मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात? काय आहे ब्रिटीश कनेक्शन?

Explainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात? काय आहे ब्रिटीश कनेक्शन?

आसाम आणि मिझोराम या राज्यांमधला सीमा संघर्षात किमान 5 पोलिसांचा बळी गेला आहे. या सीमाप्रश्नामागे इंग्लंडचाच संबंध आहे का?

आसाम आणि मिझोराम या राज्यांमधला सीमा संघर्षात किमान 5 पोलिसांचा बळी गेला आहे. या सीमाप्रश्नामागे इंग्लंडचाच संबंध आहे का?

आसाम आणि मिझोराम या राज्यांमधला सीमा संघर्षात किमान 5 पोलिसांचा बळी गेला आहे. या सीमाप्रश्नामागे इंग्लंडचाच संबंध आहे का?

नवी दिल्ली, 27 जुलै: आसाम आणि मिझोराम या राज्यांमधला सीमावाद (Assam-Mizoram Border Dispute) पुन्हा एकदा पेटला असून, अतिक्रमणाच्या आरोपांवरून झालेल्या हिंसाचारात आसामचे किमान पाच पोलिस ठार झाले आहेत. या सीमाप्रश्नाचं मूळ ब्रिटिशांच्या वसाहतीच्या काळापर्यंत जातं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ईशान्येकडच्या राज्यांच्या निर्मितीवेळीही त्या प्रश्नावर उत्तर निघालं नाही. या प्रश्नाचा घेतलेला हा वेध...

- या सीमावादाचं मूळ कशात आहे?

- 19वं शतक संपून 20वं शतक सुरू होत असताना भारताचे तत्कालीन राज्यकर्ते असलेल्या ब्रिटिशांनी (British) ईशान्येकडच्या (North-east) भागातही आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. त्या वेळी त्या प्रदेशातल्या आदिवासी जमातींकडून दावा करण्यात येत असलेले भूभाग त्यांनी आसामला जोडून घेतले. त्यांनी आसामचा जणू स्प्रिंगबोर्डसारखा वापर केला. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळी आसाम राज्याने ईशान्येकडचा मोठा प्रदेश व्यापलेला होता. नागालँड, मेघालय, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश ही सध्याची चार राज्यं आसाममधून वेगळी काढून तयार करण्यात आली आहेत; मात्र त्यांच्या सीमा समाधानकारकरीत्या निश्चित करण्यात आल्या नाहीत.

त्यामुळे हा सीमावाद राजकारण आणि धारणांचा भाग आहे. या राज्यांच्या सीमा संवैधानिकदृष्ट्या ठरवण्यात आल्या; मात्र नागालँड, मिझोराम आणि मेघालय या राज्यांचं म्हणणं असं आहे, की ऐतिहासिकदृष्ट्या त्यांच्या राज्यात असलेली जमीन आता त्यांच्या राज्यात नाही. त्या जमिनीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवरचा हक्क कोणतंच राज्य सोडू इच्छित नाही.

आसाम-मिझोराम सीमेवर नव्याने हिंसाचार उसळल्यामुळे तणावाचं वातावरण आहे; पण आसामच्या नागालँड, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांशी असलेल्या सीमांवरही नव्याने वाद उफाळून आले आहेत. या राज्यांचे सीमाप्रश्न सोडवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सीमा आयोगांनाही फारसं यश मिळालं नाही. कारण त्यांनी सुचवलेल्या शिफारशींकडे या राज्यांकडून दुर्लक्ष केलं जातं. त्या शिफारशी बंधनकारक नसतात.

- आसाम-मिझोराम सीमावाद किती जुना आहे?

- 1972 पूर्वी मिझोराम हे आसामचाच भाग होतं. 1972मध्ये त्याला केंद्रशासित प्रदेश (Union Territory) करण्यात आलं, तर 1987मध्ये मिझोराम हे राज्य म्हणून घोषित करण्यात आलं. 1972पूर्वी मिझोराम लुशाई हिल्स (Lushai Hills) म्हणून ओळखलं जायचं. आज त्या टेकड्या मिझो हिल्स (Mizo Hills) म्हणून ओळखल्या जातात आणि त्याच आजच्या वादाचं मूळ कारण आहेत.

देशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला? Sero Survey चा खरा अर्थ?

चहाच्या मळ्यांचं क्षेत्र वाढवण्यासाठी ब्रिटिश दक्षिण आसाममधल्या कचर (Cachar) जिल्ह्यापर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांचा मिझो आदिवासींशी संघर्ष झाला. लुशाई हिल्स हे आपलं मूळ घर असल्याचं मिझो आदिवासींचं (Mizo Tribes) म्हणणं होतं. त्यांच्यामधल्या वादांना हिंसकळ वळण लागलं. शेवटी ब्रिटिशांनी आदिवासींचं म्हणणं मान्य करून एक करार केला. त्यानुसार, ब्रिटिशांच्या भारतातल्या साम्राज्याचे कायदेकानू आदिवासी क्षेत्राला लागू होणार नाहीत, असं ठरवण्यात आलं. त्या वेळी ब्रिटिश वसाहतवाल्यांनी इनर लाइन सिस्टीमही लागू केली. बाहेरून कुणी आदिवासी क्षेत्रात घुसखोरी करू नये म्हणून ही सिस्टीम लागू करण्यात आली होती.

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचंय? मग लगेच शिकून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

आसामसोबत असलेला सीमावाद सोडवण्यासाठी सीमा आयोगाची मागणी करणाऱ्या ठरावावर मिझोराम विधानसभेत चर्चा झाली. त्यात असा संदर्भ देण्यात आला, की कचर आणि लुशाई हिल्स यांच्यामधल्या सीमा निश्चित करण्यात आल्या आणि त्या अधिकृतरीत्या 1875 साली स्वीकारण्यात आल्या. नंतर तो प्रदेश जेव्हा ब्रिटिश वसाहतवाल्यांनी आपल्या नियंत्रणाखाली आणला, तेव्हा मिझोरामचा नकाशा नव्याने तयार केला गेला आणि कचर-मिझोराम सीमा विलीन करण्यात आली. 1933 साली नव्याने सीमा निश्चित करण्यात आली. हा निर्णय एकतर्फी घेण्यात आला, असा मिझोरामचा आरोप आहे.

स्पायडर मॅन ठरतोय व्हिलन, सामान्यांना करतोय मारहाण

- 1875 सालचीच सीमा ग्राह्य धरावी, असा मिझोरामचा आग्रह का आहे?

- 1875 साली तयार करण्यात आलेली सीमा ग्राह्य धरावी, असा मिझोरामच्या नेत्यांचा आग्रह आहे. कारण तेव्हाची सीमानिश्चिती आपल्या नेत्यांसोबत चर्चा करून निश्चित करण्यात आली होती, असं ते म्हणतात. तसंच, मिझो आदिवासींचे नेते आणि ब्रिटिश सरकार यांच्यात तसा करार झाला होता, असंही ते सांगतात. '1975 साली नवी सीमा तयार करण्यात आली, तेव्हा आमच्याशी चर्चा करण्यात आली नव्हती, त्यामुळे ती आमच्यावर लादलेली सीमा आहे,' असं त्यांचं म्हणणं आहे.

- वादाचे प्रमुख मुद्दे कोणते?

- कचर हिल्स आणि लुशाई हिल्स यांच्यात 1875मध्ये तयार करण्यात आलेली सीमा आणि 1933 साली लुशाई हिल्स आणि मणिपूर (Manipur) यांच्यात अधिसूचनेद्वारे तयार करण्यात आलेली सीमा हे आसाम आणि मिझोराम यांच्यातल्या वादाचे प्रमुख मुद्दे आहेत.

1875 आणि 1933 या दोन्ही वेळच्या सीमांमुळे राज्याच्या क्षेत्रफळात 749 चौरस किलोमीटरचा फरक पडत आहे, असं मिझोराम विधानसभेत सांगण्यात आलं. आसाम आणि मिझोराम यांच्यातली सध्याची सीमा सुमारे 164 किलोमीटर आहे. आसाममधले कचर, करीमगंज आणि हैलाकंडी या तीन जिल्ह्यांच्या सीमा ऐझॉल, कोलासिब आणि मामित या मिझोरामच्या तीन जिल्ह्यांच्या सीमांना स्पर्श करतात.

- तोडगा कसा निघू शकतो?

- अगदी 1970च्या दशकापासूनच आसाम-मिझोरामचा सीमावाद होत असल्याचं आढळतं. 2020 आणि त्यानंतर आता 2021मध्ये झालेला हिंसाचार मोठा आहे. सध्या आसाममध्ये भाजपचं सरकार असून, मिझोराममध्ये सत्तेत असलेल्या मिझो नॅशनल फ्रंट (Mizo National Front) पक्षाचा भाजप हा मित्रपक्ष आहे.

फायनान्शियल एक्स्प्रेसमधल्या स्तंभलेखात लेफ्टनंट जनरल शोकीन चौहान लिहितात, की हा वाद सोडवण्यासाठी सरकार संबंधित राज्यांना चर्चेसाठी बोलावून, त्यांच्या सामंजस्याने हा प्रश्न सोडवू शकतं. किंवा सीमा आयोगाची स्थापना करून संबंधित राज्यांना त्या आयोगाच्या शिफारशी बंधनकारक असतील, अशी व्यवस्था करता येऊ शकते.

अफगाणिस्तानात पोहोचलं पाकिस्तानी सैन्य? तालिबानींसोबत फिरतानाचा VIDEO VIRAL

2014मध्ये आसामचं मुख्यमंत्रिपद तरुण गोगोईंकडे (Tarun Gogoi) होतं. तेव्हा आसाम आणि नागालँडमध्ये सीमावाद उफाळून आला होता. 'नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय यांच्याशी असलेले सीमावाद सोडवण्यासाठी अनेक सीमा आयोग (Border Commission) स्थापन करण्यात आले; मात्र त्यांच्या शिफारशी या राज्यांनी स्वीकारल्या नाहीत,' असं गोगोई यांनी त्या वेळी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं होतं.

First published:

Tags: Assam, Border, Mizoram