मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

ब्लूट्यूथने फोनमध्ये पसरतो हा खास व्हायरस; Coronavirus ट्रॅक करण्यासाठी होते मदत

ब्लूट्यूथने फोनमध्ये पसरतो हा खास व्हायरस; Coronavirus ट्रॅक करण्यासाठी होते मदत

संशोधकांनी आता एक असा व्हायरस तयार केला आहे, जो कोरोनासारख्या व्हायरसबाबत ब्लूट्यूथद्वारे अतिशय वेगात लोकांना अलर्ट करू शकतो. या खास व्हायरसला Safe Blues असं नाव देण्यात आलं आहे. हा व्हायरस कोरोना ट्रेसिंगचं काम अतिशय अचूकपणे करू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 16 मार्च : व्हायरसचं नाव ऐकताच कोणत्याही व्यक्तीच्या डोक्यात एक अशी प्रतिमा तयार होते, की व्हायरस म्हणजे नुकसान पोहोचवणारा असं वाटतं. परंतु संशोधकांनी आता एक असा व्हायरस तयार केला आहे, जो कोरोनासारख्या व्हायरसबाबत ब्लूट्यूथद्वारे अतिशय वेगात लोकांना अलर्ट करू शकतो. या खास व्हायरसला Safe Blues असं नाव देण्यात आलं आहे. हा व्हायरस कोरोना ट्रेसिंगचं काम अतिशय अचूकपणे करू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. Safe Blues हा व्हर्च्युअल व्हायरस आहे, तुमच्या स्मार्टफोनला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण करत नाही, असंही सांगण्यात आलं आहे.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ क्विंसलँड, मेलबर्न विद्यापिठ आणि Massachusetts इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या संशोधकांनी संयुक्तपणे या व्हर्च्युअल व्हायरसला तयार केलं आहे. याला तयार करणाऱ्या संशोधकांनी सांगितलं की, या व्हायरसच्या ट्रान्समिशनदरम्यान कोणत्याही युजरचा डेटा रेकॉर्ड केला जात नाही. तसंच कोणत्याही सर्व्हरवरदेखील डेटा स्टोर होत नाही.

(वाचा - Explainer: सध्याच्या स्थितीत लॉकडाऊनचं धोरण का योग्य नाही? वाचा जाणकाराचं म्हणणं)

सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत आहे की नाही हे हा व्हायरस अचूकपणे सांगू शकतो. त्याशिवाय गर्दी, समारंभ यांसारख्या गर्दी होणाऱ्या ठिकाणांनाही हा व्हायरस ऑटोमेटिक ट्रॅक करतो. हा व्हायरस ब्लूट्यूथद्वारे काम करतो. या व्हायरसला कोरोना महामारीमध्ये संपूर्ण जगात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी तयार करण्यात आलेल्या सिस्टमच्या आधारेच तयार करण्यात आलं आहे.

(वाचा - एक Blood test वाचवू शकते कोरोना रुग्णांचा जीव; संशोधकांचा दावा)

दरम्यान, भारत सरकारने कोरोना काळात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आरोग्य सेतू अ‍ॅप (Aarogya Setu App) लाँच केलं आहे. आता या अ‍ॅपचा वापर कोरोना वॅक्सिनच्या रजिस्ट्रेशनसाठीही केला जात आहे. जवळपास 17 कोटी लोकांनी डआरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड केलं आहे. तसंच रेल्वे प्रवासादरम्यान हे अ‍ॅप फोनमध्ये असणं अनिवार्य आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid19, Safe blues, Tech news, Technology