मराठी बातम्या /बातम्या /विदेश /नशा करणं पडलं महागात, वयाच्या 22 व्या वर्षी आलं म्हातारपण; फोटो पाहून धक्काच बसेल

नशा करणं पडलं महागात, वयाच्या 22 व्या वर्षी आलं म्हातारपण; फोटो पाहून धक्काच बसेल

अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेचा असाही परिणाम होऊ शकतो.

अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेचा असाही परिणाम होऊ शकतो.

अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेचा असाही परिणाम होऊ शकतो.

मिसौरी 7 फेब्रुवारी : अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेमुळे (Drug Addict)  आपले सर्व दात गमावणारी एक 22 वर्षीय महिला आता व्हिडिओंच्या मालिकेतून इतरांना या पदार्थाच्या धोक्यांविषयी आणि यामुळे होणाऱ्या नुकसानाविषयी सावध करण्याचं काम करत आहे. मिसौरीच्या फेथ हिलने (Faith Hill) सहा वर्षे मेथच्या व्यसनाधीनतेमध्ये घालवली.  त्या काळात तिनं आपले मित्र गमावले, मोठ्या प्रमाणात तिचं वजन कमी झालं. इतकंच नाही तर अमली पदार्थांच्या आहारी गेल्यानं तिला आपले दातही गमवावे लागले.

आता फेथनं अलीकडेच दातांचा एक नवा सेट बसवला आहे. अशात आपला वाईट अनुभव टीक टॉकच्या माध्यमातून सांगत ती लोकांना आपले दात व्यवस्थित ठेवण्यासाठी हे व्यसन सोडण्याचं आवाहन करत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती गमनं आपल्या दातांचा सेट लावताना दिसत आहे. यात तिनं असंही म्हटलं, की लोक असा विचार करतात की केवळ वृद्ध लोकच अशा दातांच्या सेटचा वापर करतात. मात्र, हे खरं नाही. दातांचा सेट बसवणारे लोकही खूप सुंदर असतात हे दाखवून देण्याचा निर्णय मी घेतला आहे.

ड्रग्सच्या आहारी गेल्यानं तिनं कशाप्रकारे आपले मित्र गमावले आणि आत्महत्येचाही प्रयत्न केला हेदेखील तिनं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तिनं सांगितलं, की आमली पदार्थांच्या सहा वर्षाच्या सवयीमुळे ती हॉटेल, रस्ता जिथे जागा मिळेल तिथे झोपायची. तिनं स्वतःच्या दातांची काळजीही या काळात घेतली नाही. ती म्हणाली, मला असं वाटायचं की मी त्यांची काळजी घेत आहे. मात्र, असं नव्हतं. यामुळं तिच्या दातांना मोठ्या प्रमाणात इजा झाले आणि ते तुटू लागले. शेवटी 22 वर्षीय फेथला आपले दात काढून टाकावे लागले.

अमेरिकन डेन्टल असोसिएशनच्या मते, नशा करणारे अनेक लोक हिरड्यांचे आजार आणि हिरड्या किंवा दात खराब होणे अशा समस्यांचा सामना करतात. मेथ माउथ या आजारामध्ये लोकांचे दात काळे पडतात, खराब होतात. अशात वेळी अनेदका हे दात काढून टाकावे लागतात. फेथलादेखील आपले दात काढून टाकावे लागेल आणि यानंतर दोन महिने तिनं विनादाताचे काढले. यावेळी मी बोलताना कशी दिसते हेदेखील पाहू शकत नव्हते असंही तिनं सांगितलं. ती म्हणाली, की आता मागे वळून पाहाताना मला ती आठवण फार वाईट वाटते.

ती म्हणाली, की मी टीक टॉक व्हिडिओच्या माध्यमातून लोकांमध्ये या दातांबद्दल जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे आणि जगाला मला दाखवून द्यायचं आहे की दाताचे सेट लावणारे लोकही सुंदर असतात. आपल्या सगळ्यांची एक कथा असते. माझ्या या व्हिडिओचा उद्देश लोकांना लाज वाटावी असा नाही, तर त्यांना सुंदर वाटावं असा आहे, असंही ती पुढे म्हणाली.

First published:

Tags: Drugs