Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer : Astrazeneca ची कोरोना लस देणं अनेक देशांनी का थांबवलं?

Explainer : Astrazeneca ची कोरोना लस देणं अनेक देशांनी का थांबवलं?

अॅस्ट्राझेन्का कंपनीची लस (astrazeneca corona vaccine) भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमार्फत कोविशिल्ड म्हणून दिली जाते.

अॅस्ट्राझेन्का कंपनीची लस (astrazeneca corona vaccine) भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमार्फत कोविशिल्ड म्हणून दिली जाते.

अॅस्ट्राझेन्का कंपनीची लस (astrazeneca corona vaccine) भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमार्फत कोविशिल्ड म्हणून दिली जाते.

नवी दिल्ली, 17 मार्च: सध्या जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू आहे. यात अॅस्ट्राझेन्का कोविड-19 लस (Astrazeneca Covid-19 Vaccine) देणं तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचा निर्णय काही देशांनी घेतला आहे. याबाबत डेन्मार्कने (Denmark) सर्व प्रथम पाऊल उचलत अॅस्ट्राझेन्का कोविड-19 लस न देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नॉर्वे, आईसलॅंड, बल्गेरिया, थायलंड आणि कॉंगो या देशांनी देखील असाच निर्णय घेतला आहे. अॅस्ट्राझेन्का कोविड -19 लस न देण्याचा निर्णय का घेतला गेला, जाणून घेऊया.

काही दिवसांपूर्वी डेन्मार्क, आयर्लँड आणि थायलंड या देशांनी कोरोना प्रतिबंधासाठी असलेल्या अॅस्ट्राझेन्का कोविड -19 लस देणं तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही लस घेतल्यानंतर संबंधित नागरिकांच्या शरीरात रक्ताची गुठळी (Blood Clots) तयार होत असल्याचं अहवालानंतर स्पष्ट झालं आहे. परंतु याबाबत ठोस पुरावा नसतानाही हा निर्णय घेण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अॅस्ट्राझेन्का कोविड-19 लशीचा वापर तात्पुरता थांबवणारा डेन्मार्क हा पहिला देश ठरला आहे. कारण गत आठवड्यातील अहवालानुसार, ही लस घेतल्यानंतर अनेक लोकांच्या शरीरात रक्ताची गुठळी तयार होत असल्याचं दिसून आलं. त्यापैकी एका व्यक्तीच्या शरीरात लशीचा एक डोस घेतल्यानंतर रक्ताच्या अनेक गुठळ्या झाल्याचं दिसून आलं. अवघ्या दहा दिवसांतच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याबाबत डेनिश आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की दोन आठवड्यांसाठी लसीकरण थांबवण्यात आलं आहे. या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. मात्र लस आणि रक्ताच्या गुठळ्या यांच्या काही संबंध आहे का हे आत्ताच सांगता येणार नाही.

हे वाचा - राज्यात कोरोनाची दुसरी लाट; समोर आली धक्कादायक आकडेवारी

नॉर्वे, बल्गेरिया, आईसलँड, थायलंड आणि कॉंगो यांनी अशाच पध्दतीचा निर्णय घेतला आहे. नॉर्वेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, वय वर्षे 50 खालील चार व्यक्तींनी अॅस्ट्राझेन्का लस घेतल्यानंतर त्यांच्या शरीरातील प्लेटलेटस (Platelaets) कमी होऊन त्यांना तीव्र रक्तस्त्राव झाला.

रविवारी आयर्लँड आणि नेदरलँडने देखील अॅस्ट्राझेन्का लस वापरणं तात्पुरतं थांबवत असल्याचे जाहीर केलं. याबाबत नेदरलँडमधील अधिकाऱ्यांनी म्हटलं की खबरदारीचा उपाय म्हणून अॅस्ट्राझेन्का लस देणं थांबवण्यात आलं आहे. सावधगिरी पाळण्यात आम्ही चूक केली. परंतु आता खबरदारीचा उपाय म्हणून थांबणं शहाणपणाचं ठरेल, असं डचचे आरोग्यमंत्री ह्युगो डी जोंगे म्हणाले. मात्र अनेक देशांमध्ये ही लस देणं सुरू आहे.

...यासाठी लस कारणीभूत ठरत असल्याचा कोणताही पुरावा आहे का?

ब्रिटनमध्ये अॅस्ट्राझेन्का लशीचे 11 दशलक्ष डोस देण्यात आले आहेत. येथे अन्य देशांच्या तुलनेत लस घेतल्यानंतर सुमारे 11 जणांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचं दिसून आलं, परंतु, हे लशीमुळे झालं असा कोणताही पुरावा अद्याप आढळलेला नाही.

लसीकरण तात्पुरते थांबवल्याच्या मुद्दयावर अॅस्ट्राझेन्का कंपनीने संपूर्ण युरोपातील 17 दशलक्ष लोकांना या लशीचा डोस देऊन त्यांचे सखोल आणि काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात आले आहे. त्यात लशीमुळे कोणत्याही देशातील कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीत रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढत असल्याचा पुरावा आढळून आलेला नाही.

हे वाचा - टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी सांगितलं राज्यात का वाढतोय कोरोना? ही असेल स्ट्रॅटेजी

द युरोपियन मेडिसीन्स एजन्सीच्या म्हणण्यानुसार, लसीकरणामुळे ही परिस्थिती उदभवल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. युरोपियन युनियन नियमकाने याबाबत म्हटलं आहे की अॅस्ट्राझेन्का कोविड-19 लस घेतल्यानंतर शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे दिसून आलेल्यांची संख्या ही लस घेतलेल्यांच्या तुलनेत फारशी नाही.

द युरोपियन मेडिसिन्स एजन्सी (The European Medicine Agency) आणि जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलं आहे की, लशीमुळे रक्ताच्या गाठी तयार होत असल्याबाबत कोणताही डेटा उपलब्ध नाही, त्यामुळे नागरिकांनी लस घेतली पाहिजे.

मग लसीकरण का थांबवण्यात आलं?

जेव्हा लशीचं मोठ्या प्रमाणात वितरण केलं जातं तेव्हा नागरिकांमध्ये काही गंभीर आरोग्यविषयक समस्या किंवा मृत्यूची नोंद या गोष्टी शास्त्रज्ञांना अपेक्षित असतात. कारण लाखो लोकांना लशीचे डोस दिले गेलेले असतात. त्यामुळे मोठ्या गटात या समस्या दिसून येणं शक्य असतं. अशा प्रत्येक गोष्टी या लशीशी जोडल्या जात नाही. परंतु कोविड 19 लस ही अद्यापही प्रायोगिक स्तरावर आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतर प्रत्येक घटनेची किंवा शक्यतांची तपासणी शास्त्रज्ञांनी करणं अपेक्षित आहे.

हे वाचा - 24 तासांत गंभीर कोरोना रुग्ण 92वरून 4,219 वर; आणखी एक नवा स्ट्रेन आढळल्याने खळबळ

हे लसीकरण प्रायोगिक तत्वावर आहे. कारण मागील वर्षी लस निर्मिती करण्यात आल्यानं या संबंधीचा मोठा डेटा उपलब्ध नाही. काही ना काही कारणाने लोक दररोज मृत्यूमुखी पडतात. आमच्याकडील 300 दशलक्षहून अधिक लोकांचे लसीकरण झालेले आहे, परंतु ते देखील अन्य कोणत्या तरी कारणाने मृत्यूमुखी पडतील, अशी प्रतिक्रिया डब्ल्यूएचओचे सहायक महासंचालक डॉ.मारियानगेला सिमाओ यांनी दिली.

अॅस्ट्राझेन्का लस अन्य कोणत्या अडचणीत आहे का?

50 पेक्षा अधिक देशांतील प्रौढांच्या वापरासाठी या लशीला मंजुरी देण्यात आली आहे. ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलेल्या संशोधनात ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे. परंतु या लसीचा डेटा कसा प्रसिद्ध झाला याबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्युनॉल मॅक्रॉन (Emunal Macron) यांच्यासह काही युरोपियन नेत्यांनी या लशीच्या प्रभावितेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ब्रिटनने सर्वप्रथम अंशिक निकालांच्या आधारावर ही लस अधिकृत केली. ज्यात या लशीचा डोस 70 टक्के प्रभावी असल्याचं सूचित करण्यात आलं होतं. मात्र या घटना बघता स्वयंसेवकांना पहिला डोस दिला गेल्यानंतरही उत्पादनांतील त्रुटी नजरेआड केल्या गेल्याचं दिसतं. त्यातही संशोधनकांनी याबाबत त्वरित कबुली न देणं ही देखील एक त्रुटी म्हणावी लागेल. जेव्हा लस परवाना देण्याची शिफारस केली गेली तेव्हा ईएमएच्या अंदाजानुसार लशीची कार्यक्षमता सुमारे 60 टक्के होती. या लशीमुळे वृद्धांना संरक्षण मिळेल का यासंबंधीचा डेटा अपूर्ण राहिल्यानं काही युरोपीय देशांनी प्रारंभी वृद्ध लोकांसाठीचे लसीकरण रोखून धरलं होते.

हे वाचा - ब्लूट्यूथने फोनमध्ये पसरतो हा खास व्हायरस; Coronavirus ट्रॅक करण्यासाठी होते मदत

यूएसमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने 30,000 अमेरिकी लोकांमधील असामान्य अभ्यास सहा आठवड्यांसाठी स्थगित केला कारण नियमकांना ब्रिटनमध्ये नोंदवल्या गेलेल्या काही संभाव्य दुष्परिणामांची माहिती मिळाली होती. आम्ही अॅस्ट्राझेन्का लसीबद्दलचा सर्व डेटा पाहिला. त्यानुसार ही लस फारच सुरक्षित आहे, आणि लोकांना कोरोनापासून वाचवत असल्याचं दिसतं, अशी प्रतिक्रिया पूर्व अँग्लिया विद्यापीठातील औषध विभागाचे प्राध्यापक डॉ. पॉल हंटर यांनी दिली.

अन्य कोविड-19 लसींबाबत अशीच चिंता आहे का?

सध्या ईएमए फिझर-बायोइनटेक (Phizer-BioIntech), मॉर्डना (Moderna) आदी कोविड-19 लशींबाबत परीक्षण करीत आहे. तसेच अॅस्ट्राझेन्कामुळे काही रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट कमी होऊन जखमा आणि रक्तस्त्राव होऊ शकतो याबाबतही अभ्यास करीत आहे.

दरम्यान डब्ल्यूएचओ, ईएमए आणि अन्य देशांतील नियमकांच्या म्हणण्यानुसार, लोकांनी लस घेणे आवश्यक आहे. कारण अन्य संभाव्य धोक्यांपेक्षा लसीकरणामुळे निर्माण होणारा धोका कमी आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccine