकोइन- एलटीसी (Litecoin- LTC)

डोगेकोइन (Dogecoin)

(वाचा - EPFO: Provident Fund खातेधारकांना मिळतात हे 5 मोठे फायदे, पाहा कसा होईल फायदा)

भारतातील क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ -

भारतात (India) 80 लाख लोक क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहेत. गुंतवणूकीचं एकूण मूल्य सुमारे 100 अब्ज रुपये असू शकतं. या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये 20 हजार नवीन गुंतवणूकदार सामील झाले आहेत. 2020 मध्ये क्रिप्टो मार्केटमध्ये एकूण 173 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. कॉन्सविच, कॉइनएफसीएक्स, वजीरएक्स ही भारतातील लोकप्रिय क्रिप्टो एक्सचेंज आहेत. याद्वारे बिटकॉइनसह अनेक मुख्य चलनात व्यवसाय केला जातो.

क्रिप्टोकरन्सीचे फायदे -

- क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल चलन आहे. यामध्ये फसवणूकीला पूर्णपणे जागा नाही. म्हणजेच, ते हॅक करणं अशक्य आहे.

- यात परतावा खूप चांगला मिळत असल्याने गुंतवणूकीसाठी हे चांगलं आहे. यासाठी बँकेची गरज नाही.

- क्रिप्टोमध्ये खरेदी, विक्री आणि गुंतवणूक करणं खूप सोपं आहे. याचे अनेक क्रिप्टोकरन्सी वॉलेट्स आहेत.

- जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कोणत्याही कोपऱ्यात याचं हस्तांतरण करता येतं. क्रिप्टोकरन्सी वॉलेट्मधून बँक खात्यात रक्कम येण्याकरता फक्त दहा मिनिटं लागतात.

क्रिप्टोकरन्सीचे तोटे -

- क्रिप्टोकरन्सीजचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. सर्वांत मोठं नुकसान म्हणजे त्यासाठी कोणतेही नियम नाहीत. क्रिप्टोकरन्सी कोणत्याही राज्य किंवा सरकारद्वारे यावर नियंत्रण नसतं. त्याची किंमत कधीकधी खूप वाढते आणि कधीकधी खूप कमी होते, अशा परिस्थितीत त्यात गुंतवणूक करणं धोकादायक असतं.

- क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार एक कोड आणि पासवर्डद्वारे केले जातात. ते विसरल्यास, त्यात गुंतविलेली संपूर्ण रक्कम बुडते. रक्कम वसूल केली जाऊ शकत नाही.

- याचा उपयोग बेकायदेशीरपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे हस्तांतरित करण्यासाठी केला जाऊ शकतो. या कारणामुळेच अनेक देशांमध्ये क्रिप्टोवर बंदी आहे.

(वाचा - महिन्याला 4500 रुपये गुंतवणूक करुन मिळवता येतील 1 कोटी, वाचा या योजनेबाबत)

भारतातील क्रिप्टोसंबंधी कायदा -

भारतातील लोक बऱ्याच वर्षांपासून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहेत. याबाबत कोणताही नियम नाही. भारत सरकारने संसदेत क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी विधेयक मांडणार असल्याची बातमी अलीकडेच आली होती. हे विधेयक भारतात क्रिप्टोकरन्सीच्या वापरावर कायदेशीर नियंत्रण ठेवेल. परंतु अद्याप याबद्दल स्पष्टपणे कोणतीही माहिती नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे, की क्रिप्टोकरन्सींवर पूर्णपणे बंदी घालण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. सरकार क्रिप्टोकरन्सीचा आधार असलेल्या ब्लॉक चेन तंत्रज्ञानाला संरक्षण देऊ इच्छिते.

केंद्र सरकार स्वतःचं चलन आणणार का?

गेल्या महिन्यात, भारतीय रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं, की ते भारताचं स्वतःचं डिजिटल चलन आणि त्याच्या विनिमयासाठी कायदे बनविण्याचा विचार करेल. मात्र तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की डिजिटल लीगल टेंडर जारी करणं आव्हानात्मक आहे.

रिझर्व्ह बँकेची भूमिका काय आहे?

भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना दिलेल्या सूचनांनंतर 2018 मध्ये भारतात क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक जवळपास ठप्प झाली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आणि मार्च 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बॅंकेचं परिपत्रक रद्द केलं, यामुळे गुंतवणूकदारांना क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग पुन्हा खुला झाला. त्यावेळी न्यायालयाने सरकारला यासाठी कायदा करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे आता तरी भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणं कायदेशीर आहे. काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रिझर्व्ह बँकेला क्रिप्टोमध्ये विशेष रस नसल्याचं म्हटलं होतं.

First published:

Tags: Money, Rbi