Home /News /explainer /

Explainer : उत्तर कोरियाचा नवा पराक्रम; अर्थव्यवस्था कोसळत असताना अण्वस्त्रांसाठी हॅकर्सद्वारे चोरी

Explainer : उत्तर कोरियाचा नवा पराक्रम; अर्थव्यवस्था कोसळत असताना अण्वस्त्रांसाठी हॅकर्सद्वारे चोरी

उत्तर कोरिया हा छोटासा देश असूनही त्यांची लष्करी ताकद इतर विकसनशील देशांपेक्षा जास्त आहे. नुकतेच त्यांनी बॅलिस्टिक मिसाइल लॉंच केले. जगातील सर्वात शक्तिशाली मिसाइल म्हणून बॅलिस्टिक ओळखले जाते. या देशात एक-दोन नव्हे तर चार मिसाइल आहे. यादरम्यान, ही चर्चा देखील सुरू आहे की, सर्वात शक्तिशाली देश, उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर कदाचित अमेरिकेला किम जोंग उन यांच्याशी लढा देणं कठिण आहे. (news18 English)

उत्तर कोरिया हा छोटासा देश असूनही त्यांची लष्करी ताकद इतर विकसनशील देशांपेक्षा जास्त आहे. नुकतेच त्यांनी बॅलिस्टिक मिसाइल लॉंच केले. जगातील सर्वात शक्तिशाली मिसाइल म्हणून बॅलिस्टिक ओळखले जाते. या देशात एक-दोन नव्हे तर चार मिसाइल आहे. यादरम्यान, ही चर्चा देखील सुरू आहे की, सर्वात शक्तिशाली देश, उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर कदाचित अमेरिकेला किम जोंग उन यांच्याशी लढा देणं कठिण आहे. (news18 English)

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उनकडून विध्वंसक क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जात आहे

    न्यूयॉर्क, 10 फेब्रुवारी : उत्तर कोरिया (North Korea) हे अनेक गोष्टींसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कुख्यात असलेलं राष्ट्र. आता या राष्ट्राचा एक नवा 'पराक्रम' उघडकीला आला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करून उत्तर कोरिया अण्वस्त्रं (Nuclear Weapons) आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Ballistic Missile) कार्यक्रम राबवत आहे आणि त्याकरिता लागणारा पैसा उभारण्यासाठी उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी (Hackers) 2020 या वर्षभरात लाखो डॉलर्सची ऑनलाइन चोरी केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) एका गोपनीय अहवालात हा दावा करण्यात आला आहे. सीएनएनने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे. राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या कार्यकाळात आर्थिक संस्थांविरोधात आणि व्हर्च्युअल करन्सी एक्स्चेंज हाउसेसविरोधात मोहिमा राबवण्यात आल्या. शस्त्रास्त्रांकरिता पैसे उभारणं आणि उत्तर कोरियाच्या अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला सांभाळणं, हे त्यामागचे उद्देश होते, असा आरोप त्या अहवालात करण्यात आला आहे. या अहवालात म्हटल्यानुसार, संयुक्त राष्ट्रांचा सदस्य असलेल्या एका देशाने असा दावा केला आहे, की उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी 316.4 दशलक्ष डॉलर्सचे व्हर्च्युअल असेट्स (आभासी संपत्ती) 2019 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत चोरले. हे ही वाचा-नशा करणं पडलं महागात, वयाच्या 22 व्या वर्षी आलं म्हातारपण; पाहा PHOTOS उत्तर कोरियाने अण्वस्त्रनिर्मितीसाठी आवश्यक घटकांची निर्मिती केली, अणुप्रकल्प राखले आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली. तसंच, या कार्यक्रमासाठी आवश्यक घटक आणि तंत्रज्ञान परदेशातून मिळवण्याचे प्रयत्नही सुरूच ठेवले, असा आरोपही या अहवालात करण्यात आला आहे.  प्रचंड खर्चिक असूनही शक्तिशाली अण्वस्त्रं आणि त्याच्या जोडीला आधुनिक क्षेपणास्त्रं विकसित करणं हे वर्षानुवर्षं उत्तर कोरियाचं उद्दिष्ट आहे. उत्तर कोरियाच्या या अशा कार्यपद्धतीमुळे संयुक्त राष्ट्रसंघाने त्या देशाला जणू वाळीतच टाकलेलं असून, अन्य देशांसोबत जवळपास एकही आर्थिक व्यवहार करण्यावर बंदी घातलेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या संशोधकांनी सांगितलं, की एका अज्ञात (नाव गुप्त राखलेल्या) देशाच्या तपासानुसार उत्तर कोरिया कोणत्याही रेंजच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राद्वारे अण्वस्त्र डागू शकतं; मात्र ते क्षेपणास्त्र पृथ्वीच्या वातावरणात परतू शकेल की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. उत्तर कोरिया या विषयातील तज्ज्ञांच्या संयुक्त राष्ट्रसंघातल्या पॅनेलने हा अहवाल लिहिला आहे. उत्तर कोरियाने अण्वस्त्रं आणि बॅलिस्टिक मिसाइल विकसित करण्याचा कार्यक्रम राबवल्याबद्दल त्यांना देण्यात आलेल्या शिक्षेची अंमलबजावणी कशी होते आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी या पॅनेलची निर्मिती करण्यात आली आहे. या अहवालातील तपशील अद्याप गोपनीय (Confidential) असून, सीएनएनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील (UN Security Council) एका राजनैतिक सूत्राकडून त्याबद्दलची माहिती मिळवली. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्या सूत्राने संबंधित गोपनीय अहवालाचा काही भाग सीएनएनला उपलब्ध केला. संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य देश, गुप्तचर यंत्रणा, माध्यमं आणि त्या देशातून बाहेर पडलेल्या व्यक्ती आदी स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पॅनेलने हा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल प्रसिद्ध कधी केला जाणार आहे, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. या अहवालातील याआधी उघड झालेल्या काही गोष्टींमुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य असलेल्या चीन आणि रशियाची चिडचिड झाली असून, राजनैतिक वाद उभे राहिले आहेत. हे ही वाचा- संयुक्त राष्ट्रसंघात असलेल्या उत्तर कोरियाच्या मिशनला सीएनएनने या अहवालाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करण्याची विनंती केली होती; मात्र त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. मात्र किम यांनी अलीकडेच केलेल्या ताज्या नियोजनाशी त्या अहवालातील दावे जुळत आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या एका महत्त्वाच्या राजकीय बैठकीत किम यांनी म्हटलं होतं, की उत्तर कोरिया आपल्या अण्वस्त्रं आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांतर्गत नवी, अत्याधुनिक शस्त्रास्त्रं विकसित करील. त्यात टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स, अमेरिकेशी दोन हात करण्यासाठी क्षेपणास्त्र संरक्षक यंत्रणा भेदून काढणारी आधुनिक शस्त्रास्त्रं आदींचा समावेश आहे. किम यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सख्य वाढवलं होतं, तरीही ही तयारी त्यांनी केली होती. किम जोंग उन यांनी अण्वस्त्रं विकसित करण्याचा नाद सोडून द्यावा, यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी उच्चस्तरीय डिप्लोमसीचा प्रयत्न केला होता. तोपर्यंतचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या प्रकारच्या वाटाघाटींमध्ये अयशस्वी झाले होते. ट्रम्प (Donald Trump) हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना उत्तर कोरियाच्या अध्यक्षांना भेटणारे पहिले अध्यक्ष ठरले. 2018मध्ये ते उत्तर कोरियात गेले होते. तसंच, त्यानंतरही त्यांची दोन वेळा भेट झाली होती; मात्र उत्तर कोरियाचा या तरुण हुकूमशहाच्या अण्वस्त्रांच्या महत्त्वाकांक्षेला ते रोखू शकले नाहीत. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या बाबतीत पुढे कसे जाणार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही; मात्र त्यांच्या सहकाऱ्यांकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे, की दक्षिण कोरिया आणि जपान या अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांची मोठी मदत या बाबतीत घेतली जाणार आहे. बायडेन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं, की नवं प्रशासन धोरणाचा फेरआढावा घेत असून, त्याआधी आपलं म्हणणं सार्वजनिकरीत्या मांडणार नाही. उत्पन्नाचा नवा स्रोत संयुक्त राष्ट्रसंघाच्या पॅनेलला असं आढळलं, की कोविड-19मुळे उत्तर कोरियाने कडक सीमाबंदी केली आहे. त्यामुळे परदेशातून येणारा चलनाचा प्रवाह आटला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने घातलेल्या बंदीचा नियम पाळल्याचं दाखवण्यासाठी आणि तरीही आपली अर्थव्यवस्था तगवण्यासाठी उत्तर कोरिया गुंतागुंतीच्या योजनांचा आधार घेतं. कोळसा हा उत्तर कोरियातून जुन्या काळापासून निर्यात होणारा सर्वांत किमती माल. पॅनेलच्या 2019च्या अहवालानुसार, उत्तर कोरियाने कोळशाच्या निर्यातीतून 370 दशलक्ष डॉलर्स कमावले; पण जुलै 2020पासून निर्यात बंद झाल्याचं दिसत आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी उत्तर कोरियाने 2020मध्ये बाहेरच्या जवळपास सर्व जगाशी असलेले बहुतेकसे व्यवहार बंद करून टाकले. त्यामुळे हे घडलं असावं. चीन हा उत्तर कोरियासाठी जणू आर्थिक लाइफलाइन असलेला देश; मात्र या देशाशी असलेला बहुतांश व्यापारही उत्तर कोरियाने बंद करून टाकला आहे. त्यामुळे कोरोना विषाणू लांब राहिला खरा; मात्र वर्षानुवर्षं कोसळण्याच्या बेतात असलेली उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था आता त्या उंबरठ्यावर आली आहे. उद्ध्वस्त करणारी वादळं, कठोर निर्बंध आणि महामारी यांमुळे उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था 2020मध्ये डबघाईला आली. त्यामुळे उत्तर कोरिया पैसा उभारण्यासाठी आता हॅकर्सवरच जास्त अवलंबून राहील, असं तज्ज्ञांना वाटतं आहे. हे ही वाचा-उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उनकडून विध्वंसक क्षेपणास्त्रांची निर्मिती इराणसोबत सहकार्य उत्तर कोरिया आणि इराणने (Iran) दीर्घ टप्प्याच्या क्षेपणास्त्र विकसन प्रकल्पासाठी पुन्हा एकत्र यायचं ठरवलं आहे, असा दावा अनेक देशांनी केल्याचं या अहवालात म्हटलं आहे. ही शस्त्रं विकसित करण्यासाठी लागणाऱ्या सुट्या भागांचा व्यापारही हे देश करणार आहेत. 2017मध्ये उत्तर कोरियाने आंतरखंडीय टप्प्यावर मारा करण्याची क्षमता असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची (ICBM) चाचणी घेतली होती. तसंच त्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात गार्गान्टुआन हे ICBM परेडमध्येही सादर केलं होतं. विविध आखाती देश आणि अमेरिकेा यांच्याशी असलेल्या दीर्घकालीन भांडणांमुळे इराणकडे असलेलं असंच शस्त्रतंत्रज्ञान आणि त्यांच्या भात्यात असलेली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इराणच्या बॅलिस्टिक शस्त्रांवर निर्बंध आणण्याची मागणी सौदी अरेबियासह अन्य आखाती देशांनी केली आहे; मात्र इराणच्या नेत्यांनी हे वारंवार स्पष्ट केलं आहे, की शस्त्रास्त्रं या विषयावर चर्चा किंवा वाटाघाटी होणारच नाहीत.  क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर आपण उत्तर कोरियासोबत काम करत असल्याचा दावा इराणने नाकारला आहे. इराणच्या संयुक्त राष्ट्रसंघातील मिशनने 'अहवालातील ही माहिती चुकीची आहे' असा दावा केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Ballistic missiles, Donald Trump, Hacking, Kim jong un, North korea, Nuclear weapons, Theft

    पुढील बातम्या