मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Maharashtra coronavirus update : राज्यात कोरोनाची दुसरी लाट; समोर आली धक्कादायक आकडेवारी

Maharashtra coronavirus update : राज्यात कोरोनाची दुसरी लाट; समोर आली धक्कादायक आकडेवारी

महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक नव्या कोरोना (coronavirus in maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक नव्या कोरोना (coronavirus in maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक नव्या कोरोना (coronavirus in maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबई, 16 मार्च : महाराष्ट्रातील कोरोनाची (coronavirus in maharashtra) परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यात कोरोनाव्हायरसचा विस्फोट झाला आहे. कोरोनाची दुसरी लाटच आली आहे. आज तर कोरोनाची धक्कादायक अशी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात तब्बल 178664 नवे रुग्ण सापडले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मंगळवारी (16 मार्च, 2021)  17,864 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या 23,47,328 वर पोहोचली आहे. दिवसभरात 87 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.26 % एवढा आहे. 9510 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण 21,54,253 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.77 % एवढे झाले आहे. तर सध्या 1,38,813 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

हे वाचा - टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी सांगितलं राज्यात का वाढतोय कोरोना? ही असेल स्ट्रॅटेजी

महाराष्ट्रातील कोविडबाधित प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला राज्यात सुरूवात होत आहे. तरीही राज्य सरकारने पुरेशा व्यवस्था केलेल्या नाहीत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचण्या करणं, सोशल डिस्टन्सिंग राखणं त्याचबरोबर संभाव्य धोका लक्षात घेऊन रुग्णालयं सुसज्ज करणं या सगळ्याच पातळ्यांवर महाराष्ट्र सरकारचं दुर्लक्ष होत आहे. संभाव्य कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने सज्ज व्हावं,’ असा इशारा केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यासंदर्भात खडसावणारी दोन पत्रं महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना लिहिली आहेत, असं एनडीटीव्हीच्या बातमीत म्हटलं आहे.

‘महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होत आहे. पण त्याच्यावर ट्रॅक ठेवण्यासाठी, टेस्टिंग, आयसोलेशन, क्वारंटाइन करणं या सगळ्याबाबतीत राज्य सरकार फारच मर्यादित प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील शहरी तसंच ग्रामीण भागात कोविड महामाथीला अनुसरून सार्वजनिक वागणुकीचे नियम नागरिकांकडून मोडले जात आहेत असं केंद्राने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवलेल्या टीमच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे सरकारने भविष्यासाठी गतीने सज्ज व्हावं,’ असं या पत्रात लिहिल्याचं बातमीत म्हटलं आहे.

हे वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा, केंद्राचा राज्य सरकारला धोक्याचा इशारा

राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य पूर्ण प्रयत्न करीत आहे. प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी 2.20 कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली.

First published:
top videos

    Tags: Coronavirus