पॅरिस, 16 मार्च : बहुतेक देशांमध्ये कोरोनाव्हायरसचे (coronavirus) नवे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. काही देशांमध्ये हा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा (coronavirus new strain) परिणाम असल्याचं दिसून आहे. कारण कोरोनाचा नवा स्ट्रेन हा अधिक संसर्गजन्य असल्याचं सांगितलं जातं आहे. यूके, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची नवी रुपं दिसून आली. आता फ्रान्समध्येही नवा कोरोना (France coronavirus) आढळला आहे. यानंतर अवघ्या 24 तासांत रुग्णांचा आकडा 92 वरून 4,219 वर पोहोचला आहे. फ्रान्सच्या लानियनमधील एका रुग्णालयात या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर कोरोना रुग्णं वेगाने वाढू लागले आहेत. हा स्ट्रेन जास्त गंभीर आणि संसर्गजन्य नसल्याचं फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. पण रुग्णांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज तक च्या वृत्तानुसार, फ्रान्सच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या भयंकर प्रमाणात वाढली आहे. आयसीयूमधील कोरोना रुग्णांचा आकडा 92 वरून 4,219 पोहोचला आहे. नोव्हेंबर 2020 नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या आठवड्याच्या शेवटी पॅरिसमध्ये रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्याही वाढली आहे. आता एक चतुर्थांशपेक्षा अधिक लोक आहेत. हे वाचा - पुण्यात विभागीय आयुक्तांनाही कोरोना; संसर्गाचा वेग वाढला, धक्कादायक आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी 6,471 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याचं सांगितलं. गेल्या सोमवारपेक्षा हे प्रमाण 4.3% अधिक अधिक आहे. तर आतापर्यंत एकूण 90,762 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा नव्या स्ट्रेन आढळल्यानंतर आता प्रशासन सतर्क झालं आहे. जास्तीत जास्त खबरदारी घेतली जात आहे आणि संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचाही वेग वाढवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.